Monday 20 February 2017

सिने परीक्षण गाझी अटॅक-

दमदार कथानक ,तगडी स्टारकास्ट ,१९७१ युद्धा आधी घडलेल्या समुद्र युद्धात पण जगासमोर न आलेली कथा ह्यावर आधारित  सिनेमा आपली उत्सुकता व अपेक्षा परिपूर्ण करतो . INS विक्रांत व भारतातील एका दक्षिण शहरावर समद्रमार्गे हल्ला करण्याचा गनिमी कावा पाकिस्तान रचतो . बे ऑफ बंगाल मधून निघालेल्या गाझी ह्या पाकिस्तान ची पाणबुडी ची दिशा व मार्ग  शोधण्याची जबाबदारी S २१ ह्या भारतीय पाणबुडीतील अधिकारी रणविजय सिंग (के के मेनन ) व अर्जुन वर्मा (राणा डग्गुबती ) वर येते . कॅप्टन रणविजय सिंग हा युद्धातील गनिमी काव्याचा जनक व अनुभवी व आक्रमक  नौसैनिक,वरिष्ठांचा निर्णयाकडे प्रसंगी दुर्लक्ष करून तडकाफडकी निर्णय घेणारा असल्याने व  सदरची मोहीम हि शोध मोहीम असल्याने त्याला युद्धात परिवर्तित न करण्याची जबाबदारी राणा वर येते.  मध्यंतरी भारतीय पाणबुडीवर अचानक Time-Mine ने हल्ला झाल्यावर ती समुद्रतळापाशी जाते पण ह्या कठीण अवस्थेमध्ये पाणबुडीचे सर्व बॅटरी बंद पडत असताना  न डगमगता सर्व जवानांचे मनोधैर्य वाढवून S -२१ पाणबुडी परत समुद्राच्या मध्यावर आणून गाझी पाणबुडीवर हल्ला करण्याचे धैर्य अर्जुन वर्मा (राणा ) सर्व जवानांना देतो . ह्या सिनेमा मध्ये K. K मेनन ने एक अत्यंत आक्रमक ,हुशार व भावनाशुन्य अधिकारी ,युद्धातील गनिमी कावा मध्ये तरबेज असलेल्या एका नौसैनिकाची भूमिका प्रचंड ताकदीने साकारलेली आहे. बाहुबली चा राणा डग्गुबती ने  ह्या सिनेमा मध्ये एका कसलेल्या सैनिकाची भूमिका साकारलेली आहे . वफक्स चा वापर ह्यात प्रभावशाली  केला आहे . कुठलाही मोठा स्टार नसताना केवळ कथा  व कन्टेन्ट दमदार असेल तरीही सिनेमा यशस्वी होतो हे ह्या सिनेमा ने दाखवून दिले आहे .  भारतीय जवानांची शूरता व हिम्मत व १९७१ ला समुद्रात भारतीय सेनेने घडवलेल्या पराक्रमाचा साक्षीदार होण्यासाठी हा सिनेमा नक्की पाहावा .

माझ्याकडून फर्स्ट क्लास
लेखन -कौशिक  श्रोत्री
९९२१४५५४५३


No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...