Tuesday, 21 May 2019

ड्रेस


सायंकाळचे ५.३० वाजले होते.पुण्यात विमाननगर परिसरात एका मॉलमध्ये बरीच गर्दी जमली होती.मॉलमध्ये बऱ्याच तरुणी आणि तरुण  दिसत होते.मॉलमध्ये ग्राउंड फ्लोअर वर रॉक-संगीताचा कार्यक्रम सुरु होता.त्याचबरोबर बऱ्याच ‘जेंबे’ आणि ‘ड्रम’ चा आवाज ऐकू येत होता.रॉक-संगीताचा कार्यक्रम जोरदार सुरु होता.तो कार्यक्रम ऐकायला बऱ्याच मुली आणि मुलं एकत्र आले होते.
काही वेळाने रॉक-संगीताचा कार्यक्रम थांबला.कार्यक्रम थांबल्यावर गर्दी हळूहळू पांगली.गर्दीतून ३ मुली एकत्र बाहेर पडल्या आणि मॉलमध्ये फिरू लागल्या.तिघी २७ वर्षाच्या होत्या.तिघी सरकत्या जिन्यावरून पहिल्या मजल्यावर गेल्या.तिथे बरीच गर्दी होती.पहिल्या मजल्यावर विविध दुकानांची रेलचेल होती.त्याचबरोबर तिथे काही खाद्यपदार्थांची दुकानं होती.तिथे त्या तिघी गेल्या.कॉल्ड कॉफी,बर्गर,पिझ्झा,डोसा...आणि बरेच पदार्थ तिथे दिसत होते.तिघी टेबलजवळ खुर्चीवर बसल्या.
‘‘Attitude…That’s me. असा तिघींचा top, मोकळे सोडलेले केस,रंगवलेले ओठ,हातात असलेला आय-फोन ७ एस, नाकात असलेल्या एकसारख्या नोजरिंग...आणि चेहऱ्यावर ‘vanilla ice-cream’ ला फिका पाडेल असा गोरा वर्ण पाहून तिथे समस्थ तरुण वर्ग त्यांच्याकडे हळूच पाहू लागले.पण तिघींना त्याचे काहीच वाटत नव्हते.(का वाटू नये.....)
मानसी(पहिली),‘‘आज खूप गर्दी आहे...”
सपना(दुसरी),‘‘तरी कमी आहे..”
दीपिका(तिसरी),‘‘गल्स...काय खाऊया?”
मानसी,‘‘मला कॉफी हवी आहे.”
सपना,‘‘मला पण....कॉफी.”
दीपिका,‘‘तीन कॉफी सांगते.कॉफी पिऊन आपण शॉपिंग करूया.मला २ जीन्स आणि २ top घ्यायचे आहेत.”
‘शॉपिंग’ हा शब्द ऐकल्यावर मानसी आणि सपनाच्या चेहऱ्यावर छानसे हास्य उमटले.
“नक्की.”
मानसी आणि सपना एकसुरात बोलल्या.दीपिका कॉफी ची ऑर्डर द्यायला गेली.
१० मिनिटांनी ३१ वर्षाचा मुलगा त्यांच्याकडे कॉफी घेऊन आला.
कॉफी आल्यावर तिघींनी आपापल्या कॉफी चा फोटो काढला.लगेचच तो फोटो दीपिका ने Instagram वर ‘कॉफी डेट with my gals.’ असे caption देत टाकला.तोच फोटो मानसी ने रीपोस्ट करत ‘having fun with my BFF असा caption टाकला.तोच फोटो परत सपना ने रीपोस्ट करत ‘ Coffee with my chicks असा caption टाकला.कॉफी पिऊन झाल्यावर तिघी सेल्फी काढू लागल्या.सेल्फी काढून झाल्यावर तिघी टेबलवरून उठल्या आणि निघाल्या.
पहिल्या मजल्यावर तिघी फिरू लागल्या.तिथे बरेच दुकाने दिसत होती.त्याचबरोबर तिथे बर्याच मुली आपल्या मित्रांबरोबर फिरत होत्या.त्यांच्याकडे पाहून मानसी ने दीपिका कडे नजर टाकली.
“यार..मुलांबरोबर फिरण्यात मजाच वेगळी.”
दीपिका,‘‘ती मजा काही औरच.”
सपना,‘‘पुढच्या वेळेला आपण आपल्या मित्रांना घेऊन येऊ.”
दीपिका,‘‘हो...निदान आपल्या शॉपिंग च्या पिशव्या तरी उचलतील.”
तिच्या वाक्यावर मानसी आणि सपना एकमेकींकडे पाहून हसू लागल्या.
थोडा वेळ चालून झाल्यावर तिघी एका दुकानासमोर थांबल्या.दुकान मुलींचे होते.
तिघी आत शिरल्या.दुकानात ३ पुरुष आणि १ लेडीज बसलेल्या होत्या.तिथे जाऊन तिघी कपडे पाहू लागले.
दीपिका,‘‘तो...रेड कलर चा top दाखवा.”
Counter वर एक ४० वर्षाचा माणूस होता आणि ३३ वर्षाच्या २ मुली होत्या.दीपिका ला त्या २ मुलींपेकी एक मुलगी top काढून दाखवू लागली.तेवढ्यात मानसी आणि सपना दुकानात असलेले कपडे न्याहाळत होत्या.
दीपिका,‘‘सपना....ट्राय करू हा top..”
मानसी,‘‘कर..”
दीपिका चेंजिंग रूम मध्ये गेली.तिथे तिने तो top घातला.चेंजिंग रूम मध्ये आरसा होता.त्या आरशाकडे पाहून दीपिका ने नवीन ड्रेस मध्ये एका क्षणात विविध पोझ मध्ये १५ फोटो काढले.ते फोटो तिने तिच्या “Whatsapp वर असलेल्या ‘‘Girls just wanna have fun नावाच्या ग्रुप वर टाकला.पोस्ट केल्यावर ती रिप्लाय ची वाट पाहू लागली.पण ५ मिनिटे झाली तरी कुणीच रिप्लाय केला नाही.७ मिनिटांनी ती बाहेर आली.
