प्राध्यापक थट्टेवारी,
नावाच्या मानाने खूप गंभीर होते.मुख्य म्हणजे ते कधीही, कुठलीही गोष्ट
मस्कारीमध्ये करत नसत.सतत गंभीर.
तसे त्यांचे
फारसे वय नव्हते.अजूनही त्यांचे लग्न झाले नव्हते.पण कपाळावर असलेले आठ्यांचे २४
तास जाळे आणि जाड भिंगांचा असलेला चष्मा, यामुळे तिशीचे प्राध्यापक पन्नाशीचे
दिसत.माणूस कायम गंभीर राहिला तर तो लवकर म्हातारा होतो तो असा...
ते हे
प्राध्यापक कॉलेजमध्ये गंभीर आणि तत्वज्ञानी विषय शिकवत असत.ते शिकवत असताना
विद्यार्थी देखील गंभीर होत असत.तत्त्वज्ञान! विषय गंभीर..मुले गंभीर आणि
मास्तर पण गंभीर.कुणाला कंटाळा आला तर तो गंभीर होऊन जांभई देत असत.सारे वातावरण
असे गंभीर असायचे कि झाडावर असलेल्या चिमण्या देखील गंभीर होत असत.
अशात ह्या
महाशयांना महागंभीर विषय लिहायची हुक्की आली.विषय होता “विश्वाच्या उत्पातीपासून
चराचर व्यापून राहिलेल्या अगणित योनींमध्ये पिशाच्चयोनीची गणना...” थोडक्यात “
ह्या जगात भूत आहे का...”
आणि...हा विषय
लिहायला हे जाड भिंग घालणारे मास्तर लांब अशा एका गावात जातात..आणि सुरु होतो
मग...कथेचा विस्तार
स्टोरीटेलिंग..आणि
बऱ्याच विषयांचे बादशाह असलेले श्री.रत्नाकर मतकरी ह्यांचे हे पुस्तक वाचाच....
७ स्टार्स
©
Kaushik
No comments:
Post a Comment