So...After a long gap of ''One Indian Girl'' book he is back with the book ''The Girl in the room 105'' which sounds quite different from other Chetan Bhagats books.
The book is a Romantic Thriller.
It starts with the Chetan Bhagat flying in the flight( No wonder he gets all his stories in the train and the flight). He meets the one character from the book who narrates him the story. This characters name is Keshav Rajpurohit.
He is the IIT pass out. He has not got a decent job. So he has entered in the Teaching job. He is screwed in his personal and professional life. His beautiful Gf left him in the past. But after some time she messages him and tells him to meet her in her room 105 in the midnight. Keshav runs to meet her in room 105 and....his life changes forever.
The writing style is completely different from his other books. Chetan Bhagat is again successful in writing the romantic thriller which he has not yet written so far. Changes and twists in the story are surprising and unexpected. He has tried to reach some of the social causes in the story. He writes the stories of his books in the filmy style which is appealing to most of the readers.
Like his other books, his writing style is the same. Yet he succeeds in the writing the best twists. He is not a great writer who introduces the big English words but he is a perfect storyteller.
Don't miss the book for the chasing and thriller story.
‘’स्वप्न पाहायला
शिका.’’ ‘’Think
big, think fast, think ahead.Ideas
are no one's monopoly.’’
भारतातला एक मोठा उद्योगपती वरील शिकवण देऊन गेला आहे.हीच शिकवण
सध्या ‘’ गल्ली बॉय’’ सिनेमा मधून देण्यात आली आहे.
मुंबईच्या धारावी मध्ये राहणाऱ्या मुराद(रणवीर सिंग)च्या
आयुष्यावर पूर्ण कथा आहे.अत्यंत हलाखीच्या अवस्थेमध्ये राहत असणारा ‘मुराद’ rap
नामक संगीतातल्या प्रकाराचा चाहता असतो.Rap संगीतामध्ये काहीतरी करायची त्याची
इच्छाशक्ती आणि जिद्द असते.भारतातला rap संगीतकार होण्यासाठी त्याची धडपड सुरु
होते.पण ही धडपड आणि खटपट सोपी नसते.ह्या त्याच्या खटपटीमध्ये त्याला मदत मिळते त्याचा
मित्र एम.सी.शेर(सिद्धांत चतुर्वेदी) आणि सफिना( आलिया भट्ट) आणि रझिया(अमृता
सुभाष) ह्यांची.
रीमेक पाहून कंटाळून
गेलेल्या आणि त्याच त्याच ढापलेल्या सुमार कथांचे पिक्चर पाहून वैतागून गेलेल्या
प्रेक्षकांना हा सिनेमा म्हणजे मोठी मेजवानी आणि खजिना आहे.धारावी ची खरीखुरी
परिस्तिथी ह्यामध्ये दाखवण्यात आली आहे.लहान आणि धारावी सारख्या भागात राहणाऱ्या
२२ वर्षाच्या मुलाची अवस्था...त्याच्या कुटुंबाची होणारी घालमेल... तरुण वयात त्याची असणारी
स्वप्न आणि इच्छा...आणि त्या पूर्ण करायला त्याला करावी लागणारी दुनियादारी...त्याला
मदत करणारी सफिना(आलिया भट्ट)....लहान कुटुंबामध्ये असणारे वातावरण...ह्या
गोष्टींवर मोठा प्रकाश पाडण्यात आला आहे.
कथा आणि शब्दांच्या
बाबतीत ‘जावेद अख्तर’ ह्यांचे कुटुंब म्हणजे साक्षात जादुगार.मग ते त्यांचे
सुपुत्र फरहान अख्तर असोत अथवा त्यांच्या कन्या झोया.कथा..आणि गाणी कशी लिहायची...कशी
मांडायची...आणि कशी चित्रित करायची ह्याबाबतीत जावेद अख्तर;फरहान अख्तर; आणि झोया
अख्तर ह्यांना तोड नाही.वास्तववादी असे काही संवाद कथेमध्ये किक मारतात.
रणवीर सिंग....हा
माणूस सध्या जिंकत सुटला आहे.
आलिया भट्ट....कुलोत्पन
भट्ट कुटुंबाची लाडकी असणारी हिरवळ इथे खूप खुलून गेली आहे.वांड भूमिका करणारी अशी
हिरवळ आपल्या आयुष्यात देखील असावी असे सिनेमा पाहताना प्रत्येक bachelor च्या मनात येते.
सिद्धांत चतुर्वेदी....क्लास
अमृता सुभाष आणि इतर
कलाकार...पुअर talent
सिनेमाची गाणी....
आणि संगीत....मोठी पर्वणी आहेत.दोन कुटुंबातील अंतर दाखवणारे “ दुरी...’’ हे गाणे
अक्षरशः मनात घुसते आणि शेवटचे गाणे....जे अक्षरशः अंगातला किडा बाहेर काढते.
“अपना टाईम आयेगा...तू
नंगा ही तो आया है क्या घंटा लेकर
जायेगा...”