मानसी,‘‘दिप्स...wow....”
सपना,‘‘मस्त दिसतोय तुला top डीपी...”
दीपिका च्या चेहऱ्यावर लगेच हास्य उमटले.
“जीन्स ट्राय करते.”
“तुम्ही काही नाही का घेणार...”
“आम्ही एखादी ट्राय करू.”
मानसी आणि सपना एकसुरात बोलल्या.
“आलेच... जीन्स ट्राय करून.”
दीपिका चेंजिंग रूम मध्ये गेली.तिथे ती जीन्स घालू लागली.जीन्स घालून झाल्यावर तिने नवीन जीन्स आणि top वर परत विविध पोझ देत आरश्यासमोर पाहत फोटो काढले.ते फोटो परत तिने “ Girls just wanna have fun नावाच्या ग्रुप वर पोस्ट केले.फोटो पोस्ट केल्यावर तिने काही वेळ रिप्लाय ची वाट पाहिली.पण कुणीच रिप्लाय दिला नाही.परत दीपिका बाहेर आली.
२ तासाने...
दीपिका ने दुकानातले ५०-६० टक्के ड्रेस घालून पाहिले होते.पण तिला एकही ड्रेस पसंद पडला नाही.तिच्याबरोबर मानसी आणि सपनाला पण काहीच पसंद पडले नाही.
तब्बल ५०-७० टक्के विविध प्रकारचे ड्रेस ट्राय करून झाल्यावर दीपिका counter वर असलेल्या मुलीकडे पाहत होती.
“तुमच्याकडे अजून ड्रेस नाहीत का.?Varity कमी आहे का..?
ती मुलगी दीपिका कडे पाहत राहिली.
You have already tried lots of varieties.”
“Yes… I have… But you should have more.”
“Right now. We have this much only.
दीपिका चा चेहरा पडला.तब्बल २ तास तिघींनी शॉपिंग केले होते.पण काहीही खरेदी न करता त्या उभ्या होत्या.तिघी दुकानाच्या बाहेर आल्या.
“छे...२ तास शॉपिंग करून पण मनासारखे काहीच मिळाले नाही.I had posted the photos with the top and jeans on our group girls. But I didn’t received any reply. I didn’t received any likes on that top and jeans.
 मानसी,‘‘मी २ ड्रेस ट्राय केले पण त्या फोटोला सुद्धा कुणीच लाईक केले नाही यार..माझे फोटो मी फेसबुक आणि इन्स्टा स्टोरी ला टाकले.पण कुणीच पाहिले नाहीत.”
सपना,‘‘same case with me.”
“Girls...लक्ष्मी रोड ला जाऊया उद्या सकाळी. तिथेच काय मिळते का पाहू...मनासारखे...इथे काहीच ड्रेस नव्हते.”
दीपिका सपना आणि मानसी दुकानाबाहेर उभ्या होत्या.एव्हाना दुकानातल्या २ मुली आणि तो ४० वर्षाचा माणूस तिघींकडे पाहत होते.
एव्हाना सायंकाळचे ७.३० वाजले होते.
“छे...यार...एक पण ड्रेस नाही मनासारखा..”
“आपण उद्या लक्ष्मी रोड ला जाऊया...सकाळी..
तिघी निघणार एवढ्यात दीपिका च्या फोन मधून मेसेजेस चा आवाज येऊ लागला.
दीपिका ने लगेच तिला आलेले मेसेजेस पाहिले.
Awsome…You look hot baby….Fabulous…Sexy…..असे विविध मेसेजेस दीपिका ने ग्रुप वर टाकलेल्या फोटोला रिप्लाय म्हणून येत होते.”
ते मेसेजेस पाहून दीपिका ची कळी खुलू लागली.
ती लगेचच मानसी आणि सपना ला तिला आलेले मेसेजेस दाखवू लागली.त्याचबरोबर मानसी आणि सपना ला पण मेसेजेस येऊ लागले.
“अरे बापरे....एवढे मेसेजेस....लाईक...म्हणजे तो top मला सूट होत आहे.एवढा पण महाग नव्हता तो top..”
“आम्हाला पण मेसेजेस आलेत.”
“मला तर फेसबुक वर ५०० likes मिळालेत. Boys च्या नुसत्या कॉमेंट्स वर कॉमेंट्स...”
तिघींच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
तिघी परत दुकानाकडे वळल्या.तेवढ्यात ते दुकान बंद करत ४० वर्षाचा माणूस आणि २ मुली बाहेर आल्या.
तो माणूस मानसी;सपना आणि दीपिका कडे पाहू लागला.
“आमच्या दुकानात रेंज येत नाही.दुकानाच्या बाहेर येते.”
“पण...ड्रेस”
तिघी त्याच्याकडे पाहू लागल्या.
त्याने आणि त्या २ मुलींने दुकान बंद केले आणि तिघे गालातल्या गालात हसत पुढे चालू लागले कारण तो ड्रेस आणि जीन्स त्यांनी ह्या तिघी बाहेर पडल्यावर दुसर्या customer ला विकला होता.
©
Kaushik

No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...