Wednesday, 31 July 2019

काही खरं काही खोटं लेखक:- व.पु.काळे


कथा सुखाची...दुःखाच्या भेटीची...विरहाच्या वेदनेची...अश्रुची अश्रुमधल्या फुलाच्या उपकाराची...अपकाराची..आकाडतांडवाची...मुकेपणे सोसण्याच्या भुलण्याची..झुलण्याची मोहधुक्यात हरवण्याची...सावध राहण्याची..सावध होण्याची..आयुष्य उधळण्याची..कातडी बचावण्याची...अंधाराच्या उगवत्या क्षितिजाची...उदास सायंकाळची...लुप्त होत असताना जगण्याची...
तर.."काही खरं काही खोटे" ह्यात १४ कथा आहेत.
तर...आपापल्या मूडनुसार, वेळेनुसार कोणतेही पान उघडा आणि वाचा!
हे पुस्तक कुणासाठी?
तर...ज्यांना मोत्यातली चमक पहायची आहे अशा वेड्यांसाठी!
ह्यातल्या कथा कशा वाचाव्यात? एका बैठकीत? अथवा एका दमात?छे! अजिबात नाही.काही घरांमध्ये निरनिराळे सेंट आणि चपला असतात.काहींकडे विविध रंगांचे चष्मे असतात.जसा मूड असेल तसे ते चष्मे आणि सेंट वापरले जातात तसे जसा मूड असेल तसे ह्या पुस्तकाच्या कथा वाचाव्यात.हवे ते पान शांतपणे उघडावे आणि मूडनुसार भरपूर आनंद घ्यावा अगदी मस्त अशा सुगंधाने.
तर...आपल्या मूडनुसार ह्या पुस्तकाचे कोणतेही पान उघडा आणि आनंदात डुबून जा....
©
कौशिक श्रोत्री

No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...