अमावास्येची मध्यरात्र . .. सारे वस्तुमात्र काळोखाच्या डोहात बुडून गेलेले. अंधाराच्या काळ्या वर्णाखेरीज दुसऱ्या कुठल्याही रंगाची नावनिशाणी राहिलेली नाही. रंग सोडाच, पण सारे आवाज देखील जसे काही काळ्या पांघरुणात घुसमटून गेलेले. सर्वत्र निश्चल शांतता. काळ्याशार दगडाची प्रचंड मोठी कमान. त्यामध्ये शिशवी लाकडाचा भक्कम दिंडीदरवाजा. दरवाजातून आत गेले की दुतर्फा गर्द झाडी. काळोखात वाऱ्याच्या झुळकीबरोबर मागेपुढे माना वेळावणारी आणि सरसर आवाज करत फांद्या नाचवणारी काळ्या झाडांची पिशाचे. जीव मुठीत धरून पाय-वाटेने चालत गेले की लागल्या वाड्याच्या पायऱ्या... दगडी पायऱ्या. त्यावर कुठे कुठे जीर्ण गावात माजलेले. .....
रत्नाकर मतकरी ह्यांच्या प्रत्येक वाक्यात आणि ओळीत एक प्रकारचे आंतरिक भय लपलेले असते .प्रत्येक कथा वाचकाला वेगळ्या अश्या जगात घेऊन जाते. प्रत्येक कथेमध्ये प्रत्येकी पात्राला असणारा आगळा वेगळा न्याय आणि प्रत्येक वाक्यात ठासून भरलेलं भय आणि उत्कंठा जाणून घेण्यासाठी अवश्य पुस्तक वाचाच.
लेखकांनी तर शब्दांचे राजा असलेले रत्नाकर मतकरी ह्यांच्या सर्व पुस्तकांचे पारायण करावे.
नेहमीप्रमाणे दिवाळी जवळ आली की आमच्या कुटुंबाची भटकंतीची वेळ जवळ
येती.बऱ्याच ठिकाणांवर संशोधन केल्यावर अखेर आम्ही 'तामिळनाडू' ला ४ रात्र/ ५ दिवस
अशी short टूर करायची ठरवली. २०१७ ला 'केरळ' चे जोरदार पर्यटन केले असल्यामुळे ह्या
वर्षी भरपूर खीस पाडून 'तामिळनाडू' ची विविध ठिकाणे पाहून झाल्यावर
चेन्नई,महाबलीपुरम आणि पॉंडिचेरी अशी ३ गावं करायची ठरवली.पूर्ण भटकंतीची तयारी
करेपर्येंत नोव्हेंबर महिना उजाडला.लक्ष्मीपूजन करून झाल्यावर आम्ही ९ जण भटकंतीची
तयारी करू लागलो.नेहेमीप्रमाणे आदल्यादिवशी रात्री लक्ष्मीपूजन झाल्यावर तयारी
पूर्ण झाली.सर्व bag भरून झाल्यावर दुसर्या दिवशीचा पहाटेचा गजर लावून आम्ही सर्व
जण झोपी गेलो.
Morning 08.11.2018
८.११.२०१८
ह्या दिवशी पहाटे ३.०० वाजता आम्ही झोपेतून जागे झालो.आम्हाला सकाळी ८.३०
वाजता 'बेळगाव' ला पोहोचायचे होते.त्यामुळे लवकर आवरावे लागणार होते.सकाळच्या सर्व
विधी संपवून आम्ही तयार झालो.हवेत गारवा जाणवत होता.एव्हाना भटकंतीचा उत्साह
शिगेला पोहोचला होता.वातावरण पूर्ण दिवाळीमय झाले होते. घरात सर्व आवराआवर करून
आम्ही सकाळी ५.५५ वाजता 'बेळगाव' च्या दिशेने सुसाट निघालो.ह्या वर्षी फटाक्यांचा
आवाज फारसा जाणवला नाही.आम्ही 'कागल' मार्गे निघालो होतो.कागल वरून आम्ही थेट
कोल्हापूर-बेळगाव च्या महामार्गावर पोहोचलो.Punj Lyod ह्या कंपनीने बांधलेला रस्ता म्हणजे
गुणवत्तेचा आणि अभियांत्रिकीचा चमत्कार होता.अश्या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे
स्वर्गीय सुख.प्रवासात जाता जाता माझ्यावर निद्रदेवता हळूहळू प्रसन्न होत गेली.
