Wednesday, 1 March 2017

सरकार-३ ट्रेलर समीक्षण

Finally RGV Brand is back. मी सरकार सिने मालिकेतील पहिला सिनेमा २००६ ला थेटर मध्ये पहिला होता . बिग बी ह्यांची गाजलेली संवादफेक ,प्रत्येक कलाकाराकडून कमीतकमी संवादांमध्ये देहबोलीतून अभिनय करून घेण्याची RGV ची हातोटी , प्रत्येक सिन मध्ये कथेनुसार वाजणारे पाश्वसंगीत , Camera Closeup चे तंत्र जिथे कॅमेरा विविध अंशात फिरवून कथा व पत्रानुसार सिनेमॅटोग्राफी वर हातोटी असलेले RGV,बिग बी ह्यांनी गाठलेल्या अभिनयाचा सर्वोच्य टप्पा त्यामुळे सरकार -१ हा सिनेमा माझा अत्यंत आवडीचा ठरला होता व RGV(Ramgopal Varma) च्या लेखन कौशल्य ,फिल्म मेकिंग पद्धतीवर मी फिदा होतो. जुनिअर बी चा अभिनय पाहून सर्व प्रेक्षकांना व समीक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला होता . नंतर २००८ साली आलेला सरकरराज हा सिनेमा देखील कथा ,स्क्रिप्ट ,अभिनय ,सिनेमॅटोग्राफी च्या बाबतीत उजवा होता . तब्बल ८ वर्षांनी १ मार्च २०१७ ला सरकार ३ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे .बिग बी , जॅकी श्रॉफ ,रोहिणी हट्टंगडी ,यामी गौतम ,मनोज वाजपेयी ,अमित सिद्ध ,भरत दाभोलकर अशी तगडी स्टारकास्ट च्या अभिनयाचा जलवा पाहायला मिळणार आहे. ३ मिनिटे असलेला ट्रेलर मध्ये बिग बी पुन्हा एकदा सरकार च्या वाघाच्या अवतारात परतले आहेत . सध्या आपला प्रॉडक्ट मार्केटिंग करण्याचे विविध मार्ग आहेत . त्यातला एक  ट्रेलर जे पाहून प्रेक्षक ठरवू शकतात की सिनेमा पाहावा की नको .ट्रेलर पाहून सिनेमा विषयी उत्सुकता निर्माण करण्यात RGV ने बाजी मारली आहे . गोरीघारी यामी गौतम ,जॅकी श्रॉफ ,आईआजी रोहिणी हट्टंगडी ह्यांना कधीही न पाहिलेल्या प्रमुख व्हिलन च्या भूमिकेत ,'जो उसुलोंके रासते पर चलते है उनके दोस्त कम होते है और दुश्मन ज्यादा , दर्द कि कींमत चुकानी पडती है, मुझे जो सही लगता है वो मे करता हू चाहे वो समाज की खिलाफ हो ,कानून ऑर पुरी सिस्टिम की खिलाफ हो '
असे कितीतरी खुमासदार डायलाॅग्स घेऊन परत एकदा नवीन  रूपात "सरकार ३"
पाहताना नक्कीच अभिनयाची जुगलबंदी पहायला मिळणार आहे . 
ट्रेलर ला माझ्याकडून फर्स्ट क्लास 
समीक्षण -कौशिक श्रोत्री 
९९२१४५५४५३

No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...