Thursday, 30 November 2017

Book Review:- How I Killed my business

सदरचे पुस्तक हे लेखकाचे अनुभव आहेत.कुठलाही व्यवसाय करत असताना कुठल्या गोष्टी करू नयेत ह्यावर जास्त प्रकाश टाकला आहे. व्यवसाय करत असताना कुठल्या गोष्टी(चूका) करू नयेत हे सर्वांना महिती असणे जास्त महत्वाचे आहे.पहिल्या पानापासून व्यवसाय करण्यासाठी कुठल्या गोष्टींची आवशक्ता आहे आणि कुठल्या नाही ह्यावर जास्त जोर दिला आहे.अगदी SWOT analysis चे महत्व,कुणी व्यवसाय करावा,पायाभूत सुविधांचे महत्व,Talent ची कदर,Brand चे महत्व,मार्केटिंग,Quality comes with price चे महत्व...... आणि बऱ्याच महत्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.पुस्तकाचा शेवटी एका सुंदर वाक्यावर प्रकाश टाकला आहे.छंदाचे रुपांतर व्यवसायात करता आले तर वेल and गुड;पण व्यवसायाचे रुपांतर छंदात....Don't even think about it.
सर्व नवख्या उद्योजकांसाठी आणि व्यवसाय करणाऱ्या समस्त तरुण आणि तरुणींसाठी अतिशय उपयुक्त.
माझ्याकडून:-Distinction
Reviewer:- Kaushik Shrotri
©
Ichalkaranji
Writer:-Mr.Harshad Barve
Contact source:- FB Messanger

Sunday, 26 November 2017

पुस्तक परिचय-रहस्य

अगदी नावाप्रमाणे पुस्तकाची कथा थ्रिल्लर आणि रहस्यमयी आहे. कथेची सर्व पाश्वभुमी मुंबई पोलीस आणि ते बुलेट च्या वेगाने सोडवत असलेले केसेस ह्या गोष्टींभोवती फिरते. कथेची सुरवात बॉलिवूड च्या एका सौंदर्यवतीच्या केस ने होते जी केस मुंबई पोलीस सहज सोडवतात. सौंदर्यवती च्या केस नंतर मुंबई मध्ये बऱ्याच घडामोडी घडतात. एकाच दिवशी मुंबई मध्ये एका पाठोपाठ एक किलिंग्स होतात ज्यामुळे मुंबई पोलीस चक्रावून जातात. त्या केसेस सोडवत जात असताना पोलिसांना नाकीनऊ येते. प्रत्येक केस चा खोलवर तपास करत असताना पोलिसांना कासवाच्या गतीने क्लू मिळत जातात आणि प्रकरणाची गुंतागुंत वाढत जाते. सहज दिसणारी केस ची व्याप्ती भलीमोठी होत वेगळ्याच दिशेने वळण घेते आणि शेवट आपल्याला भंडावून सोडतो. कथा अतिशय वेगवान आणि सुसाट आहे जी कुठेही अडखळत नाही .कथेचे मुख्य पात्र इन्स्पेक्टर भाटवडेकर,राऊत ,मोडक ह्यांचं पात्र अतिशय दमदारपणे उभे केले आहे.कथा आणि भाषेचा सुसाट वेग आपल्याला एका बैठकीमध्ये पुस्तक वाचन संपवण्यास भाग पडतात जे मी एका बैठकीमध्ये वाचून संपवले.थ्रिल,रहस्य,गूढता आणि पोलिसांची दुनिया अनुभवण्यासाठी पुस्तक नक्की वाचा.
लेखक:-हर्षद बर्वे 
माझ्याकडून फर्स्ट क्लास
©
परीक्षण:-कौशिक
इचलकरंजी.


Friday, 24 November 2017

मंतरलेली थंडी...