बरोबर आम्ही ८.३० वाजता बेळगाव विमानतळावर पोहोचलो.गाडीच्या हॉर्न ने
मला जाग आली.लगेचच आम्ही सामान उतरवले आणि चालकाला '५ दिवसांनी ये' असा निरोप दिला
आणि चेक-इन करायला निघालो.बेळगाव विमानतळ अतिशय नीटनेटके होते.विमानतळावर फारशी
गर्दी दिसत नव्हती.आम्ही चेक-इन करून आत गेलो.गरम पोह्यांवर ताव मारून आम्ही
विमानाची वाट पाहत आणि सेल्फीकाढत बसलो.मी विमानतळावर नजर फिरवत
होतो.सर्वत्र कडक शिस्त आणि टापटीपपणा जाणवत होता.बरेच सेल्फी काढून झाल्यावर अखेर
९.२० ला एअर-इंडिया चे विमान आले.सर्वजण लगेचच विमानाकडे निघालो.झपाझप चालत आम्ही
विमानाकडे गेलो.विमान बर्यापेकी भरलेले होते.विमानात पाऊल टाकता टाकता मला लेडीज
सेंट चा स्वाद येऊ लागला.मेकअप ने नटलेल्या आणि अस्सल साबणाच्या पलीकडे
सौंदर्य असलेल्या आणि vanilla ice-cream ला
फिक्या पडतील अश्या हिरवळी आमच्या स्वागताला उभ्या होत्या.त्यांच्याकडे पाहताच
माझा सर्व थकवा क्षणात पळून गेला.आम्ही आमच्या जागेवर जाऊन बसलो.विमानात सर्व
हिरवळी उभ्या राहून सर्व सूचना करत होत्या.त्यांच्या सूचनांकडे विमानातील सर्व
तरुण हृदय एकटक पाहत होते.त्यांच्या सूचना झाल्यावर अखेर टेक-ऑफ ची वेळ आली.मी सीट-बेल्ट
घट्ट बांधला.एव्हाना मी खिडकीजवळ बसलो होतो.मी बाहेरचे दृश्य पाहत होतो.अखेर विमान
कासवाच्या गतीने निघाले.कासवाच्या गतीने निघालेले विमान हळूहळू वेग धरू लागले आणि
काही सेकंदामध्ये विमानाने वेग पकडला.विमानाच्या आत वेग जाणवू लागला.मी सीट घट्ट
धरून बसलो.विमानात कंपने जाणवू लागली.आणि काही क्षणात विमानाने आकाशात झेप घेतली.मी
खिडकीबाहेर पाहू लागलो.माझ्या अंगात रोमांच निर्माण होत होता.निळेभोर आकाश...लांबून
दिसणारे ढग...आकाशातून दिसणारे जमिनीवरचे दृश्य....अक्षरशः मी पाहत राहिलो आणि
व्यावहारिक आणि कृत्रिम जगाचे विचार एका क्षणात सोडून दिले आणि ट्रीपच्या प्रत्येक
क्षणाचा मनापासून आस्वाद घ्यायचा म्हणजे घ्यायचा असे मनोमन ठरवले.कानाला लावलेला
हेडफोन मी काढला आणि बाहेरचा मोकळा निसर्ग शांतपणे पाहत राहिलो.निसर्ग किती मुक्त
आणि मोकळा आहे हे मला दिसत होते.मी खिडकीबाहेर भरल्यासारखा पाहत होतो आणि प्रत्येक
क्षण फोन मध्ये साठवू लागलो.तेवढ्यात विमानात हवाई-सुंदरी भरलेला stand आणि काही
खाद्यपदार्थ घेऊन फिरू लागल्या.विमानात फ्री मध्ये असणारा नाष्ट्याचा आस्वाद घेत
मी खिडकीजवळ बसलो होतो. अखेर ९.४५ मिनिटांनी बेंगलोर जवळ आले आहे अशी घोषणा झाली
आणि आम्ही परत सीट बेल्ट घट्ट बांधून बसलो आणि खिडकीबाहेरचे दृश्य पाहू
लागलो.अजस्त्र पसरलेले 'बेंगलोर' मला ठळकपणे दिसत होते.हळूहळू मला बेंगलोर सिटी दिसू
लागली आणि आम्ही Kempagauda International Airport वर उतरलो.मी वेळ बघितली.सकाळचे १०.१० वाजले
होते.विमान जमिनीवर आल्यावर लगेचच आम्ही सर्वजण उठून विमानातून खाली उतरू लागलो.Airport
सुमारे ४००० एकर
क्षेत्रात पसरलेले होते.भारतातले सर्वात बिझी एअरपोर्ट म्हणून नावाजलेले होते.विमानतळावर स्वच्छता आणि टापटीपपणा मोठ्या प्रमाणावर जाणवत होता.गर्दीतून आम्ही
विमानातून खाली उतरलो.खाली उतरल्यावर सर्व प्रवाश्यांना एअर-इंडिया ची बस रनवे वर
घ्यायला आली होती.बस मधून आम्ही लगेचच निघालो.विमानतळावर चेक-इन केल्यावर शांतपणे
काही काळ बसलो.कारण आम्ही पुढची 'चेन्नई' ला जाणारी flight लगेचच होती.पण चौकशी
केल्यावर विमान एक तास उशिरा म्हणजे दुपारी १.०५ वाजता येणार असल्याचे कळले.मग
उरलेला वेळ मी विमानतळावर भटकण्यात आणि विविध प्रकारच्या हिरवळी पाहण्यात घालवला.काही
वेळ विमानतळावरचे फ्री वाय-फाय वापरत वेळ घालवला.काही दुकानांमध्ये आम्ही भटकत
होतो पण तिथे असलेल्या वस्तू आणि त्यावरच्या असलेल्या किमती पाहून मी काढता पाय
घेतला. तिथेच हलके जेवण करून आम्ही विमानाची वाट पाहत आणि फोटो काढत बसलो.
