Saturday, 4 February 2017

IMTEX-2017

IMTEX -२०१७  चा कार्यक्रम जाहीर झाला व माझी बंगलोर ला IMTEX-२०१७ ला जायची उत्सुकता वाढली . तब्बल ८  दिवस पूर्ण IMTEX (इंडियन मशीन टूल एक्सिबिशन) असल्याने व नवीन मशीनरी ,नवनिर्मिती पाहायला मिळणार असल्यामुळे मी खूप उत्सुक होतो . कॅडकॅम व ऑटोमेशन व नवीन तंत्रज्ञान ह्या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती घ्यायला  मी बंगलोर ला निघालो . दक्षिण भारताची गार्डन व प्लॅटिनम सिटी मध्ये प्रवास करणे हा एक खूप सुखद अनुभव होता .बरोबर पहाटे ६ वाजता मी  बंगलोर ला पोचलो . एव्हाना थंडी नाहीशी झाली होती . हॉटेल वर जाऊन फ्रेश होऊन मी थेट तुमकूर रोड ला असलेलं इंडियन मशीन टूल एक्सिबिशन ला निघालो . मी ब्रिगेड रोड ला उतरलो असल्याने तुमकूर ला पोहोचायला बराच वेळ जाणार होता .ओला च्या टॅक्सी मधून एक्सिबिशन ला निघालो . एक्सिबिशन ला जाताना सर्वप्रथम बंगलोर शहर पहायचा योग आला . प्रशस्त व खड्डा नसलेले रस्ते मी पहिल्यांदा पाहत होतो . झपाट्याने जाणारी मोनो रेल पाहत मी अखेर ईमटेक्स ला पोचलो . एमटेक्स हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन असल्याने त्याची भव्यता मला जाणवली . व्हिसिटर चा बिल्ला घालून मी प्रदर्शन पाहायला पुढे निघालो . ४८००० SQUARE फूट एवढ्या जागेत व्यापलेल्या प्रदर्शनाची म्हणजे काय असते हे मी सर्वप्रथम पाहत होतो ,चारी बाजूला शिस्तीमध्ये येणारे उद्योजक व अनिवासी भारतीय ,प्रदर्शनामध्ये आलेल्या पाहुण्यांची  -प्रवेशद्वार पासून प्रदर्शन हॉल पर्येंत मदतीला असणारे  आधुनिक इलेक्ट्रिक पॅसेंजर गाडी ,नवनिर्मिती व मेक इन इंडिया  चे लावलेल्या जाहिराती ,दिमतीला असलेले मदतनीस ,पोटपूजा करण्यासाठी दिमतीला असलेले फूड कोर्ट आणि कडक स्वच्छता हे सर्व वातावरण पाहून मी भारावून गेलो . ४८००० SQUARE फूट एवढ्या जागेमध्ये तब्बल ६ हॉल मध्ये सर्व प्रदर्शन भरले होते . हॉल १ च्या बाहेर प्रदर्शनामध्ये भाग घेतले असलेल्या कंपन्यांची नावं होती. मशीन मॅनुफॅक्चर ,टुलिंग मधल्या अग्रेसर कंपन्या ,Hydraulics व P neumatics च्या कंपन्या ,ऑटोमेशन मधील कंपन्या ,कॅडकॅम मधील उगवत्या कंपन्या आणि अभियांत्रिकी व्यवसाय मधल्या अग्रेसर कंपन्या एवढ्या मिळून ७५०कंपनी ह्या प्रदर्शनामध्ये होत्या . मी प्रदर्शन पाहायला सुरवात केली व आंतरराष्ट्रीय प्रदर्शन म्हणजे काय असते ह्याचा अनुभव घेत होतो . माझ्यासारख्या वयाच्या मुलांना अश्यावेळी काय पाहू आणि काय नाही हे पटकन उमजत नाही . सर्व स्टॉल पाहणे हे शक्य नसल्याने मी काही नेमके स्टॉल पाहिले
FIE PRIVATE LTD -स्पेशल पर्पज मशीन,CNC मशीन  बनवणारी फाय च्या स्टॉल वर स्वयंचलित रॉकवेल  हार्डनेस टेस्टर ,कॉम्प्रेसर टेस्टर ,आणि स्प्रिंग टेस्टिंग मशीन पाहायला व त्याचा कामात कसा उपयोग होईल हि नाविन्यपूर्ण माहिती मिळाली.  
POLYWORKS इंडिया -  कॅनडा मधील कॅम आणि ३डी स्कॅन मधील अग्रेसर असलेली ह्या कंपनी च्या स्टॉल वर ३डी स्कॅनिंग व ३डी  चा वापर करून आपली Quality सुधारणा कशी करावी ह्याबाबत पूर्ण नवीन माहिती मिळाली . कॅडकॅम आणि ३डी स्कॅनिंग हे दोन क्षेत्र माझं आवडीचे असल्याने मी खूप उत्सुक होतो . 3D स्कैनिंग  इंस्पेक्शन ही संकल्पना कशी असते ह्याची ह्या स्टॉल  वॉर माहिती मिळाली.
MASTERCAM व CAMWORKS-  1983 ला अमेरिका मध्ये सुरु झालेली MASTERCAM  व Dassult ची CAMWORKS हे सॉफ्टवेअर नव्याने पाहायला मिळाले . २D -३D ड्रॉईंग व दृफ्टिंग,असेम्ब्ली ,सिम्युलेशन चा वापर करून मशिनिंग करताना सायकल TIME कसा कमी करता येईल हि नवीन माहिती इथे मिळाली .
JYOTI CNC-  भारतातली CNC MACHINE तयार करण्यात  सर्वात अग्रेसर असलेली ज्योती च्या स्टॉल वॉर CNC MACHINE  च्या असंख्य ५ ऍक्सिस पर्येंत असलेल्या TURNING CENTER  मशीन विक्रीला होत्या .
MARSHAL MACHINE TOOLS- AUTOMATION  चा वापर करून मानवविरहित मशीनिंग लाईन कशी असते ह्याचा एक डेमो पाहायला मिळाला ज्यामध्ये कुका नावाचा रोबो ३ CNC मशीन हाताळत होता व मशीनिंग करून झाल्यावर ऑनलाईन जॉब ची तपासणी करून थेट पॅकिंग मध्ये जॉब पोहोचवत  होता ह्या डेमो मध्ये मशीन लाईन मानवविरहित कशी चालू शकते हे उदाहरण होते
ऑटोमेटेड CNC
OOASIS 