रात्रीचे १०.०० वाजले होते.हुडहुडी थंडीची नुकतीच सुरवात झाली होती.कधीच थंडी चा फारसा लवलेश ही नसलेल्या वस्त्रनगरी इचलकरंजी मध्ये थंडी चे जोरदार आगमन झाले होते.रस्त्यांवर जागोजागी शेकोटी करून नागरिक ऊब मिळवत होते.गरमागरम पोहे आणि चहाचा आस्वाद घेण्यासाठी कॉलेज चे विद्यार्थी शहराच्या मुख्य रस्त्यांवरून बाहेर पडले होते.पुन्हा पुन्हा नवतारुण्याचा अनुभव देणाऱ्या आणि विचारांना प्रणयरम्य बनवणाऱ्या ह्या गुलाबी थंडी मध्ये इचलकरंजी चा तरुण उद्योजक के.के इचलकरंजी पासून १७ किलोमीटर लांब असलेल्या लक्ष्मी वसाहतीमध्ये आपल्या foundry मध्ये निघाला होता.अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे के.के आपल्या foundry मध्ये निघाला होता.अंतर खूप लांब असल्यामुळे लवकर पोहोचण्यासाठी के.के साहेबांनी नवी कोरी करकरीत BMW गाडी बाहेर काढली.साहेबांना गाडयांची खूप आवड असल्यामुळे त्यांच्याकडे दर सहा महिन्याला नवीन गाडी सेवेसाठी हजर होती.बरोबर १०.००ला साहेब त्यांच्या सांगली रोडच्या घरातून बाहेर पडले आणि पार्वती वसाहती च्या मार्ग लक्ष्मी वसाहतीकडे निघाले.Driver ला सुट्टी असल्यामुळे गाडी चा ताबा के.के साहेबांकडे होता.गाडी ६० किलोमीटर च्या वेगाने निघाली होती. भर थंडी मध्ये के.के साहेब अंगात घट्ट बसणारा आणि पिळदार दंडाचे खुलेआम प्रदर्शन करण्यासाठी मदत करणारा being human चा शर्ट आणि रात्र असतानाही देखील डोळ्यांवर fast track चे sunglasses परिधान करून सुसाट वेगाने निघाले होते.सलमान खान चे उपजत भक्त असल्यामुळे त्यांच्याकडे सलमान च्या गाण्यांचा प्रचंड साठा होता. अगदी हुबेहूब सलमान सारखी शरीरयष्टी,पिळदार दंड,हातात bracelet आणि कायम मुलींच्या संदेशांनी भरलेला Iphone 7S आणि सलमान ची गाडी मध्ये सतत सुरु असणारी गाणी...ह्यामुळे बऱ्याच तरुणी के.के साहेबांवर जीव ओवाळून टाकत असत.
गाडी पार्वती वसाहत ओलांडून लक्ष्मी वसाहतीकडे निघाली होती.सलमान खान चे hello सिनेमा चे गाणे ‘’bang bang bang bang bang zamana bole boom boom boom boom diwana bole’ ऐकत रस्त्यावर कुणीही नसल्यामुळे साहेबांनी गाडीचा वेग वाढवला.बरोबर गाडी १०.२५ वाजता लक्ष्मी वसाहतीच्या जवळ आली. मुख्य वसाहतीमध्ये प्रवेश करत असताना साहेबांचं आजूबाजूला लक्ष गेले व त्यांनी गाडी जोरात ब्रेक मारून थांबवली. वसाहतीच्या प्रवेशद्वारापासून जवळ २५ वर्षाची तरुणी थंडी मध्ये कुडकुडत उभारली होती.ती तरुणी गाडीजवळ आली.साहेबांनी गाडीची काच उघडली.काच उघडल्यावर गुलाबी थंडी चा झोत गाडीमध्ये शिरला.
के.के,’’एवढ्या रात्री तुम्ही इथे...’’
ती,’’ मी जवळच राहते. माझे वडील लक्ष्मी वसाहतीमध्ये foundry मध्ये काम करतात. त्यांना डबा द्यायचा होता. त्यांनी मला  प्रवेशद्वारापासून जवळ थांबण्यासाठी सांगितले होते. पण अजून आले नाहीत.’’
के.के,’’तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला जिथे जायचे तिथे सोडतो. रात्र खूप झाली आहे. मी पण ऑफिसमध्ये निघालो आहे’’.
ती,’’ ठीक आहे.’’