अखेर दुपारी १.०५ वाजता विमान आले.लगेचच आम्ही रनवे वर निघालो.परत एअर-इंडिया
चे विमान होते.सर्वजण विमानात गेलो.परत ह्यावेळी मला खिडकीजवळ जागा मिळाली.सर्व प्रवासी
जागेवर बसल्यावर लगेचच टेक-ऑफ ची घोषणा झाली.आम्ही सर्वांनी सीट-बेल्ट घट्ट
बांधलेले होते.घोषणा झाल्यावर विमान हळूहळू पुढे जाऊ लागले.पुढे गेल्यावर हळू
जाणाऱ्या विमानाने वेग पकडला आणि काही क्षणात विमानाने आकाशात झेप घेतली.मी विमान
आकाशात झेप घेत असताना फोन मधला विडीओ मोड सुरु केला आणि आकाशातले क्षण फोन मध्ये
साठवू लागलो.आम्ही १.१९ ला निघालो होतो.चेन्नई एव्हाना ३० मिनटात येणार
होते.हळूहळू आकाशात निसर्गाचे विविध रंग दिसू लागले.निसर्गाचे प्रसन्न रूप पाहत
मला कधी डुलकी लागली कळले नाही.
पायलट च्या 'चेन्नई' जवळ आल्याच्या घोषणेने मला जाग आली.लगेचच मी
खिडकीबाहेर पाहिले.पसरलेले असे अवाढव्य चेन्नई चा top view मला ठळकपणे दिसत होता.Chennai
International Airport ला आम्ही २.०० वाजता उतरलो.लगेचच आम्ही विमानातून बाहेर आलो आणि
विमानतळाच्या दिशेने निघालो.विमानतळ बरेच मोठे होते.सर्व सामान घेऊन लगेचच आम्ही
लॉबी मध्ये काही फोटो काढले.फोटो काढून झाल्यावर आम्ही चेक-आऊट करून बाहेर पडलो.12
sitter Tempo-traveller आमची वाट पाहत उभी होती.मी आजूबाजूचा परिसर पाहत होतो.मला चेन्नई
पेक्षा बेंगलोर चे विमानतळ खूप टापटीप वाटत होते.चेन्नई बद्दल मी खूप गोष्टी
ऐकल्या होत्या.तमिळ भाषेच्या बाबतीत सर्व लोक किती कडवी आहेत हे मला बऱ्याच
मित्रांनी सांगितले होते.त्यामुळे आम्ही google assistant आणि google translator ची मदत घ्यावी
लागणार ह्या इराद्यात होतो.आम्ही आमच्या Tempo-Traveller ची वाट पाहत बसलो.तेवढ्यात Tempo-Traveller
चा चालक हजर झाला.मी
त्याच्याकडे पाहू लागलो.तसा तो कपड्यांवरून आणि अवतारावरून बरा वाटत होता.त्याला
इंग्रजी आणि हिंदी येत असल्याचे पाहून आम्हाला खूप बरे वाटले.एव्हाना आमचा चालक हा
लुंगी नेसलेले...काळा कुट्ट....टक्कल पडलेला आणि हातात रजनीकांत च्या style
ने सिगारेट धरलेला
असेल असे मी गृहीत धरलेले होते.पण सुदैवाने तो तसा नव्हता.आम्ही सगळे गाडीत
बसलो.गाडी तशी खूप मोठी होती.गाडीत बसल्यावर सर्वांनी 'गणपत्ती बाप्पा मोरया' असा
गजर केला आणि आम्ही 'महाबलीपुरम'च्या दिशेने निघालो.दुपारचे ३.०० वाजलेले
होते.एव्हाना सर्वांचे जेवण झालेले होते त्यामुळे कुणाला फारशी भूक लागली
नव्हती.चेन्नई मध्ये बरीच वर्दळ जाणवत होती.बरोबर बहिणी होत्या त्यामुळे भरपूर
धम्माल येत होती.चेन्नई न्याहाळत आम्ही निघालो होतो आणि चेन्नई सिटी च्या बाहेर
असलेले 'दक्षिणचित्र'ह्या museum जवळ उतरलो.Museum टापटीप होते.पूर्ण दक्षिण भारतातला
इतिहास आणि कल्चर तिथे विकसित केले होते.स्वतःच्या भाषेच्या आणि कल्चरच्या बाबतीत
दक्षिण भारतातली जनता किती कडवट आहे हे मला जाणवत होते.पूर्ण museum फिरायला आम्हाला २.३
तास लागले.कायकाय पाहू असे होत होते.५.३० वाजता आम्ही museum च्या बाहेर आलो.बरेच
चालणे झाले होते.एव्हाना समुद्राजवळ असल्यामुळे हवात दमटपणा होता.Museum चे भरपूर फोटो काढून
लगेचच आम्ही सर्वजण गाडीत बसलो आणि 'महाबलीपुरम'च्या दिशेने National Highway वरून निघालो. तामिळनाडू चे रस्ते क्लास
होते.कुठेही खड्डा दिसत नव्हता.लगेचच ६.१५ मिनिटांनी आम्ही 'महाबलीपुरम' ला पोहोचलो.अंधार पडायला
सुरवात झाली होती.तिथे फारशी गर्दी जाणवत नव्हती.जेमतेम १५००० लोकसंख्या असलेले
गाव होते.६.१५ मिनिटांनी आम्ही 'कृष्णाचा बटरबॉल' ह्या अनोख्या वस्तुजवळ पोहोचलो.ती
वस्तू म्हणजे एक मोठा ५०टण च्या आसपास वजन असलेला दगड होता.गुरुत्वाकर्षण ह्या
नियमाचा भंग करून तो दगड एका मोठ्या उताऱ्यावर ३० अंशात चिडीचूप उभा होता.तो दगड
