Sunday, 14 January 2018

Book Review:-Bombay Beats;पुस्तक परीक्षण:-बॉम्बे बिट्स

सदर पुस्तकाची कथा ही  तीन तरुण मुलींच्या आयुष्याभोवती फिरते.सई,इरा,ग्रेष्मा ह्या तिघीजणी आपले नशीब आजमवण्यासाठी मुंबई मध्ये येतात.सई डॉक्टर होण्यासाठी धडपडत असते;इरा पत्रकारितेमध्ये नाव कमवण्यासाठी धडपडत असते;ग्रेष्मा ही सिनेअभिनेत्री होण्यासाठी धडपडत असते.योगायोगाने हा धडपडीचा  प्रवास ह्या तिघींना  एका छताखाली एकत्र घेऊन येतो.एकमेकींच्या अगदी अनोळखी असणाऱ्या सई ,इरा ,ग्रेष्मा  काळाच्या ओघात एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होतात. हा मैत्रीच्या  प्रवासामध्ये  तिघी आपआपल्या  ध्येयाच्या दिशेने कूच करत आपले ध्येय  पूर्ण करतात.कथेमध्ये प्रत्येक पात्र प्रचंड ताकदीचं आहे.तिघींचा आपले ध्येय साध्य करण्याचा प्रवास अतिशय भावनात्मक पद्धतीने मांडला आहे.त्यांच्या प्रवासामध्ये येणाऱ्या काही अनपेक्षित घटनांना सामोरे जात असताना त्यांच्या होणारा भावनिक कोंडमारा भावनेच्या पलीकडे जाऊन मांडला आहे. पुस्तक वाचत असताना काही प्रसंगांमध्ये Dr. Vibha हे पात्र आपली प्रेमाची परिभाषा पार बदलून टाकते आणि वाचणाऱ्याला स्वतःच्या प्रेमात पाडते. मॉडर्न गर्ल ग्रेष्मा,बेधडक स्वभावाची इरा आणि डॉक्टर असणारी सई ह्या तिघीही सध्याच्या पिढीचे प्रतिनिधित्व करत वाचकांच्या नजरेत भरतात. कथा काही बाबतीत सामाजिक विषयांवर देखील वाचकांचे चिमटे काढते.हे विषय  वाचून आपल्याला थोडेचे अस्वस्थ वाटत राहते.पुस्तकातील सर्व पात्र सई,इरा,ग्रेष्मा,अलोक,विभा,विक्रम आपापल्या जागेमध्ये फिट्ट बसतात.पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावर वाचक सर्व पात्रांच्या विशेषतः मुंबई शहराच्या आणि स्वतःच्या स्वप्नांच्या प्रेमात नक्की पडतात.
कथेसाठी माझ्याकडून 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
माझ्याकडून पुस्तकाला Distinction.
लेखक:-भाग्यश्री भोसेकर-बिडकर
संपर्क:-Facebook
Book Source:-Amazon Kindle
Reviewer:-Kaushik
©


No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...