Friday 7 October 2016

सिने परीक्षण -जाऊ द्या ना बाळासाहेब

अप्रतिम !!!!!!वाह वाह !!!लाजवाब !!! परत एकदा गिरीश कुलकर्णी-उमेश कुलकर्णी ह्या जोडी कडून एका सुंदर कलाकृती!!सदर सिनेमा हा अस्सल ग्रामीण भागामध्ये फिरत राहतो . सिनेमा ची कथा एक अस्सल ग्रामीण आहे . सिनेमा फिरतो एका अस्सल रांगडा ग्रामीण भागातल्या तरुणाभवती ज्याची घरची राजकीय पाश्वभुमी आहे .घरी राजकीय पाश्वभुमी असल्यामुळे हा तरुण हा भरकटलेला असतो . वडिलांच्या  वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीमुळे ह्याला आपल्या पलीकडं जग दृष्टीआड झालेल असते .हा तरुण(गिरीश कुलकर्णी) पुण्यात एका महिला लेखिकेशी संपर्कात  येतो व त्याचे आयुष्याचं बदलून जाते . 
गिरीश कुलकर्णी ह्यांनी अभिनयात पूर्ण षटकार मारलेला आहे . एका अस्सल ग्रामीण युवक ते कॉमन मन ची  भूमिका पूर्ण सफाईदार पणे पेलली आहे .अस्सल ग्रामीण भाषा,राकटपणा ,एका नाट्यप्रेमी भूमिका गिरीश कुलकर्णी ह्यांनी पूर्ण नसानसात उतरवली आहे . बाकी साई ताम्हणकर ,रीमा लागू दिलीप प्रभावळकर सारखे कलाकार काही सीन पुरतेच . सिनेमा हा मध्यांतरापरेंत कंटाळवाणा वाटू लागतो पण नंतर दुसऱ्या भागात वेग घेतो . सिनेमा चा शेवट मात्र हेलावून टाकतो .सदर सिनेमाची कथा हि अतिशय उत्कृष्ट आहे . मोहन जोशी ह्यांच्या सारखा कलाकार ह्यांनी एका मुरलेल्या राजकारण्याची भूमिका अतिशय उत्कृष्ट केली आहे . 
अजय अतुल जोडी च्या  संगीताला तोड नाही . संगीत हे ताल धरायला लावणारे आहे व थेटर मध्ये  डान्स करायला देखील लावणारे आहे . 
सदरचा सिनेमा हा फक्त गिरीश कुलकर्णी चा अभिनय व अजय अतुल ह्यांचे संगीत ह्यांच्यासाठीच पाहावा . गिरीश ची एका वाट चुकलेला तरुण ते एक कॉमन मन चा प्रवास नक्की पाहावा .... 
माझ्याकडून ३ मिरच्या .... 
सर्व हक्क अबाधित 
लेखन -कौशिक श्रोत्री 
९९२१४५५४५३

No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...