Wednesday, 7 August 2019

पुस्तक सफर:-वाटा; लेखक:-व्यंकटेश माडगूळकर

आजवरच्या प्रवासात अनेक 'वाटा' तुडवाव्या लागल्या.

....फार लवकर वयात घराबाहेर पडलो.सोळाव्या वर्षीच या वाटा संपल्या आणि मी भटकत राहिलो.पाय नेतील ती वाट..सोबत नाहीच.इतकी वर्षे झाली, पण अजूनही पायाखाली मळलेली वाट आहे,असा भरवसा नाही.हीच का वाट, असा सारखा संशय!

मानवी जीवनाच्या संघर्षाचे विविध रूपात केलेले वर्णन...

👍👌👍👍👍

©
कौशिक श्रोत्री

Sunday, 4 August 2019

पुस्तक सफर:- नागझिरा ; लेखक:- व्यंकटेश माडगूळकर


“वाहणारे पाणी...”
“विविध पक्षांचा येणारा आवाज...”
“टी-बुक...टी-बुक..असा येणारा आवाज...”
“उंचच्या उंच अजस्त्र एकमेकांना लपेटलेली झाडे..”
“मधूनच येणारा पाऊस...”
“विरळ होत जाणारे धुकं...”
“निर्मनुष्य रस्ते...”
“विविध स्वरांमध्ये ऐकू येणारा पक्षांचा आवाज...”
“अखंड वाहणारे पाणी...”
“मधूनच येणारे आवाज...”
“सर्र...सर्र...येणारे आवाज...”
भंडारा जिल्ह्यामध्ये “ नागझिरा” अभयारण्यात गळ्यात दुर्बीण,मनात अखंड उत्साह आणि जंगल सफारी...ह्या सर्व गोष्टी श्री.वेंकटेश माडगुळकर ह्यांनी कागदावर उतरवल्या आहेत.
जंगल सफारीचा अनुभव घेण्यासाठी आणि निसर्गरम्य होण्यासाठी हे पुस्तक वाचाच.
४ स्टार्स
©
Kaushik


Thursday, 1 August 2019

भूत-अद्भुत लेखक:- श्री.रत्नाकर मतकरी


प्राध्यापक थट्टेवारी, नावाच्या मानाने खूप गंभीर होते.मुख्य म्हणजे ते कधीही, कुठलीही गोष्ट मस्कारीमध्ये करत नसत.सतत गंभीर.
तसे त्यांचे फारसे वय नव्हते.अजूनही त्यांचे लग्न झाले नव्हते.पण कपाळावर असलेले आठ्यांचे २४ तास जाळे आणि जाड भिंगांचा असलेला चष्मा, यामुळे तिशीचे प्राध्यापक पन्नाशीचे दिसत.माणूस कायम गंभीर राहिला तर तो लवकर म्हातारा होतो तो असा...
ते हे प्राध्यापक कॉलेजमध्ये गंभीर आणि तत्वज्ञानी विषय शिकवत असत.ते शिकवत असताना विद्यार्थी देखील गंभीर होत असत.तत्त्वज्ञान! विषय गंभीर..मुले गंभीर आणि मास्तर पण गंभीर.कुणाला कंटाळा आला तर तो गंभीर होऊन जांभई देत असत.सारे वातावरण असे गंभीर असायचे कि झाडावर असलेल्या चिमण्या देखील गंभीर होत असत.
अशात ह्या महाशयांना महागंभीर विषय लिहायची हुक्की आली.विषय होता “विश्वाच्या उत्पातीपासून चराचर व्यापून राहिलेल्या अगणित योनींमध्ये पिशाच्चयोनीची गणना...” थोडक्यात “ ह्या जगात भूत आहे का...”
आणि...हा विषय लिहायला हे जाड भिंग घालणारे मास्तर लांब अशा एका गावात जातात..आणि सुरु होतो मग...कथेचा विस्तार
स्टोरीटेलिंग..आणि बऱ्याच विषयांचे बादशाह असलेले श्री.रत्नाकर मतकरी ह्यांचे हे पुस्तक वाचाच....
७ स्टार्स
©
Kaushik

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...