कसा काय उभा आहे ह्याचे उत्तर अजून कुणालाही मिळाले नाही.अशे ४-५ दगड होते.पण ते
आकर्षणाचे केंद्र ठरत होते.ती वस्तू पाहत असताना सर्वांना अप्रूप वाटत
होते.त्यापाठोपाठ तिथे पांडवांची जुन्या काळातली एक जतन करून ठेवलेली खोली आम्ही
पाहिली.सर्व पाहून झाल्यावर आम्ही ७.०० वाजता बाहेर पडलो आणि आमचे हॉटेल 'सी ब्रिज' कडे निघालो.हॉटेलमध्ये आम्हाला वेलकम ड्रिंक देण्यात आले.त्याचबरोबर शिंपल्यांचा
हार देण्यात आला.हॉटेलमध्ये उतरल्यावर आम्ही लगेच फ्रेश होण्यासाठी रूम कडे गेलो.हॉटेल
समुद्राजवळ होते.त्यामुळे भरपूर दमटपणा जाणवत होता.रूम पाहिल्यावर मला 'रामगोपाल
वर्मा' चे भीतीदायक सिनेमे आठवू लागले.रूम बरीच भीतीदायक वाटत होती.रूम मध्ये
मुंगीएवढे ventilation जाणवत होते.पण हा सुद्धा नवीन अनुभव होता.एक रात्र आम्हाला काढायची
होती.लगेचच फ्रेश होऊनआम्ही रात्री ८.००
वाजता हॉटेल च्या restaurant मध्ये जेवायला गेलो.जेवण अतिशय चवदार होते.भरपेट
जेवण करून आम्ही लगेचच restaurant मधून बाहेर पडलो आणि शतपावली करायला
निघालो.शतपावली करत आम्ही महाबलीपुरम मध्ये फिरत होतो.गाव फारसे मोठे नव्हते.काही
वेळ फिरल्यावर लगेचच आम्ही हॉटेल वर आलो.रात्रीचे १०.३० वाजले होते.लगेचच आम्ही
रूम कडे निघालो.रूम मध्ये मी आल्यावर लगेचच ए.सी सुरु केला आणि दिवसभराचा प्रवास
माझ्या डोळ्यासमोर येऊ लागला.दिवसभर कुठेही धावपळ झाली नव्हती.मग शांतपणे मी ए.सी
चे गार वारे खात निद्राधीन झालो.
Chennai Airport
Chennai
Mahabalipuram
Belgam
About to Land
Dakshinchitra
Top above the Sky
९.११.२०१८
सकाळी ७.०० वाजता आम्ही उठलो.फ्रेश होऊन हॉटेलला लागून असलेल्या बीच
वर गेलो.वातावरण खूप आल्हादायक होते.सकाळी सकाळी शांतपणे वाटणारा लाटांचा आवाज
वेगळ्याच जगात घेऊन जात होता.बराच वेळ मी समुद्राकडे एकटक पाहत उभा राहिलो.डोक्यात
साठलेला सगळा मानसिक कचरा ह्या अश्या अनामिक अश्या शांत लाटांच्या आवाजामुळे निघून
जात होता.अर्धातास समुद्राकडे पाहत मी उभा होतो.बरोबर बहिण आणि भाऊ होते.नंतर
लगेचच आम्ही हॉटेलमध्ये नाष्टा करायला निघालो.इडली,सांबर,डोसा,जूस,omlet,आणि रस्सम
असा मेनू होते.सर्व पदार्थ चविष्ट होते.नाष्टा करून आम्ही लगेचच रूमकडे
निघालो.सकाळी १०.०० वाजता आवरून लगेचच आम्ही बाहेर पडलो.बाहेर आमची Tempo-Traveller
उभी होती.लगेचच
आम्ही सर्वजण 'महाबलीपुरम' मध्ये राहिलेल्या स्पॉट च्या दर्शनासाठी निघालो.तिथे शंकराचे
जुने मंदिर होते.ते पाहायला आम्ही उतरलो.त्या मंदिराला खूप जुना इतिहास होता.मंदिर
पाहून झाल्यावर आम्ही पांडवरथ पाहायला निघालो.अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सर्व वस्तू
जतन करून ठेवल्या होत्या.पांडव रथ पाहिल्यावर भारतातले architecture आणि बांधणी पद्धत
किती दर्जेदार आहे हे मला जाणवत होते.सर्व फोटो काढून झाल्यावर आम्ही लगेचच परत Tempo-Traveller
मध्ये बसलो.बराच
उकाडा जाणवत होता.घश्याची कोरड नाहीशी करून आम्ही लगेच पुढच्या गावाला म्हणजे पॉंडिचेरीकडे बाय-रोड निघालो.तामिळनाडू मध्ये बाय-रोड प्रवास करणे म्हणजे स्वर्गीय-सुख
होते.कुठेही खड्डा जाणवत नव्हता.आमचा चालक देखील सफाईदारपणे गाडी चालवत होता.दुपारी
२.०० वाजता आम्ही वाटेत एका अनोळखी हॉटेल मध्ये जेवायला उतरलो.रस्सम,इडीअप्पम आणि
बरेच पदार्थ होते.सर्वांना जाम भूक लागली होती.भरपेट जेवण करून लगेचच आम्ही Pondicherry
ला निघालो.बरोबर
दुपारी ४.२० वाजता आम्ही Pondicherry ला उतरलो.Pondicherry मध्ये आल्यावर मी शहराच्या जणू प्रेमातच
पडलो.कुठेही गर्दी नाही;गोंगाट नाही;traffic jam नाही.ब्रिटिशांनी अतिशय सुंदर पद्धतीने हे
शहर वसवले होते.
