मला अजूनही मी आठवीत असतानाचे दिवस आठवतात. माझ्या बाबांनी मला अग्निपंख पुस्तक वाचण्यास दिले होते. पुस्तक देण्यामागे बरीच कारणे होती. माझा रखडत असलेला आत्मविश्वास आणि दूरदृष्टीचा अभाव... आणि बरीच कारणे... होती.मी आठवीत असताना अग्निपंख पूर्ण वाचून काढले होते आणि नववी मध्ये माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले होते.माझा गेलेला आत्मविश्वास परत आला होता.पूर्णपणे हिमतीने मी जगासमोर उभा राहू लागलो आणि वर्गात पहिल्या दहा क्रमांकांमध्ये माझे नाव झळकले होते.
तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोट्या धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाड्याच्या पोटी १९३१मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष ह्या गोष्टींवर फोकस केला आहे.पूर्ण अनुवाद माधुरी शानबाग ह्यांनी केला आहे.
तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोट्या धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाड्याच्या पोटी १९३१मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष ह्या गोष्टींवर फोकस केला आहे.पूर्ण अनुवाद माधुरी शानबाग ह्यांनी केला आहे.
अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे; तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्यही आहे.
अग्निपंख हे पुस्तक परत मी २०१८ मध्ये पूर्ण वाचून काढले. सदरचे पुस्तक हे हिम्मत आणि चिकाटी ह्या गोष्टींनी भरलेला सागर आहे. भारताचे राष्ट्रपती डॉ. कलाम ह्यांचे आयुष्य अतिशय सुंदरपणे मांडलेले आहे. त्यांचे बालपण,कॉलेज चे दिवस,इसरो चे दिवस,डॉ. विक्रम साराभाई ह्यांच्याबरोबर त्यांनी केलेले काम.... आणि खूप काही गोष्टी नेमक्या पद्धतीने मांडलेल्या आहेत.
मला भावलेल्या गोष्टी:
१. अपयश हे यशाचे सार आहे म्हणून खचून जाऊ नये.
२. यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी परमेश्वराने आपल्यात जन्मतः पेरल्या आहेत फक्त आपण त्या गोष्टी ओळखल्या पाहिजेत.
३. कितीही अपयश आले तरी एक गोष्ट लक्षात ठेवा'' जगात कायमचे काही नसते''.
४.तरुण वयात फक्त काम करत रहा फळांची अपेक्षा करू नका.
५. एखाद दुसरे अपयश आले म्हणून अजिबात खचून जाऊ नका आणि टोकाला अजिबात जाऊ नका.
६. परमेश्वराने आपल्यात एक शक्तीशाली ताकद दिली आहे ती म्हणजे आपले विचार;त्यामुळे नकारात्मक विचार अजिबात करू नये.
प्रत्येक तरुणाच्या आयुष्याला कलाटणी देणारे आणि डॉ. कलाम ह्यांच्या प्रेरणा देणाऱ्या आयुष्यावर फोकस टाकणारे आणि तंत्रज्ञानविषयक लढाईचे साक्षीदार असलेले पुस्तक प्रत्येक तरुणांनी अवश्य वाचावे आणि आपले आयुष्य समृद्ध करावे.
कौशिक
©
No comments:
Post a Comment