इथे मला आणखीन एक मशीन पाहायला मिळाले . ह्या मशीन मध्ये कौशल्याची गरज न भासता फक्त जॉब मध्ये ठेवल्यावर त्याचे सर्व READING कॉम्पुटर मध्ये डिस्प्ले होतात . OOASIS असे नाव असलेल्या मशीन ची किंमत हि CMM पेक्षा १० टक्के कमी आहे.
SOLIDCAM व ऑटोडेस्क -DESIGN व कॅडकॅम हे माझं आवडीचे काम असल्याने मी कॅडकॅम ची ताजी व सध्या चालू असलेल्या सॉफ्टवेअर ची कायम माहिती घेतो . सॉफ्टवेअर चा वापर करून CNC व VMC  प्रोग्रामिंग कसे करावे ह्याची उत्तम माहिती मिळाली .
SCHUNK व FESTO-  इथे पिक अँड प्लेस ह्या वापरासाठी रोबो चा डेमो होता ज्याचा उपयोग INSPECTION,JOB LOADING,PACKING,वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ठेवणे ह्यासाठी उपयोग होईल .
PICK AND PLACE ROBO


3d scanning zeiss
HUMANOIDROBO
मी पाहिलेले व क्षणचित्रे काढलेले काही मशीन
बोईंग लँडिंग व्हील माझांक मेक







टुलिंग ,viberation,bearing,oil,lubricant,casting ह्या सर्व संदर्भ व चे स्टॉल तिथे ७ दिवस चालू होते. Mechanical engg व manufacturing क्षेत्राला लागणारे सर्व मार्गदर्शन तिथे समोर ७ दिवस होते . मेक इन इंडिया च्या अंतर्गत नवीन संशोधन व माहिती तिथे पाहायला मिळाली . ७५० स्टॉल व ७ दिवस प्रदर्शन व प्रत्येक स्टॉल ची माहिती हि घेणे शक्यच नव्हते . अश्या ठिकाणी जाण्याचा फायदा खूप मिळाला . मार्केट मध्ये कुठल्या कंपन्या आहेत ,कुठले टुलिंग सध्या चालू आहे ,नवीन कॅडकॅम सॉफ्टवेअर कुठले आहेत ,MULTIGAUGING च्या काय कल्पना आहेत ,VMC CNC MACHINES HARDNESS TESTER कुठले आहेत ,त्याच्या किमती ,त्याचे माहितीपत्रक ,नवीन जॉब तपासणी पद्धत ,रोबोट ,ऑटोमेशन व अभियांत्रिकी चे असंख्य प्रकार व सर्वात महत्वाचे म्हणजे अश्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सर्व उद्योजक येत असल्याने त्यांना जवळून पाहायला मिळाले ,त्यांचे प्रेसेंटेशन ,त्यांचे बोलणे अश्या असंख्य गोष्टी अनुभवास मिळाल्या . नक्कीच अश्या प्रदर्शनात भेट देऊन आपला व्यावरहीक attitude वाढीस मदत मिळते म्हणून इमटेक्स सारखे प्रदर्शन कधीच चुकवू नये तिथे अवश्य जावे. २ वर्षातून एकदा .
लेखन -कौशिक श्रोत्री
९९२१४५५४५३

