राधिका देसाई ह्या तरुण मुलीच्या आयुष्यावर पूर्ण कथानक फिरते.शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या राधिकाचे खासगी आयुष्य मात्र अनेक प्रश्नांनी घेरलेले असते.घरच्या अनेक रूढी परंपरेत आणि बंधनात ती पूर्णपणे खचून गेलेली असते.चित्रकार असलेल्या राधिकाच्या कलेवर आणि जगण्यावर बऱ्याचदा घरातून बंधनं येऊ लागतात.घरच्या बंधनात ती अक्षरशः स्वतःची ओळख आणि स्वतंत्र गमावून बसते.उभरत्या वयामध्ये मिळणाऱ्या फ्रीडम वर बंधनं येत असल्यामुळे तिच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागतो.फ्रीडम च्या शोधात असलेल्या आणि बंधनाचे जाळे तोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या राधिकाच्या आयुष्यात हिमांशू चे पदार्पण होते. लेखक असलेला हिमांशू आणि चित्रकार असलेली राधिका ह्यांच्यात छान मैत्री चे नाते जमते. मैत्रीच्या पुढे नाते जात असताना राधिका एका वेगळ्याच प्रॉब्लेम मध्ये अडकून बसते.फारसे नाव न ऐकलेल्या आजाराचा राधिकाला सामना करावा लागतो.हा आजार तिची कसोटी पाहणारा ठरतो.ह्या न ऐकलेल्या आजारापासून डॉक्टर हेमंत(राधिकाचे फॅमिली डॉक्टर ),समीर कारखानीस(राधिकाचा बालमित्र ),मॉडर्न ईशा(राधिकाची मैत्रीण) राधिकाला पूर्णपणे बाहेर काढतात. नेव्ही ऑफिसर असलेल्या समीर आणि राधिका ह्यांच्यात तिच्या आजारादरम्यान मैत्रीच्या ही पुढे नाते निर्माण होऊ लागते.मुलींवर घरातून येणारे दडपण आणि रूढी बंधनं ह्यावर कथेमध्ये प्रखर प्रकाश टाकण्यात आला आहे.राधिका ची मानसिक अवस्था आणि भावना अतिशय पॉवरफुल पद्धतीने मांडल्या आहेत.पूर्ण कथेमध्ये राधिकाच्या भावनांचे जब्राट पद्धतीने सादरीकरण केले आहे.पारंपरिक विचारांचे असलेले तिच्या वडिलांचा आणि भावाचा तिच्यावर असणारा बंधनांचा दरारा,राधिकाला पुरुषांबद्दल वाटणाऱ्या भावना रोखठोक पद्धतीने मांडल्या आहेत.कोण होता हिमांशू?काय आहे हा विचित्र आजार ?कोण आहे समीर कारखानीस?
माझ्याकडून ****
लेखन:-कौशिक
इचलकरंजी
©
लेखिका:-स्नेहल क्षत्रिय
उपलब्ध :-ऍमेझॉन किंडल,बुकहंगामा.कॉम
No comments:
Post a Comment