के.के नी गाडीचा दुसरा दरवाजा उघडला. ती गाडी मध्ये बसली आणि दोघे निघाले.
ह्यावेळेस मात्र के.के नं गाडीचा वेग ५० किलोमीटर वर आणला.बाहेर पसरलेली बोचरी थंडी मी म्हणत होती.रात्रीचे १०.३०झाले होते.रस्त्यावर एक चीटपाखरू देखील दिसत नव्हते.भयाण शांतता पसरत चाललेली होती.अश्या भर रात्री लक्ष्मी वसाहतीमध्ये ही तरुणी कशी काय एकटी उभी राहते असा प्रश्न के.के ला पडला पण त्याने तो गांभीर्याने घेतला नाही कारण त्याला समोर office चे काम दिसत होते.अभियांत्रिकी व्यवसाय के.के साहेबांचा ध्यास होता.अजून foundry यायला ८ किलोमीटर अंतर पार करायचे होते.तरुणी के.के च्या शेजारी बसली होती.गाडी मध्ये बसताना तिला अप्रूप वाटत होते. ती पहिल्यांदाच नव्या गाडीमध्ये बसली होती.मंद आवाजामध्ये सुरु असलेले इंग्रजी गाणे, जवळ असलेला iphone आणि शेजारी बसलेले तरुण तडफदार उद्योजक..ती प्रत्येक गोष्ट न्याहाळत होती.एव्हाना ती गाडी मध्ये बसल्यावर के.के नी sunglasses काढले होते.ह्या तरुण उद्योजकाची प्रत्येक गोष्ट ती टिपत होती. त्याचे पिळदार शरीर,त्याचे कपडे,त्याचाiphone,त्याची उंची,त्याची छाती असे भारदस्त व्यक्तिमत्व पाहून मनातल्या मनात तिचे जोरदार विचार चालू होते.के.के च्या मनात फक्त foundry मध्ये कशा सुधारणा करता येतील हाच विचार चालू होता.त्याचबरोबर त्यानेही हळूच एका डोळ्याने शेजारी बसलेल्या तरुणीकडे नजर टाकली.५ फुट ८ इंच उंची,गोरा वर्ण,सामान्य पेहेराव,निळे डोळे आणि चेहऱ्यावर शांततेचे प्रसन्न भाव..के.के एका डोळ्याने त्या तरुणीकडे पाहतच राहिला.तिच्या चेहऱ्यावरचे निरव शांततेचे भाव आणि तिचे डोळे त्याला पाहताच पसंद पडले होते.आजवर भरपूर मुली के.के च्या मागे लागत होत्या.मुली मागे लागण्यामध्ये खूप कारणं होती.आज वर के के नी खूप मुली पाहिल्या होत्या पण ह्या मुलीकडे पाहून त्याला काहीतरी खटकत होते.त्याला मुली भेटल्या की जोरदार बडबडायला सुरवात करत होत्या पण ही तरुणी शांत कशी काय...?
ती,’’ गाणं सुंदर आहे’’.
सलमान खान ची गाणी संपून आता गोल्डन saxophone ची हुरहूर लावणारी गाणी सुरु होती.
के.के,’’ तुम्हाला महिती आहे हे गाणं..’’.
ती,’’ हो, हे गोल्डन saxophone चे गाणे आहे.मी कॉलेज ला असताना ऐकत होते’’.
के.के(आश्चर्यचकित होऊन),’’cool!
ती,’’This song is close to my heart”.
तिचे अनपेक्षित इंग्रजी ऐकून के के ला धक्का बसला.
के.के,’’ तुम्हाला इंग्रजी येते...’’
ती,’’ हो...का?
के.के,’’ मी सहज विचारले’’.
ती मंद हसली.बराच वेळ निशब्दपणे दोघे निघाले होते.
ती,’’ तुम्हाला मनापासून धन्यवाद. मी रोज रात्री लक्ष्मी वसाहतीच्या जवळ उभारलेले असते.माझ्या वडिलांना डबा द्यायचा असतो.कुणालाही मी दिसत नाही.फक्त तुम्हाला मी दिसले’’.
के.के,’’प्रत्येकाचा व्याप वाढला आहे त्यामुळे प्रत्येकाला घरी जायची घाई असते.’’
ती,’’ जशी तुम्हाला घाई आहे आत्ता..अति घाई... संकटात...’’
के.के तिच्याकडे निरखून पाहत होता.सर्वसामान्य मुलींप्रमाणे तिचे बोलणे नव्हते.प्रत्येक वाक्य ही अशी धीरगंभीर आवाजात शांतपणे इशारा देत असल्यासारखे का बोलत आहे हा विचार के.के च्या मनात आला.आधीच कामाच्या तणावामध्ये असलेल्या के.के ला हिच्या असल्या बोलण्याने कोड्यात टाकले.