Wednesday, 25 January 2017

सिने परीक्षण -काबिल

ह्रितिक रोशन एक राजपुत्राला साजेसे असलेलं एक व्यक्तिमत्व व अभिनेत्याला एका अंध व्यक्तिरेखेच्या भूमिकेत पाहणे जरा कठीणच होते . पण सिनेमा पाहिल्यावर हा एक नक्कीच कसलेला अभिनेता आहे हे जाणवत राहते .
सिनेमा ची कथा  रोहन भटनागर (ह्रितिक रोशन) व सुप्रिया (यामी गौतम ) ह्यांच्याबोवती फिरते . एक कसलेला परंतु अंध असूनही नकलाकार असलेला रोहन भटनागर(ह्रितिक रोशन ) ची भेट एका अंध असलेली मुलगी सुप्रिया (यामी गौतम )शी होते . पुढचे आयुष्य एकत्र जगण्याचे दोघे एकमेकांना वाचन देतात व एकत्र येतात . एकत्र येऊन पुढच्या आयुष्याची वाटचाल सुरु असताना सुप्रिया (यामी गौतम ) चा एका अनपेक्षित घटनेने मृत्यू होतो . ह्या अनपेक्षित घटनेमध्ये एका राजकीय पुढार्यांचा भावाचा सहभाग असल्याने त्याचा रोहन भटनागर (ह्रितिक रोशन ) च्या आयुष्यावर परिणाम करून जातो .पुढे न्याय व्यवस्था कडून पूर्ण न्याय न मिळाल्याने व घटनेला राजकीय वरदहस्त मिळाल्याने रोहन भटनागर ( ह्रितिक रोशन ) अखेर स्वतः पुढे होऊन अत्यंत चलाखीने व धूर्तपणे थंड डोक्याने खेळी करून आपल्या पत्नीच्या मारेकर्यांना शोधून काढतो व सिनेमा संपतो . सिनेमा पाहताना आपण अशी कथा असलेले सिनेमे पहिले असल्याचं जाणवते . यामी गौतम न एका अंध मुलीची भूमिका खूप चांगली केली आहे .एक साधी ,सरळ असलेली एका मुलीची भूमिका तिला खूप छान जमली आहे . नरेंद्र झा व मराठमोळा गिरीश कुलकर्णी ह्या २ अभिनेत्यांना   एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका पूर्णपणे पेलली आहे. खलनायक असलेले रोहित व रोनित रॉय हे दोघे भूमिकेत  फिट बसतात. अखेर सिनेमाचे प्रमुख आकर्षण ह्रितिक रोशन . ६फूट ,पिळदार शरीरयष्टी ,गोरापान व ज्याच्याकडे पाहताच समस्त तरुणांचा आदर्श व   समस्त तरुणींचा लाडका असलेला व राजपुत्राला हि लाजवेल व सुप्रसिद्ध डान्सर  असे व्यक्तिमत्व असलेले ह्रितिक रोशन हा ह्या सिनेमा मध्ये आपल्या अभिनयाचा शेवट(सर्वोच ) करतो . एका अंध व्यक्तीची भूमिका करताना त्याचा त्याने केलेला  बारीक अभ्यास,अंध व्यक्तीची रोजच्या असलेल्या गोष्टी व  मेहनत आपल्याला जाणवते . मध्यंतरानंतर कथेमध्ये पूर्ण बदल होतो व व्यवस्थेच्या  च्या विरोधात लढाई करायचे धाडस करतो व हा अभिनय आपल्याला सिनेमा मध्ये आणखीन खोलवर घेऊन जातो . कथेमध्ये अंध व्यक्ती ह्या पूर्णपणे स्वावलंबी व स्व-कमाई करणारे व स्वतः स्वतंत्र राहणारे आहेत ह्यावर अधिक प्रकाश टाकला आहे हे वेगळेपण पूर्ण जाणवते .कुठल्याही व्यक्तीला कमी लेखू नये ह्यावर कथेमध्ये प्रकाश पडला आहे .
सिनेमाच्या  कथेमध्ये खूप उणिवा जाणवतात . ह्रितिक रोशन व यामी गौतम हे अंध कसे झाले ह्याचा उलगडा सिनेमा मध्ये होत नाही . दोघांच्याही घरचे एक हि व्यक्ती नाहीत हे पाहून जरा आश्चर्य होते . पण ह्रितिक रोशन हा अष्टपैलू अभिनेता आपल्याला कथेच्या उणीव विसरायला लावतो व आपल्याला कथेच्या पूर्ण खोलात घेऊन जातो. एक उपेक्षित पात्र ह्रितिक रोशन ने पूर्ण मेहनतीने रंगवले आहे .  सिनेमा चे संगीत आपली पूर्ण निराशा करते . कथेचे  मास्टरटेलर असलेले  राकेश रोशन व ह्रितिक रोशन आपले पैसे पूर्ण पणे फेडतात .
माझ्याकडून ह्या सिनेमाला फर्स्ट क्लास .
जरूर पाहावा .