दुपारी ४.३० ला आम्ही हॉटेल सन-वे-manor मध्ये उतरलो.हॉटेल ला ४ स्टार
चा दर्जा होता. हॉटेल पूर्णपणे स्वच्छ आणि टापटीप होते.हॉटेलकडे पाहून मी मनोमन
सुखावलो कारण आम्ही महाबलीपुरम मध्ये अतिशय रहस्यमय अश्या हॉटेल मध्ये
होतो.त्यामानाने हे हॉटेल खूप उत्कृष्ट होते.लगेचच आम्ही bag घेऊन रूम कडे
निघालो.रूम देखील दर्जेदार होत्या.लगेचच फ्रेश होऊन आम्ही रिसेप्शनमध्ये
आलो.लगेचच Tempo-Traveler मधून सायंकाळी ६.३० वाजता पॉंडिचेरी शहरात
निघालो.शहर बरेच मोठे होते.आम्ही प्रोमोनेड बीच कडे निघालो होतो.पॉंडिचेरी पेस्ट्री
आणि आईसक्रीम साठी प्रसिद्ध होते.बीच जवळ बरेच पेस्ट्री आणि केक चे भरगच्च अशी
दुकानं दिसत होती.बीच जवळ बरीच गर्दी दिसत होती.वातावरण आणि हवा देखील स्वच्छ
होते.बीच वर स्वच्छता पाहून काही काळ आपण भारताबाहेर आहोत की काय?...असा प्रश्न
मला पडला.बीच वरून चालत आम्ही 'फ्रेंच कॉलनी' मध्ये आलो.इथे ब्रिटीशकालीन काही घरे
होती.पण स्वच्छता एकदम कडक होती.रस्त्यावर कुठेही घाणीचा लवलेश दिसत नव्हता.तिथून
मग रात्री ८.०० वाजता आम्ही शहरात असलेल्या मोठ्या गणपतीच्या देऊळात गेलो.बरीच
गर्दी जाणवत होती.देऊळ देखील बरेच जुने होते.रांगेमध्ये उभे राहून आम्ही दर्शन
घेऊन बाहेर पडलो आणि थेट हॉटेलमध्ये परतलो.
हॉटेल मध्ये जेवणाची वेळ झाली होती.आम्ही जेवायला सर्वजण एकत्र
जमलो.जेवण देखील ५ स्टार दर्जाचे होते.दर्ज्याच्या बाबतीत कुठेही कमतरता जाणवत
नव्हती.विशेषतः शिरा आणि दहीभात.रात्री ९.३० ला जेवण करून आम्ही परत रूम कडे निघालो.रूम मध्ये मी आणि
माझा भाऊ एकत्र बसलो होतो.आजचा दिवस बराच धावपळीत गेला होता.लगेचच आम्ही शांतपणे
लेट-नाईट गाणी ऐकत निद्राधीन झालो.
