Tuesday, 28 May 2019

पुस्तक परीक्षण:-१२.३५ लेखक:-श्री.रत्नाकर मतकरी

मध्यरात्रीची करकरीत वेळ.
बाहेर थंडी मी म्हणतेय.चावरे वारे सुटलेय..रस्ता मिट्ट काळोखात बुडून गेलाय.बंगल्याच्या फाटकावरचे दोन मंद प्रकाशगोल अंधाराची जाणीव वाढवत आहेत.
बंगल्यात एकटी नंदिनी.बेडरूममध्ये.उबदार रजईमध्ये गुरफटून दिसेनाशी झालेली.
अचानक फोन वाजू लागतो.काळोख चिरल्यागत,कर्कशपणे.
नंदिनी झोपेतेच बेडजवळ कॉर्डलेस फोनवर हात टाकते.जाणीव होते,रिसीव्हर जागेवर नाही.
फोन वाजतोच आहे.थांबण्याची चिन्हे नाहीत.
नंदिनी उठते.झोपेत चालल्यासारखी हॉलमध्ये येते.कॉर्डलेस तिथेच पडलेला.तो उचलते.झोपाळू आवाजात म्हणते,''हेलो-"
"हलो-".

श्री.रत्नाकर मतकरी ह्यांच्या कथांचे मुख्य लक्ष,अनुभवांचे व घटितांचे विलक्षण,अपरिचित असे आकार व रूप ह्यांचे वेध व त्यांच्या माध्यमातून मानवी मन आणि जीवनातले गूढ,अज्ञात ह्यांचे भान देणे,अपरिचित दृष्टीतून त्याचे दर्शन घडवणे,हे आहे.

#खिळवून ठेवणाऱ्या कथा#
#टोचणारे भय#
#हुरहूर#

#नक्की वाचा#
#मास्तरस्टोरीटेलर चे मास्टरपीस#
#अनेक स्टार्स#
©
Kaushik

No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...