लेखन -कौशिक श्रोत्री
९९२१४५५४५३
©

Monday, 16 January 2017

सिने परीक्षण ट्रिपल X -रिटर्न ऑफ क्सान्डर केज

XXX-नावावरून ह्या सिनेमाची कथा हि अतिशय रोमांचकारी असणार अशी मला खात्री होती . हॉलिवूड चा अष्टपैलू अभिनेता,लेखक ,स्क्रिप्ट लेखक  विन  डिझेल चा मी अट्टल चाहता असल्याने हा  सिनेमा मी चुकवायचा नाही असे ठरवले . सदरच्या सिनेमाची कथा  XANDER CAGE (vin diesel ) एक सरकारी गुप्तहेर च्या आयुष्यापासून सुरवात होते . प्रचंड बलशाली व्यक्तिमत्व ,टॅटू नि गोंदवून घेतलेले व ८ बिस्कीट असलेले शरीर ,अतिशय चपळ व स्वतःचे आयुष्य मनसोक्त जगणाऱ्या  एक ऍथलेट असलेला हा विन एका मोठ्या अपघातापासून बचावतो . नंतर त्याची भेट एका गुप्तहेर संस्थेच्या एका प्रमुखांशी होते.अमेरिकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असलेले व अंतराळातले उपग्रहांची देखरेख करणारे एक गॅजेट अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थेमधून चोरीला जाते . अतिशय महत्वाचे असलेले गॅजेट शोधण्याची जबाबदारी अमेरिकेतील सर्वोच्च असलेली संस्था Xander कडे सोपवते . ४ लोकांचा समूहाने ते गॅजेट ची चोरी केली आहे हे कळल्यावर त्या गॅजेट च्या शोधात निघालेल्या Xander  ची भेट सेरेना (दीपिका पदुकोन )शी होते .दीपिका ,डोणी येन ,रुबी रॉस ह्या लोकांकडे असलेले गॅजेट खोटे आहे हे कळल्यावर  कथेमध्ये मोठा ट्विस्ट येतो व Xander,सेरेना  व त्याची टीम मोठ्या पेचात सापडती . त्यातून मोठ्या चलाखीने Xander व त्याच्या टीम ला गॅजेट सापडते व सिनेमा संपतो .
सदरचा सिनेमा पहिल्या शॉट पासून आपल्याला गुंतवून ठेवतो . विन डिझेल चे अफलातून स्टंट ,५० फूट टॉवर वरून मारलेली उडी ,वेळ आणि वेग ह्या २ गोष्टींशी सांगड ना घालता ऑडी ह्या गाडीच्या वेगाला थक्क करणारे त्याचे स्केटिंग कौशल्य , समुद्राच्या लाटेतूनही आरपार जाणारी  त्याची गाडी ,पॅराशूट न घालता १००० फूट आकाशातून मारलेली उडी ,निव्वळ डोळ्यांच्या नजरेने व व्यक्तिमत्वाने  सिनेमा मध्ये मुलींना हि आपलंसं करणारे Xander चे व्यक्तिमत्व पाहून टाळ्या व शिट्यांचा मोह आवारात नाही . हॉंकॉंग चा अभिनेता Donnie व ऑस्ट्रेलिया ची अभिनेत्री रुबी रोझ चा अभिनय व स्टंट पाहून आपले ८० टक्के पैसे वसूल होतात . भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोन ची छाप ह्या सिनेमा मध्ये दिसते . पण विन डिझेल च्या अभिनय व व्यक्तिमत्वासमोर ती फिकी पडते . सिनेमा ची कथा थोडीफार फास्ट अँड  furious च्या कथेशी आठवण करून देते .कथेमधील काही उणिवा आहेत .त्याची भरपाई विन डिझेल कडून होते . 
निखळ मनोरंजन ,स्टंट बाजी,विन डिझेल चा अभिनय व गोरीघारी दीपिका पदुकोन ला पाहण्यास हा सिनेमा नक्की पाहावा 
पूर्ण पैसे वसूल . 
३ स्टार्स 
लेखन -कौशिक विद्याधर श्रोत्री 
९९२१४५५४५३
वितरणाचे सर्व हक्क राखीव .


Monday, 26 December 2016

इंजिनीरिंग

माझा दिवस रोज सकाळी ६. ०० ला सुरु होतो . सकाळी निद्रेतून बाहेर आल्यावर सकाळ ,महाराष्ट्र टाइम्स ,टाइम्स ऑफ इंडिया वाचल्याशिवाय दिवसाची सुरवात सध्या कुणाचीच होत नाही . सकाळ व महाराष्ट्र टाइम्स मध्ये मी सध्याच्या बातम्या ,आर्थिक बातम्या ,नोकरीच्या बातम्या वाचत होतो . पेपर वाचत असताना काही बातम्या माझे लक्ष वेधून घेत होत्या . कमी होत असलेल्या नोकऱ्या ,चालू असलेली जागतिक मंदी ,तडकाफडकी काढून टाकलेले इंजिनिअर ,ह्या  बातम्यांनी सध्या दिवस सुरु होत होता . आणखी एका बातमीने मला अस्वस्थ केले . सकाळ मध्ये पहिल्या पानावर एका दुसऱ्या वर्षी शिकत असलेल्या विद्यार्थ्याने नस कापलेली बातमी होती व टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एका तिसऱ्या वर्षी शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बिल्डिंग  वरून उडी मारलेली बातमी होती . हि बातमी वाचून  माझ्या काळजात धस्स झाले . मी चहा बाजूला ठेवला व पूर्ण बातमी वाचली . हे विद्यार्थी मेकॅनिकल इंजिनीरिंग ला शिकणारे होते  . सुदैवाने त्यांना वाचवण्यात यश आले असल्याने मला  हायसे वाटले . त्यांनी एवढ्या टोकाचा  घेतलेला निर्णय ह्यामागचे कारण होते त्यांना शिक्षणात आलेले अपयश .हे कारण वाचल्यावर मला त्या दोघांचा खूप राग आला . त्यांनी का आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला ?ते नर्वस होते का ?त्यांना स्वतःच्या आयुष्याबद्दल प्रेम नव्हते ?त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण हेच सर्वोच्च  मानले ?

