Tuesday, 13 March 2018

Book Review:- How to fail in Life, Written by:- Mr.Harshad Barve

सदरचे पुस्तक हे लेखकाच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याचे  अनुभवाचे बोल आहेत. खासगी  आणि  व्यावसायिक आयुष्यात कोणत्या चुका करू नयेत ह्यावर बराच प्रकाश टाकला आहे.व्यवसाय करत असताना कुठल्या चुका टाळाव्यात ह्यावर खूप खोलात भाष्य केले आहे. मला पुस्तकाच्या काही भावलेल्या गोष्टी:-
१. व्यवसाय आणि आयुष्यात वेळेची किंमत ठेवा नाहीतर वेळ तुमची किंमत ठेवणार नाही.
२. आयुष्यात आणि व्यवसायात संधी एकदाच येते त्यामुळे आलेली संधी सोडू नका.
३. ज्या गोष्टी माहिती आहेत त्या माहिती आहेत आणि ज्या माहिती नाहीत त्या माहिती नाहीत हा दृष्टीकोण ठेवा.
४. व्यवसाय करत असताना SWOT Analysis करूनच सुरु करा.
५. आपल्या आवडत्या गोष्टी सहजा सहजी सोडू नका. उदाहरण:-चित्रकला,अभिनय,लेखन,फोटोग्राफी...
६. व्यवसाय करत असताना एकाच वेळेला अनेक कर्ज घेऊ नका.
७. दिलेला शब्द पाळा.
८. घरच्या व्यक्तींपासून काहीही लपवू नका.
९. खोट्या थापा अजिबात मारू नका.
१०. चुकीची गुंतवणूक करू नका.
११. नाते-संबंध आणि व्यवसाय ह्यात गल्लत नको.
लेखकाचे सर्व अनुभव अतिशय परखड आहेत. त्यामुळे आपल्या रोजच्या आयुष्यात आणि व्यवसाय किंवा नोकरी करत असताना कोणत्या चुका करू नयेत हे कळण्यासाठी पुस्तक वाचाच
*****
समीक्षण :-कौशिक
©
इचलकरंजी
(सदरचे समीक्षण हे निव्वळ पुस्तक वाचन वाढावे ह्या हेतूने लिहिलेले आहे)
लेखक :-हर्षद बर्वे



No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...