के.के ला office मधून फोन वर फोन येत होते. त्यात प्रत्येक फोन वर I am on the way असं संदेश तो टाकत होता.फोन वर फोन ऐकून के.के वैतागून गेला होता.
ती,"तुम्ही तणावामध्ये आहात का...’’
के.के,’’नाही.’’
ती,’’ तुमची body language सांगत आहे. तुम्ही तणावामध्ये आहात.’’
के.के,’’काम म्हटल्यावर थोडा तणाव असतोच.’’
ती,’’मी काही मदत करू का?’’
के.के चपापला.ही तरुणी एवढ्या मोकळेपणे कशी काय बोलत आहे हा प्रश्न त्याला पडला होता.इतर मुलींपेक्षा ही तरुणी के.के ला वेगळी वाटत होती.तिचा शांत आणि धीरगंभीर परंतु तेजस्वी असलेला चेहरा के.के ने ती गाडीत बसत असताना पाहिला होता.
के.के,’’कामगारांचाच तणाव असतो foundry मध्ये...’’
ती,’’तुम्ही ज्या तणावाखाली आहात तो तणाव तुम्ही office ला गेल्यावर नाहीसा होईल आणि त्या तणावाचा अंत होईल आणि...’’.
गाडीमधले वातावरण इंग्रजी गाण्यांमुळे हुरहूर लावत होते आणि धीरगंभीर झाले होते.त्या तरुणीचे बोलणे शांत आवाजात परंतु गंभीर स्वरात होते.
के.के,’’तुम्ही काम कुठे करता?’’
ती,’’ मी engineering केले आहे.आधी मी लक्ष्मी वसाहतीमध्ये foundry मध्येच होते पण आता नाही’’.
के.के,’’cool!which foundry?’’
तिच्या उत्तरानंतर के.के ने गाडीचा वेग ४० kilometer वर आणला कारण ती त्याचाच office मध्ये काम करत होती आणि तिचे वडील के.के च्या machine शॉप ला काम करत होते.पण के.के ने तिला जाणवू दिले नाही.
के.के,’’काम का सोडले?’’
ती,’’अजून माझे बाबा तिथेच काम करतात.पण मी मुक्त झाले कायमची...’’
के.के ला कळेना ही अशी कोड्यात का बोलत आहे.
के.के,’’मुक्त झाले...’’
ती,’’ सोडले. I am free bird now.मला safety equipment’s दिले गेले नाहीत.त्यामुळे त्या दिवशी मी शॉप वर काम करत होते तेव्हा माझ्या डोक्याला जोरदार लागले. कदाचित हेल्मेट दिले असते तर लागले नसते. एवढं होऊन देखील manager ला माझी जरा देखील फिकीर झाली नाही.’’
के.के काहीच बोलला नाही.ती सांगत असलेली अगदी विरुद्ध महिती त्याला त्याचा manager देत होता.आता के.के ला स्वतःचाच राग आला.
लक्ष्मी वसाहतीच्या डोंगराजवळ आल्यावर तिने गाडी थांबवा अशी के.के ला सूचना केली.
ती,’’थांबवता का..माझे बाबा इथूनच जवळ असलेल्या मशीन शॉप ला असतात.तुमचे आभार.’’
एवढं बोलून ती मध्यरात्री ११.००ला उतरली.के.के ला तिच्याशी बोलायचे होते पण ती थांबली नाही.के.के चं office २ मिनिटांच्या अंतरावर होते.गाडी पुढे office ला निघाली.Office च्या आत आल्यावर लगेच पार्किंग मध्ये विरुद्ध दिशेने गाडी पार्क करून के.के गाडीमधून उतरला.थंडी सुसाट वेगाने पडत होती.Watchman ला कॉफी ची order देऊन के.के आपल्या office कडे निघाला.Foundry लक्ष्मी वसाहतीच्या डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळे हवेतला गारवा वाढला होता.K.K manager ची त्या तरुणीच्या सांगण्यावरून जोरदार तपासणी करणार होता. फक्त सकाळची तो वाट पाहत होता.Reception च्या जवळ असलेल्या Tiffin house ज्या मध्ये office चे लोक डबा ठेवत होते तिथे के.के चे लक्ष गेले आणि तो जागचा थबकला.त्याला लाल रंगाचा डबा दिसत होता.तोच लाल डबा जो त्याने मघाशी येताना त्या तरुणीच्या हातात पाहिला होता.तो डबा दिसल्यावर त्याच्या डोक्यातील सर्व कामे नाहीशी झाली आणि त्याने watchman ला हाक मारली.