ह्या नकारात्मक बातम्या वाचून मी पुढे पेपर वाचन केले नाही . मी चहा पिऊन आवरलो व सॅक घेऊन सकाळी ६.३० ला व्यायाम करण्यासाठी बाहेर पडलो . जिम ला  जाताना मी विचार करत होतो . मला त्या दोन मुलांची दया आली . अपयश पचवायची त्यांच्यात हिम्मतच  नव्हतीच का ?त्यांच्याकडे कुणी शिक्षकांनी लक्ष का नाही दिले ?त्यांच्या आई वडिलांना किती त्रास झाला असणार  ?एवढ्या टोकाला जायचे काय कारण होते ?

मला माझं मेकॅनिकल इंजिनीरिंग चे दिवस आठवले . मला सांगायला अजिबात संकोच वाटत नाही की मी तीनदा नापास झालो होतो . बऱ्याचदा मला काही ठराविक शिक्षकांनी बोलून बोलून माझे जोरदार
खच्चीकरण  करत होते .तोंडी परीक्षण च्या वेळेस बऱ्याचदा मला तोंडावर अपमानास्पद बोलणे ऐकून घ्यावे लागले होते . मी नापास झाल्यावर माझ्यावर झालेला त्याचा नकारात्मक परिणाम  मी अनुभवला आहे ,नापास होणे म्हणजे जणू काही फार मोठा गुन्हा करणे असे हावभाव असलेले चेहरे मी पाहिले आहेत .माझ्या कॉलेज च्या एक सिनियर शिक्षकाने मला शिक्षण पूर्ण करण्याचे थेट आव्हान दिले होते . पण ह्या सर्व गोष्टीना मी पुरून उठलो व माझा शिक्षण हे फर्स्ट क्लास नि पूर्ण झाले . ह्या सर्व माझं खचीकरण करणार्यांना मी खोटे ठरवले व निव्वळ जिद्दीवर माझं शिक्षण पूर्ण झाले होते . 
इंजिनीरिंग हे कधीच सोप्पे नसते व कधीच अवघड नसते व कुणीही इंजिनीरिंग गृहीत धरून चालू नये . नस कापणे,आत्महत्या करणे हा समस्यांवर उपाय नाही . आपल्या आयुष्यात यश अपयश व नोकरी कधीच कायमची नसतात . नापास होणे हे नैसर्गिक आहे . जो माणूस काम करतो तोच अपयशी होती . स्वतःवर पूर्ण आत्मविश्वास असल्यावर ह्या जगात अशक्य असे काही नाही . कुणी हुशार नसतो व कुणी ढ नसतो सर्वाना समान बुद्धिमत्ता असते . शिक्षण घेताना किंवा नोकरी करताना अपयश येणार ते कुणी टाळू शकत नाही पण तेच अपयश पचवून धक्के खाऊन जो पुढे जात राहतो तोच नंतर जिंकतो .मला शिक्षण पूर्ण करायचेच होते त्यामुळे सर्व आलेल्या धक्क्यांना पुरून उठून पुढे जात राहिलो व ३ डिग्री पूर्ण करून स्वतःच्या नजरेत मी कधीच अपयशी झालो नाही . अंगात जिंकण्याचा किडा असल्यावर येणाऱ्या अपयशाने आपण कधीच खचून जात नाही . मी विचार केला आता हि दोन मुले काय करणार ?त्यांच्या आई वडिलांना काय वाटणार ?त्यांना धीर कोण देणार ?आता येणाऱ्या टोमण्यांना ते कसे तोंड देणार ?
मी तळवलकर ला पोचलो . हे जिम माझे आवडते आहे . मी माझा पोशाख बदलून थेट जिम Floor ला  गेलो . तिथे असलेले काही सुविचार मला उत्साहित करीत होते . 
''I am neither clever, nor intelligent but i am successful bcoz i kept going and going and going'.
''Every champion was once contendor who refused to give up''
हॉलिवूड च्या रॉकी सिनेमाची हे सुविचार अनुभवाचे बोल होते . असे सुविचार आपला दिवस नक्कीच आशादायी करतात . मी मनातल्या मनात प्रार्थना केली ती दोन मुले सुखरूप असतील व मी  रॉकी बाल्बोआ  च्या गाण्यावर वोर्क आऊट ला सुरवात केली . 

