Wednesday 21 December 2016

नोटबंदी

८ नोव्हेंबर २०१६ हि तारीख भारताच्या इतिहासात गणली जाईल .ह्याच दिवशी भारताच्या पंतप्रधानांनी ५०० व १००० च्या नोटा ह्या भारतीय चलनातून रद्द होणार अशी अधिकृत घोषणा केली .अर्थव्यस्थेत असलेला काळा पैसे बाहेर काढण्यासाठी व अर्थव्यस्था नोटावीररहित करण्यासाठी घेतलेलं   ह्या निर्णयाने भारतीय अर्थकारण हे पूर्णपणे बदलून जाणार होते . असा हा धडाकेबाज निर्णय भारतीय जनतेने पहिल्या वेळेस पहिला .असा धडाकेबाज निर्णय भारतात घेतले जाऊ शकतात ह्यावर भारतीय जनतेचा विश्वास बसू लागला . ह्या निर्णयाने पूर्ण देशभरात काही ठिकाणी कौतुक,उत्साह,स्वागत  व काही ठिकाणी हाहाकार,विरोध होत होता . हा निर्णय झाल्यावर जनतेला ३ महिने ५०० व १००० च्या नोटा जमा करायची मुदत देण्यात आली . ह्या निर्णयाने नक्कीच एका नवीन पर्वाची सुरवात होणार होती. ATM व बँकेतून पैसे काढण्यावर काही अंशी बंदी आली . ९ नोव्हेंबर पासून हा निर्णय अमलात आल्यावर मी १५ नोव्हेंबर ला idbi बँकेत १०० च्या नोटा घेण्यास गेलो . तिथे प्रचंड गर्दी होत होती . ५०० व १००० च्या नोटबंदीनंतर २००० ची नवीन नोट येणार होती . त्यामुळे मला १०० च्या नोटा घेण्यास गत्यंतर नव्हता . मी रांगेत उभा राहिलो . रांगेत उभा असताना मला तिथे आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकू येत होत्या . 
सोने चांदी व्यापारी ,''हे सध्याचे सरकार म्हणजे काय करेल नेम नाही . ह्या सरकारने टप्पाटप्प्याने निर्णय घेतला असता तर खूप चांगले झाला असते .ह्यांनी जर आधी सर्वाना सूचना केल्या असत्या की १००० व ५०० च्या नोटा आम्ही ह्या महिन्याअखेर बंद करणार आहोत तर आम्हाला पुढचे नियोजन करता आले असते . आमचा व्यवसाय पूर्ण शांत झाला आहे  .त्यात आणि दिवसाला ४००० पैसे   बँकेतून काढण्याचे लिमिट आहे . ऐन सणासुदीच्या काळात जर गिर्हाईक नसेल तर  आम्हाला दुकानाला कुलूप घालावे लागेल.उद्या ह्यांनी सोने चांदी च्या बाबतीत निर्णय घेतल्यावर कल्याणच आहे आमच!!!! आधीचे सरकारच बरे असे वाटत आहे . ह्या निर्णयाने छोटे खानी सराफ व्यवसाय पूर्णपणे बंद पडणार आहे .

यंत्रमागधारक -''एक तर आम्ही आधीच अडचणीत आहोत त्यात आणि हि मोठी तलवार म्हणजे आम्हाला पण घरीच बसावे लागेल . आम्हाला आधीच वीजबिलाची अडचण ,कामगारांची अडचण ,मंदीचं वारा आणि हे आणि नवीन कॅशलेस म्हणजे आम्ही एक तर दुसऱ्या देशात जावे किंवा दुसरा व्यवसाय करावा ''.  

मी,''ह्या सरकारचा हा निर्णय घेण्यामागे हेतू अतिशय प्रामाणिक व स्पष्ट आहे . सर्व काळा पैसे ,भ्रष्टचार ,दहशतवाद थांबवणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नक्षलवादी ,स्मुग्लर ,दहशतवादी ,दंगलखोर ह्यांचा आर्थिक पुरवठा ५०० व १००० च्या नोटांवर होता तो ह्या निर्णयाने पूर्ण थांबणार आहे . इनकम टॅक्स लपवणारे व अमली पदार्थ व्यावसायिक ह्यांचा पतपुरवठा पूर्णपणे थांबून हा सर्व पैसे उजेडात येणार आहे . हा निर्णय आल्यापासून जम्मू काश्मीर ची परिस्तिथी पूर्ण पणे शांत आहे   जे लोक आपल्या जवानांवर दगडफेक करत होती ते पूर्णपणे थांबले आहे''. 

कॉलेज ची विद्यार्थिनी ,''तरी पण असे अचानक निर्णय घेऊन सरकारने काय साधले ?इथे मला अभ्यास सोडून इथे रांगेत पैसे काढण्यासाठी उभे राहावे लागत आहे . बाहेर एक हा हि ATM  मध्ये १०० व ५० च्या नोटा नाहीत त्यात आणि ५०० च्या जुन्या नोटा बँकेत जमा करायच्या आहेत .मला  निर्णय पटत आहे पण वेळ व पद्धत चुकीची वाटत आहे . आता अजून ३ तास मला इथेच बसावे लागणार आहेत . 

