Wednesday, 20 February 2019

Film Review:- Gully Boy

’स्वप्न पाहायला शिका.’’
‘’ Think big, think fast, think ahead. Ideas are no one's monopoly.’’


भारतातला एक मोठा उद्योगपती वरील शिकवण देऊन गेला आहे.हीच शिकवण सध्या ‘’ गल्ली बॉय’’ सिनेमा मधून देण्यात आली आहे.

मुंबईच्या धारावी मध्ये राहणाऱ्या मुराद(रणवीर सिंग)च्या आयुष्यावर पूर्ण कथा आहे.अत्यंत हलाखीच्या अवस्थेमध्ये राहत असणारा ‘मुराद’ rap नामक संगीतातल्या प्रकाराचा चाहता असतो.Rap संगीतामध्ये काहीतरी करायची त्याची इच्छाशक्ती आणि जिद्द असते.भारतातला rap संगीतकार होण्यासाठी त्याची धडपड सुरु होते.पण ही धडपड आणि खटपट सोपी नसते.ह्या त्याच्या खटपटीमध्ये त्याला मदत मिळते त्याचा मित्र एम.सी.शेर(सिद्धांत चतुर्वेदी) आणि सफिना( आलिया भट्ट) आणि रझिया(अमृता सुभाष) ह्यांची.

रीमेक पाहून कंटाळून गेलेल्या आणि त्याच त्याच ढापलेल्या सुमार कथांचे पिक्चर पाहून वैतागून गेलेल्या प्रेक्षकांना हा सिनेमा म्हणजे मोठी मेजवानी आणि खजिना आहे.धारावी ची खरीखुरी परिस्तिथी ह्यामध्ये दाखवण्यात आली आहे.लहान आणि धारावी सारख्या भागात राहणाऱ्या २२ वर्षाच्या मुलाची अवस्था...त्याच्या कुटुंबाची होणारी घालमेल... तरुण वयात त्याची असणारी स्वप्न आणि इच्छा...आणि त्या पूर्ण करायला त्याला करावी लागणारी दुनियादारी...त्याला मदत करणारी सफिना(आलिया भट्ट)....लहान कुटुंबामध्ये असणारे वातावरण...ह्या गोष्टींवर मोठा प्रकाश पाडण्यात आला आहे.

कथा आणि शब्दांच्या बाबतीत ‘जावेद अख्तर’ ह्यांचे कुटुंब म्हणजे साक्षात जादुगार.मग ते त्यांचे सुपुत्र फरहान अख्तर असोत अथवा त्यांच्या कन्या झोया.कथा..आणि गाणी कशी लिहायची...कशी मांडायची...आणि कशी चित्रित करायची ह्याबाबतीत जावेद अख्तर;फरहान अख्तर; आणि झोया अख्तर ह्यांना तोड नाही.वास्तववादी असे काही संवाद कथेमध्ये किक मारतात.

रणवीर सिंग....हा माणूस सध्या जिंकत सुटला आहे.

आलिया भट्ट....कुलोत्पन भट्ट कुटुंबाची लाडकी असणारी हिरवळ इथे खूप खुलून गेली आहे.वांड भूमिका करणारी अशी हिरवळ आपल्या आयुष्यात देखील असावी असे सिनेमा पाहताना प्रत्येक bachelor च्या मनात येते.

सिद्धांत चतुर्वेदी....क्लास

अमृता सुभाष आणि इतर कलाकार...पुअर talent

सिनेमाची गाणी.... आणि संगीत....मोठी पर्वणी आहेत.दोन कुटुंबातील अंतर दाखवणारे “ दुरी...’’ हे गाणे अक्षरशः मनात घुसते आणि शेवटचे गाणे....जे अक्षरशः अंगातला किडा बाहेर काढते.
“अपना टाईम आयेगा...तू नंगा ही तो आया है क्या घंटा लेकर जायेगा...”
माझ्याकडून एन स्टार्स.....


अंगातला किडा बाहेर काढायला पिक्चर पहाच...

©kaushik

No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...