Rising up, back on the street

Did my time, took my chances

Went the distance, now I'm back on my feet

Just a man and his will to survive

So many times it happens too fast

You trade your passion for glory

Don't lose your grip on the dreams of the past

You must fight just to keep them alive

It's the eye of the tiger

It's the thrill of the fight

Rising up to the challenge of our rival


लेखन -कौशिक श्रोत्री 
९९२१४५५४५३
©

Friday, 23 December 2016

सिने परीक्षण -दंगल

आमिर खान एक अष्टपैलू कलाकार व हिंदी सिनेमा च एक अजब रसायन व सिनेमाचं विद्यापीठ .!!तब्बल २ वर्षांनी ह्या अष्टपैलू कलाकाराचा सिनेमा पाहायचा योग आला आणि प्रतिवर्षी प्रमाणे हाही सिनेमा आपल्या अपेक्षा अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरतो  . सिनेमा ची कथा सुरु आहे तरुण असलेला कुस्तीपटू महावीर फोगत (आमिर खान) व त्यांचे  कुस्ती प्रेम ह्या २ गोष्टींभवती फिरते . ऐन उमेदीचा काळात अत्यंत चिकट व तडफदार असलेला महावीर फोगट ना काही कारणास्तव कुस्ती सोडावी लागते  व त्यांचे गोल्ड मेडल जिंकायचे स्वप्न भंगते .कुस्ती ला सर्वस्व मानणारे व भारतासाठी गोल्ड मेडल चे स्वप्न असलेले महावीर फोगट कालांतरानंतर हे स्वप्न आपल्या पुढच्या पिढी कडून  पूर्ण करून घ्यायचे ठरवतात . पण  मुली असल्याने त्या  हे स्वप्न पूर्ण करू शकतील काय हि शंका महावीर ह्यांना सतावते . पण एका प्रसंगामुळे महावीर ह्यांचा आपल्या मुलींवर विश्वास बसतो व ते आपल्या मुलींना कुस्ती साठी बालपणापासून तयार करायला सुरु करतात . पण मुली असल्याने मुलं /मुली अश्या भेदाला त्यांना सामोरे जावे लागते . कुस्ती हि पुरुषांची मक्तेदारी असल्याने ती मुलींना जमेल काय ? हा असलेला गैरसमज व भेद महावीर फोगत ह्यांच्या मुली गीता व बबिता (सानिया मल्होत्रा व फातिमा शेख )ह्या खोडून काढतात व त्या कुस्तीमध्ये प्रत्येक लेवल ला पदक जिंकतात . पण गोल्ड मेडल जिंकायचे असलेल स्वप्न हे गीता(फातिमा  ) पूर्ण करते . सिनेमा ची कथा हि वडील व मुलींचे असलेलं हळुवार नाते ह्यावर प्रकाश टाकते . अखेर हा आमिर खान चा सिनेमा आहे त्यामुळे सुरवातीपासून फक्त आमिर खान ह्या नावाचा काय प्रभाव आहे हे जाणवत राहते . एक तरुण कुस्तीपटू ते २ मुलींचा पिता हा बदल थेटर मधेच जाऊन पाहावा . एक अभिनेता आपली भूमिका व अभिनय करण्यासाठी कसे अपार कष्ट घेतो हे पदोपदी जाणवते. Best or Nothing हा नियम वापरल्यास काही अशक्य नाही हे आमिर खान दाखवून देतो . गीता (फातिमा  )चा अभिनय हा देखील वाखाणण्याजोगा  आहे . सिनेमा ची कथा आपल्याला पूर्ण कुस्ती ह्या खेळामध्ये गुंतवून ठेवते व कुस्ती न पसंद करण्याऱ्यांना हा सिनेमा पाहताना कुस्तीची मनापासून आवड निर्माण होते .काही मिनिटे अभिनय केलेले गिरीश कुलकर्णी आपली छाप पडतात . आमिर खान ह्या  सर्वोत्कृष्ठ कलाकाराचा अभिनय पाहण्यासाठी व आपले शरीरावर प्रेम करण्याऱ्या कुस्तीपटूंनी व आपले वजन वाढलेले असताना ते कमी देखील होऊ शकते हे पाहण्यासाठी नक्की एका नाही दोनदा हा सिनेमा पहाच .
***** ५ स्टार्स 
लेखन -कौशिक श्रोत्री 
संपर्क -९९२१४५५४५३

Wednesday, 21 December 2016

नोटबंदी

८ नोव्हेंबर २०१६ हि तारीख भारताच्या इतिहासात गणली जाईल .ह्याच दिवशी भारताच्या पंतप्रधानांनी ५०० व १००० च्या नोटा ह्या भारतीय चलनातून रद्द होणार अशी अधिकृत घोषणा केली .अर्थव्यस्थेत असलेला काळा पैसे बाहेर काढण्यासाठी व अर्थव्यस्था नोटावीररहित करण्यासाठी घेतलेलं   ह्या निर्णयाने भारतीय अर्थकारण हे पूर्णपणे बदलून जाणार होते . असा हा धडाकेबाज निर्णय भारतीय जनतेने पहिल्या वेळेस पहिला .असा धडाकेबाज निर्णय भारतात घेतले जाऊ शकतात ह्यावर भारतीय जनतेचा विश्वास बसू लागला . ह्या निर्णयाने पूर्ण देशभरात काही ठिकाणी कौतुक,उत्साह,स्वागत  व काही ठिकाणी हाहाकार,विरोध होत होता . हा निर्णय झाल्यावर जनतेला ३ महिने ५०० व १००० च्या नोटा जमा करायची मुदत देण्यात आली . ह्या निर्णयाने नक्कीच एका नवीन पर्वाची सुरवात होणार होती. ATM व बँकेतून पैसे काढण्यावर काही अंशी बंदी आली . ९ नोव्हेंबर पासून हा निर्णय अमलात आल्यावर मी १५ नोव्हेंबर ला idbi बँकेत १०० च्या नोटा घेण्यास गेलो . तिथे प्रचंड गर्दी होत होती . ५०० व १००० च्या नोटबंदीनंतर २००० ची नवीन नोट येणार होती . त्यामुळे मला १०० च्या नोटा घेण्यास गत्यंतर नव्हता . मी रांगेत उभा राहिलो . रांगेत उभा असताना मला तिथे आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकू येत होत्या . 
सोने चांदी व्यापारी ,''हे सध्याचे सरकार म्हणजे काय करेल नेम नाही . ह्या सरकारने टप्पाटप्प्याने निर्णय घेतला असता तर खूप चांगले झाला असते .ह्यांनी जर आधी सर्वाना सूचना केल्या असत्या की १००० व ५०० च्या नोटा आम्ही ह्या महिन्याअखेर बंद करणार आहोत तर आम्हाला पुढचे नियोजन करता आले असते . आमचा व्यवसाय पूर्ण शांत झाला आहे  .त्यात आणि दिवसाला ४००० पैसे   बँकेतून काढण्याचे लिमिट आहे . ऐन सणासुदीच्या काळात जर गिर्हाईक नसेल तर  आम्हाला दुकानाला कुलूप घालावे लागेल.उद्या ह्यांनी सोने चांदी च्या बाबतीत निर्णय घेतल्यावर कल्याणच आहे आमच!!!! आधीचे सरकारच बरे असे वाटत आहे . ह्या निर्णयाने छोटे खानी सराफ व्यवसाय पूर्णपणे बंद पडणार आहे .

