Monday 13 March 2017

Kong Skull Island-Review

I had been always big fan of Fantasy/Science fiction films and this film doesn't let you down. During 1973 there is expedition of mysterious island discovered by satellite in South Pacific accompanied by tracker, photojournalist,soldiers. Just moment after entry of military choppers accompanied with soldiers and trackers, soldiers began to drop bombs on island  to map its terrain. This act lits fire in 100 foot tall beast giant who is not pleased with this intrusion on island. Bursted in terrifying anger ape begins to crash military choppers. This act traps some of soldiers,trackers,photojournalist in mysterious island which is well equipped with all natural resources and biological features.Some seek revenge from mighty ape for killing military soldiers and crashing choppers but later there is twist when soldiers realize Kong is not there enemy.CGI and Visual effects will bind you on edge of seat scaring you with dark eyes and anger of Kong.Some part of movie looks old fashioned when Kong throws choppers on ground which looks like odd entertaining.Theme where humans attack mother nature and nature reverts back slightly looks it has been repetitive theme. There are talented actors Tom Hiddleston and Oscar winner Brie Larson but all of them are underutilised in front of 100ft kong who sweeps all actors. At end Kong is warrior and survivor who fights with 2 giant lizards and military choppers to save his island. Film is mounted in superior way where you will have clear glimpse of island and jungles and you will fall in love with Kong.
First Class from my side.
Reviewer-Kaushik Shrotri
©
9921455453

मी कायम फिक्शन सिनेमा चे फर्स्ट डे फर्स्ट शो पाहत आलो आणि हा सिनेमा आपल्या अपेक्षा पूर्ण करतो . १९७३ च्या आसपास अमेरिकेच्या एका उपग्रहाला एका गूढ व रहस्यमयी बेटाचा शोध लागतो . सर्व नैसर्गिक व औषधी गोष्टींमध्ये समृद्ध असलेल्या ह्या बेटावर नेमके काय आहे हे जाणून घेण्यासाठी तिथे ट्रॅकर ,छायाचित्रकार   व काही सैनिक हे समूहातून सैन्याच्या चॉपर मधून बेटाकडे कूच करतात . बेटावर आल्यावर काही सैनिक हे बेटाच्या जमिनीवर असलेले खजिने शोधण्यासाठी बॉम्ब हल्ले चालू करतात. हा बॉम्ब वर्षाव चालू झाल्यावर त्या बेटावर असलेला १०० फूट उंच मानवी देहाचं माकड(काँग ) सैनिकांवर व चॉपर वर हल्ला चढवते . ह्या अनपेक्षित हल्याने सैनिक व छायाचित्रकार हे ह्या बेटावर अडकून पडतात. ह्यापैकी काही सैनिकांना काँग  हा आपला शत्रू वाटत असतो पण नंतर कथेमध्ये असा काही धक्के मिळतो की त्यांना उमजते  हा त्यांचा शत्रू नाही  . सिनेमाचे व्हिएफक्स हे आपल्याला मनसोक्त घाबरवून सोडतात . सिनेमाची प्रमुख कथा जिथे मनुष्य हा निसर्गावर हल्ला करतो व नंतर निसर्ग त्याची परतफेड करतो हि काही अंशी पुन्हा पुन्हा व अतिरेकी वापरल्याचे जाणवते . काही प्रसंगात जिथे काँग हा चॉपर जमिनीवर आदळताना असलेले दृश्य आपल्याला पाहून हसू आवरत नाही . सिनेमा मध्ये खूप प्रतिभावान अभिनेते (टॉम हिद्दलेस्टोन )व  ऑस्कर विनर (ब्रि लार्सन ) आहेत पण हे २ अभिनेते १०० फूट धिप्पाड काँग समोर चक्क फिके पडतात . अखेर सिनेमाचे प्रमुख आकर्षण  राहतो फक्त काँग .  सिनेमा ची सिनेमॅटोग्राफी हि उत्कृष्ट आहे जी  आपल्याला बेट व जंगल प्रवास घडवून आणते व आपल्याला काँग च्या प्रेमात पडायला लावते . 
माझ्याकडून ४ लाईक्स 
लेखन -कौशिक विद्याधर श्रोत्री 
९९२१४५५४५३
©

No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...