वाहतूक व्यावसायिक ,'' आमची तर पूर्ती हजामत झाली आहे राव . एक तर आमचा व्यवसाय पूर्ण हा ५० टक्के रोखीवर चालतो . लांब पाल्याची वाहतुकीला आम्हाला ड्राइवरला काही रोख पैसे द्यावे लागतात . आता आमचे ड्राइवर लांब पाल्यावर गेले आहेत त्यांनी आता काय करावे अवघडच होऊन बसले आहे .कॅशलेस व्यवहार हा आम्हाला सुद्धा आवडेल उलट आमची आर्थिक कामे जास्तच सोप्पी होतील . त्यांच्याकडे असलेल्या ५०० च्या नोटांच त्यांनी काय करावे आता ?''हा व्यावसायिक बराच त्रस्त वाटत होता . 
जशी रंग पुढे सरकत होती तसं प्रतिक्रिया वाढत होत्या . माझ्या पुढे मागे असलेल्या काही लोक व एका कॉलेज विद्यार्थिनी मध्ये संवाद सुरु होते . त्यात आता बाकीचं लोक पण प्रतिक्रिया देत होते . 

इंजिनीरिंग व्यावसायिक - इथे आम्हाला जास्त त्रास झाला नाही . आमचे सर्व व्यवहार हे चेक व क्रेडिट वर होत असल्यामुळे व इंजिनीरिंग चा व्यवसाय असल्यामुळे जास्त त्रास जाणवला नाही . फक्त आम्ही ज्या कामगारांचे पगार रोखीने करतो ते करताना थोडा त्रास आम्हाला सहन करावा लागला बाकी आमच्या स्टाफ चे पगार थेट बँक अकाउंट मध्ये जमा होतात . पण ह्या निर्णयाने देश नक्की पुढे जाणार आहे . सोने चांदी व बांधकाम क्षेत्र ह्या २ व्यवसायांमध्ये वस्तूंच्या किमती ह्या खूप कमी होणार आहेत व त्याचा आपल्यालाच होणार आहे . सर्व बँक कर्ज अत्यंत सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देतील कारण ह्या निर्णयाने बँकेमध्ये ५०० व १००० च्या प्रचंड नोटा जमा होत आहेत व व्याज दर देखील कमी होत आहेत . 

गृहिणी-घरात काम करणाऱ्या सर्व कामगारांचे पगार कसे द्यायचे हा प्रश्न पडला आहे .घरात काम करणारे कामगार काय डेबिट क्रेडिट कार्ड घेऊन फिरणार आहेत ??एवढे तरी समजायला हवे ह्या सरकारला त्यात आणि कहर म्हणजे २००० ची नोट हे सरकार बाजारात आणणार म्हणजे १०० आणि ५० रुपये च्या खरेदीसाठी आम्ही काय २००० ची नोट घेऊन फिरू काय ?कोणाकडे २००० चे सुटे पैसे असतात?उगीचच सरकारनं अमेरिका मधील कॅशलेस  पद्धत इथे मुळीच घेऊन येऊ नये. 
त्या गृहिणींचा रोकठोक संवाद ऐकून बऱ्याच जणांनी त्यांना दाद दिली . मला कॅश काउंटर वॉर जायला २ तास लागले .त्या वेळेमध्ये रांगेत उभे असलेले लोकांच्यात  अर्थव्यवस्था व कॅशलेस ह्या विषयावर खूप चर्चा चालू होती . कुणाला निर्णय आवडला कुणाला नाही आवडला कुणी त्याचा समर्थन केले . एक फरक मला जाणवला ८ नोव्हेंबर आधी मी जेव्हा बँक किंवा ATM मध्ये जात होतो तेव्हा पण थोडी गर्दी असायचे पण कुणीच कुणाशी बोलत नव्हते . पुढे उभा असलेला माणसाला मागे कोण उभा आहे कल्पना पण नव्हते . पण ८ नोव्हेंबर नंतर समोरचा ओळखीचा नसला तरी त्याचाशी ५ शब्द लोक बोलत आहेत . नोटबंदी हा निर्णय ९०% लोकांना पटला होता फक्त त्याची अंमलबजावणी ची वेळ व पद्धत चुकीची आहे असा तिथे आलेल्या सर्वांचं म्हणणे होते .ह्या निर्णयाने कमी पैशामध्ये कसे जगावे ह्याचा देखील एक धडा मिळत होता .शेवट माझा कॅश काउंटर ला नंबर आला . मी १०० च्या नोटा मोजल्या व त्या माझ्या पाकिटात ठेवल्या व जाताना तिथे असलेल्या कॅशियर च्या चेहऱ्यावर असलेला तणाव पाहून त्याला एक मार्मिक हास्य दिले व बँकेतून बाहेर पडलो . 

लेखन -कौशिक श्रोत्री 
©
९९२१४५५४५३







No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...