Beauty in Name:- Paradise Beach
१०.११.२०१८
सकाळी ७.०० वाजता मी उठलो.उठून सकाळचे विधी करून मी हॉटेलमध्ये
असलेल्या जिम मध्ये व्यायाम करायला गेलो.जिम बऱ्यापेकी compact होते.तिथे एक तास
व्यायाम करुन मला फ्रेश झालो.व्यायाम करून मी आणि माझा भाऊ लगेचच
नाष्ट्यासाठी हॉटेलमध्ये आलो.गरमगरम इडली;डोसे आणि रस्समचा स्वाद
घेऊन आम्ही दोघे आवरायला रूमकडे निघालो.सकाळी १०.०० वाजता सर्वजण आवरून हॉटेल
च्या reception मध्ये आलो.तिथून सर्वजण टेम्पो-traveller मधून पॉंडिचेरी च्या
सुप्रसिद्ध अश्या 'Paradise Beach' वर निघालो.५ मिनिटानंतर आम्ही 'Paradise
Beach' च्या entrance
ला आलो.तिथून नऊ
जणांची तिकिटे काढून आम्ही स्पीड बोट ने निघालो.भर समुद्रात असे ते बीच होते.आम्ही
सर्वजण स्पीड बोट मध्ये बसलो.बोट तशी लहान होती.त्यात आम्ही सर्वजण life-jacket
घालून बसलो.मी
driver च्या शेजारी बसलो होतो.मी driver कडे हळूच पाहिले.तो पुरेपूर 'तामिळनाडू' चा शोभत
होता.त्याचबरोबर तो आमच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होता.तो का हसत होता ते
मला कळले नाही.तो मोडकेतोडके हिंदी बोलत होता.लगेचच आम्ही पाण्यातून सुसाट वेगाने Paradise
नावाच्या बेटावर
निघालो.२ मिनिटात आम्ही बीच वर उतरलो.बोटीतून उठ्रून आम्ही सर्वजण बीच च्या प्रवेशद्वारापाशी
थांबलो.तिथे ग्रुप फोटो काढून आम्ही लगेचच बीच कडे निघालो.मी सर्वत्र पाहत होतो.नावाप्रमाणे
तो बीच Paradise(जन्नत)होता.चारही बाजूला आडवातिडवा पसरलेला निळाभोर
समुद्र...बीच वर असलेली कडक स्वच्छता...तिथे सुरु असलेला रेन डान्स...मी अक्षरशः
पाहत राहिलो.इतका सुंदर आणि स्वच्छ बीच मी कधीच पाहिला नव्हता.बीच पाहून मला 'मालदीव' ची आठवण येत होती.बीच वर आल्यावर लगेचच आमचे फोटो सुरु झाले.धडाधड फोटो काढल्यावर
मी तिथे असलेल्या चारचाकी गाडी वर बासून पूर्ण बीच वर फेरी मारली.बीच वर फारशी
गर्दी दिसत नव्हती.दुपारी १२.०० वाजता आम्ही अखेर बेटावरून परत स्पीड बोट ने
निघालो आणि ३ मिनिटात पॉंडिचेरी च्या किनार्यावर आलो.तिथे उतरल्यावर बराच उकाडा
जाणवत होता.लगेचच काही थंड पेये घेऊन आम्ही परत Tempo-Traveller मध्ये एकत्र बसलो
आणि जेवायला शहरात गेलो.
दुपारी २.३० वाजता सगळे जेवण करून परत आम्ही हॉटेलमध्ये परतलो.काही
काळ विश्रांती घेऊन आम्ही परत Aurobindu आश्रम
पाहायला बाहेर पडलो.शहराच्या मध्यभागात 'प्रोमोनेड बीच' जवळ ते आश्रम होते.दुपारी ३.३०
वाजता आम्ही आश्रमाजवळ होतो.मला 'औरोबिंदू' ह्या व्यक्तीबद्दल फारसे माहिती
नव्हते.पण आश्रमाजवळ आल्यावर तिथे बरेच परदेशातून काही पर्यटक आले होते.आम्ही
लगेचच आश्रमात गेलो,आत निरव शांतता होती.अवघ्या काही मिनिटात आम्ही आश्रमातुन बाहेर आलो.लगेचच आम्ही अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या
प्रोमोनेड बीच वर निघालो.सायंकाळचे पाच वाजले होते.बीच वर मस्त वातावरण
होते.समुद्राच्या लाटा पाहत मी शांतपणे काहीवेळ उभा होतो.शांतपणे येणाऱ्या लाटा पाहत
मला वेगळाच आनंद मिळत होता.तासभर बीच वर फेरफटका मारून आम्ही हॉटेलच्या दिशेने
निघालो.हॉटेलकडे जाताना वाटेत आम्ही शहरात मोठ्या मॉलमध्ये खरेदीचा आनंद
लुटला.खरेदी करून रात्री ८.०० वाजता परत आम्ही हॉटेल ला परतलो.मला प्रचंड भूक
लागली होती.लगेचच जेवण करून मी शांतपणे रूम मध्ये जाऊन झोपलो.
Aurovlle Garden
११.११.२०१८
सकाळी ७.३० वाजता आम्ही उठलो.फ्रेश होऊन मी आणि माझा भाऊ नाष्टा
करायला हॉटेलच्या restaurant ला गेलो.तिथे सकाळ सकाळ गरम इडली;डोसा आणि शिरा
खावून आम्ही लगेचच रूम कडे गेलो.अंघोळ करून आम्ही चेक-आउट साठी तयार झालो.आज आम्ही 'पॉंडिचेरी' मधून बाहेर पडून 'चेन्नई' ला जाणार होतो.सर्वजण आपआपल्या bag घेऊन रिसेप्शन
ला हजर झाले.आम्ही बाहेर पडलो.सकाळचे १०.३० वाजले
होते.आज आम्हाला जाताना वाटेत 'औरोविल्ले' पहायचे होते.
'Auroville' पुडुचेरी पासून १५
किलोमीटर वर होते.आम्ही बाय-रोड निघालो.सकाळी ११.१५ वाजता आम्ही तिथे पोहोचलो.पूर्णपणे निसर्गात वसलेले असे
ते 'औरोविल्ले' होते.जगभरातील लोकं तिथे राहत होते.आम्ही पायी चालत
औरोविले चा पूर्ण परिसर पाहत निघालो.पूर्णपणे निसर्गात वसलेले असे ते अनोखे शहर
होते.तब्बल तीन तास निसर्गाची अनोखी रूपं आणि विलोभनीय असे असलेले औरोविले पाहून
आम्ही दुपारी ३.०० वाजता बाहेर पडलो आणि चेन्नई च्या दिशेने निघालो.