यंत्रमागधारक -''एक तर आम्ही आधीच अडचणीत आहोत त्यात आणि हि मोठी तलवार म्हणजे आम्हाला पण घरीच बसावे लागेल . आम्हाला आधीच वीजबिलाची अडचण ,कामगारांची अडचण ,मंदीचं वारा आणि हे आणि नवीन कॅशलेस म्हणजे आम्ही एक तर दुसऱ्या देशात जावे किंवा दुसरा व्यवसाय करावा ''.  

मी,''ह्या सरकारचा हा निर्णय घेण्यामागे हेतू अतिशय प्रामाणिक व स्पष्ट आहे . सर्व काळा पैसे ,भ्रष्टचार ,दहशतवाद थांबवणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नक्षलवादी ,स्मुग्लर ,दहशतवादी ,दंगलखोर ह्यांचा आर्थिक पुरवठा ५०० व १००० च्या नोटांवर होता तो ह्या निर्णयाने पूर्ण थांबणार आहे . इनकम टॅक्स लपवणारे व अमली पदार्थ व्यावसायिक ह्यांचा पतपुरवठा पूर्णपणे थांबून हा सर्व पैसे उजेडात येणार आहे . हा निर्णय आल्यापासून जम्मू काश्मीर ची परिस्तिथी पूर्ण पणे शांत आहे   जे लोक आपल्या जवानांवर दगडफेक करत होती ते पूर्णपणे थांबले आहे''. 

कॉलेज ची विद्यार्थिनी ,''तरी पण असे अचानक निर्णय घेऊन सरकारने काय साधले ?इथे मला अभ्यास सोडून इथे रांगेत पैसे काढण्यासाठी उभे राहावे लागत आहे . बाहेर एक हा हि ATM  मध्ये १०० व ५० च्या नोटा नाहीत त्यात आणि ५०० च्या जुन्या नोटा बँकेत जमा करायच्या आहेत .मला  निर्णय पटत आहे पण वेळ व पद्धत चुकीची वाटत आहे . आता अजून ३ तास मला इथेच बसावे लागणार आहेत . 

वाहतूक व्यावसायिक ,'' आमची तर पूर्ती हजामत झाली आहे राव . एक तर आमचा व्यवसाय पूर्ण हा ५० टक्के रोखीवर चालतो . लांब पाल्याची वाहतुकीला आम्हाला ड्राइवरला काही रोख पैसे द्यावे लागतात . आता आमचे ड्राइवर लांब पाल्यावर गेले आहेत त्यांनी आता काय करावे अवघडच होऊन बसले आहे .कॅशलेस व्यवहार हा आम्हाला सुद्धा आवडेल उलट आमची आर्थिक कामे जास्तच सोप्पी होतील . त्यांच्याकडे असलेल्या ५०० च्या नोटांच त्यांनी काय करावे आता ?''हा व्यावसायिक बराच त्रस्त वाटत होता . 
जशी रंग पुढे सरकत होती तसं प्रतिक्रिया वाढत होत्या . माझ्या पुढे मागे असलेल्या काही लोक व एका कॉलेज विद्यार्थिनी मध्ये संवाद सुरु होते . त्यात आता बाकीचं लोक पण प्रतिक्रिया देत होते . 

इंजिनीरिंग व्यावसायिक - इथे आम्हाला जास्त त्रास झाला नाही . आमचे सर्व व्यवहार हे चेक व क्रेडिट वर होत असल्यामुळे व इंजिनीरिंग चा व्यवसाय असल्यामुळे जास्त त्रास जाणवला नाही . फक्त आम्ही ज्या कामगारांचे पगार रोखीने करतो ते करताना थोडा त्रास आम्हाला सहन करावा लागला बाकी आमच्या स्टाफ चे पगार थेट बँक अकाउंट मध्ये जमा होतात . पण ह्या निर्णयाने देश नक्की पुढे जाणार आहे . सोने चांदी व बांधकाम क्षेत्र ह्या २ व्यवसायांमध्ये वस्तूंच्या किमती ह्या खूप कमी होणार आहेत व त्याचा आपल्यालाच होणार आहे . सर्व बँक कर्ज अत्यंत सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देतील कारण ह्या निर्णयाने बँकेमध्ये ५०० व १००० च्या प्रचंड नोटा जमा होत आहेत व व्याज दर देखील कमी होत आहेत . 