के.के,’’हा डबा कुणाचा आहे?
Watchman,’’.......’
के.के,’’ सांगा लवकर...’’
के.के चा आवाज वरच्या पट्टीवर जात होता.
‘’साहेब, खरं सांगतो मागच्या आठवड्यात आपल्या शॉप फ्लोअर वर एका engineer साहेबांच्या अंगावर मेटल पडले होते.त्यांचा डबा आहे.जो ते घेऊन गेले नाहीत.त्यात त्यांना खूप भाजले.पण त्यानंतर ते कामावरच आले नाहीत.तेव्हापासून आपल्या इथे अपघात खूप वाढत गेले आहेत.रात्रीच्या शिफ्ट ला कुणाला तरी काहीतरी होतंच आहे...’’
“ त्यांना मुलगी होती का.’’
“ साहेब, तुम्हाला महिती आहे ती...’’
“ हो, आत्ताच येताना मी तिला आपल्या office जवळ सोडले’’.
Security guard थबकला.
‘’साहेब,कसं शक्य आहे... त्यांची मुलगी आपल्याच foundry मध्ये होती. मागच्या महिन्यात शॉप फ्लोअर वर मोठा अपघात झाला होता त्यात ती...’’.
आता डोळे मोठे करायची वेळ के.के ची होती.तेवढ्यात शॉप फ्लोअर वरचा अलार्म वाजला.Security guard पळतच गेला. तो गेल्यावर के.के आपल्या office मध्ये गेला. तिथे त्याने CCTV उघडला.Foundry च्या बाहेर सर्वत्र CCTV  बसवले होते.त्यात office पासून हाकेच्या अंतरावर त्याने त्या तरुणीला सोडले होते.CCTV rewind केल्यावर समोर आलेले दृश्य पाहून त्याला धक्काच बसला.ती तरुणी त्याला CCTV मध्ये दिसत नव्हती.ते दृश्य पाहून के.के चे heart rate वाढू लागले.त्याला प्रचंड भीती वाटू लागली.अजूनही के.के ला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.त्याने पुन्हा CCTV  तपासला.तेवढ्यात त्याच्याकडे सुरक्षा रक्षक आणखीन एका Supervisor  ची शॉप फ्लोअर वर झालेल्या अपघाताची बातमी घेऊन आला.के.के ने सुरक्षा रक्षकाला शॉप फ्लोअर वर त्वरित जाण्यास सांगितले.के.के त्वरित आपल्या गाडीजवळ गेला.त्याला त्या तरुणीचे शांत पण गंभीर आणि इशारा देत असलेल्या आवाजातले बोलणे डोळ्यासमोर येत होते.त्याचा असल्या गोष्टींवर विश्वास बसला नाही.गाडीत त्याने छोटा कॅमेरा बसवला होता.त्याचा server त्याने mobile वर सुरु करून पाहिला आणि समोरचे दृश्य पाहून तो घाबरला.CCTV मध्ये तिच्या जागेवर कुणीही दिसत नव्हते.तो जागचा हबकलाच.
के.के ला गरगर येऊ लागली.हा काय प्रकार आहे ते त्याला समजले नाही.आजुबाजुला थंडी पडत होती पण त्याच्या शरीराचे तापमान वाढत होते.काळ पूर्णपणे त्याच्याभावती फिरत असल्याचा भास त्याला होऊ लागला. त्या मुलीचे आवाज त्याला येऊ लागले.त्याचे शरीर कुणीतरी पिळून काढत आहे असे त्याला भास होऊ लागले.त्याच्या मनावर तिसऱ्या शक्तींचा ताबा येतोय का असे त्याला काही क्षण वाटू लागले.ती मुलगी, तिच्या गंभीर पण शांत असलेल्या विक्षिप्त गप्पा,"मी फक्त तुम्हालाच दिसले" हे तिचे वाक्य... सर्व गोष्टी त्याच्या समोर येऊ लागल्या.............