बाय-रोड प्रवास अतिशय आनंद देणारा होता.कारण कुठेही खड्डा दिसत
नव्हता.न-थांबता आम्ही निघालो होतो.सायंकाळी ७.३० वाजता आम्ही चेन्नई मध्ये
आलो.चेन्नई प्रचंड अजस्त्र होते.आम्ही रात्री ८.१५ वाजता 'बेन्ज पार्क' नावाच्या
हॉटेल वर उतरलो.हॉटेल बर्यापेकी मोठे होते.लगेचच आम्ही उतरलो.सामान घेऊन आम्ही
रिसेप्शन जवळ आलो.तेवढ्यात आमचे सामान घ्यायला वेटर पळत आले.रिसेप्शन मध्ये चेक-इन
करून आम्ही लगेचच रूमकडे निघालो.हॉटेल 'चेन्नई' च्या अलिशान अश्या भागात होते.हॉटेल
ची रूम बऱ्यापेकी मोठी होती.फ्रेश होऊन आम्ही लगेचच जेवायला हॉटेलच्या Restaurant
ला आलो.रात्रीचे ९.००
वाजले होते.जेवण देखील दर्जेदार होते.जेवण करून सर्वांचे पोट आणि मन तृप्त झाले.जेवण
झाल्यावर शतपावली करून आम्ही परत हॉटेलमध्ये आलो आणि शांतपणे निद्राधीन झालो.
१२.११.२०१८
अखेर बघता बघता ट्रीप चा शेवटचा दिवस आला.सकाळी ७.०० वाजता मी
उठलो.फ्रेश होऊन मी आणि भाऊ नाष्टा करायला हॉटेलमध्ये गेलो.गरमगरम इडली सांबार आणि
रस्सम पिऊन मी आवरायला रूम कडे गेलो.आज आमची दुपारची ४.०० ची 'हुबळी' ला जाणारी
फ्लाईट होती.सकाळी ९.०० ला आवरून आम्ही रिसेप्शन जवळ आलो.तिथून 'चेन्नई' मध्ये खरेदी
करायला गेलो.हॉटेल जवळच 'पोथी' नावाचा मॉल होता.तिथे सर्वजण गेलो.मॉल प्रचंड मोठा
होता.तिथे विविध प्रकारच्या साड्या आणि कपड्यांची रेलचेल होती.तिथे गेल्यावर आमची
भलतीच अडचण झाली.तिथे असलेल्या स्टाफ ला हिंदी तोडकेमोडके येत होते.मग आम्ही तोडकेमोडके
हिंदी आणि इंग्रजी बोलत खरेदी सुरु केली.
दुपारी १२.१५ ला आम्ही परत हॉटेल वर आलो.आमचे सामान रिसेप्शन जवळ होते.हॉटेलमध्ये जेवण करून आम्ही दुपारी १.४५
ला विमानतळाच्या दिशेने बाहेर पडलो.चेन्नई मध्ये दुपारी प्रचंड ट्राफिक
होते.दुपारी २.५५ वाजता आम्ही विमानतळावर आलो.सामान Tempo-Traveller मधून बाहेर काढून
आम्ही आमच्या चालकाचा निरोप घेतला आणि गडबडीत चेक-इन करत विमानतळाच्या दिशेने
पळत सुटलो.दुपारी ३.२० पर्येंत विमानतळावरच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून आम्ही
अखेर चेक-इन गेट जवळ आलो.अजून विमान यायचे होते.म्हणून अखेर सर्वांनी सुटकेचा निःश्वास
सोडला.३.३० ला इंडिगो चे विमान आले आणि ३.४० ला आम्ही विमानात निघालो.विमान गच्च
भरलेले होते.आम्ही सर्वजण आपपल्या सीट जवळ गेलो.मी खिडकीच्या बाहेर पाहू
लागलो.चेन्नई विमानतळाचा रनवे मला दिसत होता.अखेर आमची ४ दिवसांची ट्रीप
संपली.आम्ही सर्वजण मानसिक रित्या फ्रेश झालो होतो.वर्षातून अशी लहान भटकंती
करायला मी कायम आसुसलेला असतो.अखेर टेक-ऑफ ची घोषणा झाली.मी सीट घट्ट धरून
बसलो.विमानाने वेग घेतला आणि बघता बघता विमानाने आकाशात झेप घेतली.विमानात तब्बल ४
सुंदर्या होत्या.मी हळूच त्यांच्याकडे पाहत होतो.Vanilla Ice-cream ला लाजवेल असा गोरा
वर्ण,लाल-बुंद रंगाने रंगवलेले ओठ,मस्कारा,पुण्याच्या हिरवळी फिक्या पडतील अश्या
हवाई सुंदरी पाहत पाहत सायंकाळचे ५.१५ कधी वाजले कळले नाही.अखेर विमान हुबळी च्या
विमानतळावर आले आणि आम्ही शांत....तृप्त...आणि आनंदाने ओले होऊन परत भटकंतीला
नक्की जायचे हा विचार मनात पक्का करून विमानतळावर उतरलो.