गृहिणी-घरात काम करणाऱ्या सर्व कामगारांचे पगार कसे द्यायचे हा प्रश्न पडला आहे .घरात काम करणारे कामगार काय डेबिट क्रेडिट कार्ड घेऊन फिरणार आहेत ??एवढे तरी समजायला हवे ह्या सरकारला त्यात आणि कहर म्हणजे २००० ची नोट हे सरकार बाजारात आणणार म्हणजे १०० आणि ५० रुपये च्या खरेदीसाठी आम्ही काय २००० ची नोट घेऊन फिरू काय ?कोणाकडे २००० चे सुटे पैसे असतात?उगीचच सरकारनं अमेरिका मधील कॅशलेस  पद्धत इथे मुळीच घेऊन येऊ नये. 
त्या गृहिणींचा रोकठोक संवाद ऐकून बऱ्याच जणांनी त्यांना दाद दिली . मला कॅश काउंटर वॉर जायला २ तास लागले .त्या वेळेमध्ये रांगेत उभे असलेले लोकांच्यात  अर्थव्यवस्था व कॅशलेस ह्या विषयावर खूप चर्चा चालू होती . कुणाला निर्णय आवडला कुणाला नाही आवडला कुणी त्याचा समर्थन केले . एक फरक मला जाणवला ८ नोव्हेंबर आधी मी जेव्हा बँक किंवा ATM मध्ये जात होतो तेव्हा पण थोडी गर्दी असायचे पण कुणीच कुणाशी बोलत नव्हते . पुढे उभा असलेला माणसाला मागे कोण उभा आहे कल्पना पण नव्हते . पण ८ नोव्हेंबर नंतर समोरचा ओळखीचा नसला तरी त्याचाशी ५ शब्द लोक बोलत आहेत . नोटबंदी हा निर्णय ९०% लोकांना पटला होता फक्त त्याची अंमलबजावणी ची वेळ व पद्धत चुकीची आहे असा तिथे आलेल्या सर्वांचं म्हणणे होते .ह्या निर्णयाने कमी पैशामध्ये कसे जगावे ह्याचा देखील एक धडा मिळत होता .शेवट माझा कॅश काउंटर ला नंबर आला . मी १०० च्या नोटा मोजल्या व त्या माझ्या पाकिटात ठेवल्या व जाताना तिथे असलेल्या कॅशियर च्या चेहऱ्यावर असलेला तणाव पाहून त्याला एक मार्मिक हास्य दिले व बँकेतून बाहेर पडलो . 

लेखन -कौशिक श्रोत्री 
©
९९२१४५५४५३







Sunday, 18 December 2016

सिने परीक्षण ROGUE STAR WARS

ह्या आठवड्यात मी STAR WARS च परीक्षण ना पाहता थेट सिनेमा पाहायचा निर्णय घेतला . एकंदर नावावरून ह्या सिनेमाची कथा हि उत्कृष्ट असणार अशी खात्री होती . माझ्या लेखन करिअर मध्ये सर्वप्रथम मी दिग्दर्शक व सिने अभिनेता ह्यांच्या कडे न पाहता व स्टार वॉर बद्दल जास्त माहिती नसताना थेट सिनेमा पाहायचा निर्णय घेतला . ह्या सिनेमाची सुरवात एका वैज्ञानिकाच्या(GALEN ERSO) आयुष्यापासून होती.एक अत्यंत हुशार असलेला वैज्ञानिकाच्या आयुष्यात एक वादळ येते . एका अंतराळ संस्था चा अध्यक्ष गॅलेन ला पळवून नेतो व आपल्या अत्यंत धोकादायक अश्या SHUTTLE तयार करतो जे पूर्ण एक ग्रह उध्वस्त करू पाहतो. त्याचा वापर करून अध्यक्ष जेधा नावाच एक गाव उध्वस्त करतो . नंतर ग्लेन ची मुलगी पुढे वडिलांचा वारसा पुढे न्हेत एक पायलट व एक मानवी अँड्रॉइड रोबोट व तिच्या मदतीने त्या अध्यक्षाला शोधून काढून बाहेर काढती व सिनेमा संपतो . सदरचा सिनेमा हा सुपरसॉनिक अंतराळ मधला आहे . सिनेमाच ऍनिमेशन व सिनेमॅटोग्राफी नक्की कौतुकास पात्र आहे . आधुनिक इलेक्ट्रॉनिक मधले अविष्कार व अंतराळ मधले गती व दिवा ची स्पर्धा दाखवतील . सदर सिनेमाची कथा हि पटकन उमजत नाही त्यामुळे नक्की काय चालू आहे हे समजायला सिनेमाचा शेवट येतो . मध्यंतरानंतर कथा सुमार होऊ लागते व आपल्याला कधी एकदा सिनेमा संपतो अशी जाणीव होते. फार काही खोलात न जात ज्यांना स्टार वॉर बद्दल माहिती आहे त्यांनीच हा सिनेमा पाहावा बाकीच्यांनी आपल्या मर्जीवर जावे .
१.५ स्टार
9921455453
लेखन -कौशिक श्रोत्री 
©



Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...