"सर...सर...."
रात्रीचे ९.३० वाजले होते.के.के त्याच्या office मध्ये होता.Office चा watchman त्याला ऑफिस चा दरवाजा उघडून हाका मारत होता.दिवसभराच्या कामातून के.के ला कधी झोप आली कळलंच नाही.अत्याधुनिक office मध्ये के.के च्या laptop वर रामगोपाल वर्मा चा “डरना मना है’’ सिनेमा चे भीतीदायक पश्वासंगीत सुरु होते.सुरक्षारक्षकाने हाक मारल्यावर के.के ला जाग आली.जाग आल्यावर त्याला laptop वर चालू असलेला सिनेमा दिसला.
‘’सर,driver थांबला आहे’’
के.के नं त्याला आलोच म्हणून इशारा केला.Watchman office च्या बाहेर पडल्यावर के.के ला पडलेले स्वप्न आठवले. आपण तब्बल ३० मिनिटे झोपलो होतो ही गोष्ट त्याच्या नंतर लक्षात आली.अजून त्याच्या डोळ्यासमोर ते स्वप्न तरंगत होते.त्याने रामगोपाल वर्मा चा सिनेमा बंद केला आणि ताबडतोब त्याने दुसऱ्या दिवसाचा मिटिंग चा अजेंडा तयार केला ज्यामध्ये पहिले प्राधान्य होते सुरक्षा साहित्य खरेदी करणे आणि दुसरे प्राधान्य होते manager ला जोरदार झापणे आणि घरला घालवणे. त्याने foundry मध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांची यादी तपासली.त्यात त्याला त्याच्या स्वप्नात आलेली तरुणीचे नाव आणि फोटो आणि तिच्या वडिलांचे नाव दिसले ज्यामध्ये त्यांचा सोडून गेले म्हणून उल्लेख होता.ते स्वप्न खरं होतं का...असे के.के ला वाटू लागले. अजूनही तो अस्वस्थ होता.तो गाडीजवळ आला. पण ह्यावेळेस तो गाडीच्या मागच्या seat वर बसला आणि driver पुढच्या driving च्या जागेवर बसला.रात्रीचे १०.०० वाजले होते आणि वातावरणात चांगलाच गारवा होता.घरी जाताना त्याला पडलेले स्वप्न अजूनही त्याच्या डोळ्यासमोर तरंगत होते.गाडी 60 kilometer च्या वेगाने जात होती.जाताना के.के ला त्याच्या शेजारी एक रुमाल दिसला. त्याने तो उघडताच समोर त्याला दृश्य दिसले.

