आमिर खान एक अष्टपैलू कलाकार व हिंदी सिनेमा च एक अजब रसायन व सिनेमाचं विद्यापीठ .!!तब्बल २ वर्षांनी ह्या अष्टपैलू कलाकाराचा सिनेमा पाहायचा योग आला आणि प्रतिवर्षी प्रमाणे हाही सिनेमा आपल्या अपेक्षा अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरतो . सिनेमा ची कथा सुरु आहे तरुण असलेला कुस्तीपटू महावीर फोगत (आमिर खान) व त्यांचे कुस्ती प्रेम ह्या २ गोष्टींभवती फिरते . ऐन उमेदीचा काळात अत्यंत चिकट व तडफदार असलेला महावीर फोगट ना काही कारणास्तव कुस्ती सोडावी लागते व त्यांचे गोल्ड मेडल जिंकायचे स्वप्न भंगते .कुस्ती ला सर्वस्व मानणारे व भारतासाठी गोल्ड मेडल चे स्वप्न असलेले महावीर फोगट कालांतरानंतर हे स्वप्न आपल्या पुढच्या पिढी कडून पूर्ण करून घ्यायचे ठरवतात . पण मुली असल्याने त्या हे स्वप्न पूर्ण करू शकतील काय हि शंका महावीर ह्यांना सतावते . पण एका प्रसंगामुळे महावीर ह्यांचा आपल्या मुलींवर विश्वास बसतो व ते आपल्या मुलींना कुस्ती साठी बालपणापासून तयार करायला सुरु करतात . पण मुली असल्याने मुलं /मुली अश्या भेदाला त्यांना सामोरे जावे लागते . कुस्ती हि पुरुषांची मक्तेदारी असल्याने ती मुलींना जमेल काय ? हा असलेला गैरसमज व भेद महावीर फोगत ह्यांच्या मुली गीता व बबिता (सानिया मल्होत्रा व फातिमा शेख )ह्या खोडून काढतात व त्या कुस्तीमध्ये प्रत्येक लेवल ला पदक जिंकतात . पण गोल्ड मेडल जिंकायचे असलेल स्वप्न हे गीता(फातिमा ) पूर्ण करते . सिनेमा ची कथा हि वडील व मुलींचे असलेलं हळुवार नाते ह्यावर प्रकाश टाकते . अखेर हा आमिर खान चा सिनेमा आहे त्यामुळे सुरवातीपासून फक्त आमिर खान ह्या नावाचा काय प्रभाव आहे हे जाणवत राहते . एक तरुण कुस्तीपटू ते २ मुलींचा पिता हा बदल थेटर मधेच जाऊन पाहावा . एक अभिनेता आपली भूमिका व अभिनय करण्यासाठी कसे अपार कष्ट घेतो हे पदोपदी जाणवते. Best or Nothing हा नियम वापरल्यास काही अशक्य नाही हे आमिर खान दाखवून देतो . गीता (फातिमा )चा अभिनय हा देखील वाखाणण्याजोगा आहे . सिनेमा ची कथा आपल्याला पूर्ण कुस्ती ह्या खेळामध्ये गुंतवून ठेवते व कुस्ती न पसंद करण्याऱ्यांना हा सिनेमा पाहताना कुस्तीची मनापासून आवड निर्माण होते .काही मिनिटे अभिनय केलेले गिरीश कुलकर्णी आपली छाप पडतात . आमिर खान ह्या सर्वोत्कृष्ठ कलाकाराचा अभिनय पाहण्यासाठी व आपले शरीरावर प्रेम करण्याऱ्या कुस्तीपटूंनी व आपले वजन वाढलेले असताना ते कमी देखील होऊ शकते हे पाहण्यासाठी नक्की एका नाही दोनदा हा सिनेमा पहाच .
***** ५ स्टार्स
लेखन -कौशिक श्रोत्री
संपर्क -९९२१४५५४५३
No comments:
Post a Comment