‘’LONG LIVE…K.K.Sir…’’

Thursday, 23 November 2017

Book review-khekda, writer-ratnakar matkari

सदर कथा संग्रहामध्ये भय आणि गूढता ह्यांचे उत्तम मिश्रण केलेले आहे.हे  भय  वाचकाला मुळापासून घाबरून सोडणारे आहे  आणि गूढता  ही प्रत्येक वाचकाला कथेच्या खोलात घेऊन जाणारी आहे. काही कथा वाचत असताना अंगावर काटा उभा राहतो जो खूप वेळ टिकतो.सदर कथांमध्ये वाचकाला भयाने जखडून ठेवण्याची ताकद आहे.सर्व कथा वास्तवाला धरून पुढे जातात. खेकडा ,कळकीचे बाळ,पावसातला  पाहुणा  ह्या कथा अक्षरशः अंगावर येऊन  चावा घेतात.काही कथा इतक्या प्रभावी आहेत की त्या आपल्या आयुष्यात खरंच घडल्या आहेत काय ?असा प्रश्न पडत राहतो.
लेखक अतिशय सुप्रसिद्ध कथाकार असल्याने त्यांची पुस्तकं येणाऱ्या  कथाकारांना पारायणासमान आहेत ज्यामधून तरुण कथाकार बरेच शिकतो.
माझ्याकडून पुस्तकाला आणि कथेला *****
परीक्षण:-कौशिक  श्रोत्री
©

Book is equipped with full of offbeat stories and mystery.Mystery sometimes pinches the readers with fear. Fear of known,fear of unknown and mystery behind them is basic theme of stories.Some stories might create fear of panic within readers. Some stories look real as if they had just occurred in our life.
Writer is biggest storyteller in marathi literature.His all books are fuel for all young storytellers. He was one who inspired me to write.
5 stars*****
Written by:- Kaushik
©

Wednesday, 15 November 2017

Book review~ही वाट एकटीची,लेखक-व.पू.काळे

Babi, the heroine of the novel presents the most  hardest philosophy of life in simplest yet in  effective way. Story is about guy and girl who fall in love. This love is so intense that she gives birth to child before marriage but guy whom she loved refuses to accept her and child.Later on she moves forward in life with child where she decides to grow child.This is the story of her struggle and more than that the truth that she faces alone, with courage, without bothering for side effects of the society. She gets support from a few like her, who respect the truth more than anything. She raises her child keeping faith only on the truth, but what is her future? What is the future of her child? What does she achieve at the end? The answers to all these questions are woven beautifully.
Major usp of story is writing style. Dont miss it.
5 stars from my side.
Written by...Kaushik
All rights reserved..

Sunday, 5 November 2017

Film review-ITTEFAQ 2017

It is an adaption of Yashraj 1969 hit. Story begins with the chase sequence where U.K based writer Vikram(Siddharth Malhotra) is  on run where he is suspected to kill his wife. Now in order to get away from police he finds shelter in the mysterious house with mysterious women Maya(Sonakshi Sinha).Here he is apprehended where he is caught by police next to body of Maya's husband Shekhar Sinha. Soon Vikram is charged of double murder and this case is assigned to officer Dev(Akshay Khanna), who has target to solve this case in three days. While investigation he finds two sides of stories from Vikram and Maya and simple and shut down case turns out to be more critical.
Ittefaq has turned out to be no marketing strategy film. This is dare decision which is  taken by creative people of film  in today's promotion fights. As a writer  I will give 100 out of 100 marks to story since it is written in a much smoother manner than expected which doesn't require marketing and all stuff.Film is without any songs which has helped background music to give strong inputs to  the story. Background music sometimes reminded me movie Kaun(1999) written by Anurag Kashap. Much higher octane drama creates mystery of the story till the end of movie and secret which is finally out at the end is much shocking.
Good to watch multitalented Akshay Khanna after a long time. He plays role of police officer who is targeted to solve case in 3 days. His character plays interrogation process in much chilled manner.
Sonakshi is just Ok. Siddharth Malhotra has taken time to get into character of accused husband but he hits right emotions and patches to character.
Finally Akshay Khanna and the story is ultimately winner.
5 stars out of 5.
©
Kaushik Shrotri

१९६९ ला  आलेला ITTEFAQ  आणि २०१७ च्या  सिनेमा  मध्ये  रचना  सारखीच  आहे पण कथा  वेगळी आहे . लंडन चा सुप्रसिद्ध लेखक विक्रम (सिद्धार्थ मल्होत्रा ) वर स्वतःच्या  पत्नीचा हत्येचा आरोप होतो आणि तो स्वतःला पोलीसांपासून वाचवण्यासाठी एका रहस्यमयी आणि गूढ घरात शिरतो. त्या घरात त्याची गाठ माया (सोनाक्षी सिन्हा ) शी  पडते. पण  एका आरोपापासून सुटका होण्याच्या आधीच दुसरा आरोप त्याच्यावर येतो.त्या रहस्यमयी घरात शिरताच त्याला माया चा पती शेखर  चा मृतदेह दिसतो आणि तो दुसऱ्या गुन्ह्याखाली पोलीसांच्या ताब्यात जातो.ही केस देव(अक्षय खन्ना ) कडे सोपवली जाते आणि ३ दिवसात ती निकाली काढण्याचे आदेश त्याला येतात.त्याच्यासमोर विक्रम आणि माया ह्यांच्या  दोन वेगवेगळ्या कथा येतात आणि तो गोंधळून जातो आणि ३ दिवसात निकाली काढण्याची केस किचकट होऊन जाते.
पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत अक्षय खन्ना सहज रुळतो. सोनाक्षी सिन्हाला का सिनेमा मध्ये घेतले कळत नाही. सिद्धार्थ मल्होत्रा ला अजून अभिनय जमला असता.
सिनेमाच्या कथेला मी १०० पैकी १०० मार्क देईन.कथा शेवटपर्येंत सस्पेन्स टिकवून  ठेवते जे सिनेमाच्या अखेरीस प्रेक्षकांना धक्का देते.सिनेमा चे पाश्वसंगीत कथेच्या गूढतेमध्ये मनसोक्त भर घालते.सिनेमाच्या creative टीम ला  मी १०० मार्क देतोय कारण सिनेमाचे कुठेही मार्केटिंग न करता कथेच्या जोरावर त्यांनी सिनेमा चे प्रदर्शन करण्याचे धाडस केले.
शेवटी सिनेमा ची कथा जिंकते...
माझ्याकडून ५ मिरच्या ....
©
कौशिक श्रोत्री

Wednesday, 1 November 2017

Ocean of flying dreams...

                       

 Ocean of flying dreams.

This is the time.
To dream up and rise above the high.
Beat your fears and glorify.
These dreams might look once futile.
Keep flying…Keep flying…Keep flying.

This is the age.
To jump into the ocean of flying dreams.
Chase for the dreams until it is achieved.
Some of dreams might look strenuous.
Keep flying…Keep flying…Keep flying.

Real dreams will test your passion and the soul.
Making your move hardly possible.
Nothing is easy when you are lazy.
Life is full of one-way road.
When you are all alone.
Keep flying…Keel flying…Keep flying.

You have ability to achieve your dreams.
Grab it, live it, sense it, feel it.
Nothing looks impossible for chasers.
Make it possible and bloom.
For everyone who ever thought it was impossible.
Keep flying…Keep flying…Keep flying.

Hi guys this is poem written by me on Vivekananda memorial at Kanyakumari in Oct.2017
©
Kaushik shrotri



Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...