सायंकाळचे सात वाजले होते.विकएन्ड असल्यामुळे मॉल मध्ये खूप गर्दी झाली होती.अश्या गर्दीतून वाट काढत ती मॉल मध्ये तिच्या wagnor गाडीमधून येत होती.गाडी पार्किंग मध्ये लावून ती गाडीमधून उतरली आणि मॉल मध्ये असलेल्या सी.सी.डी कडे निघाली.पाच फुट दहा इंच उंची,कतरिना ला ही लाजवेल असा गोरा वर्ण,निळे डोळे,चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास,लाल रंगाचा ड्रेस आणि ब्लू जीन्स आणि पर्फुम चा घमघमाट येत असल्यामुळे तिच्या सौंदर्याकडे मॉल मध्ये असलेली तरुण मंडळी डोळे भरून पाहत होती.सर्व तरुण मंडळीं तिच्याकडे डोळे फाडून पाहत असताना तिला त्याचे काहीच वाटत नव्हते.ती ताडताड चालत सी.सी.डी कडे निघाली होती.सी.सी.डी बऱ्याच जोडप्यांनी भरलेले होते.सी.सी.डी च्या कोपऱ्यात तिचे लक्ष गेले.तो कानात हेडफोन घालून तिथे बसला होता.ती त्याच्या समोर जाऊन बसली.सी.सी.डी मध्ये असलेल्या सर्व तरुणांचे तिच्याकडे लक्ष गेले.
ती,’’Hi!!!.
तो कानात हेडफोन घालून गाणी ऐकत I-Pad वर काम करत बसला होता.त्याचे तिच्याकडे लक्ष गेले नाही.
ती जागची उठली आणि त्याच्या कानातला हेडफोन तिने बाजूला काढला.
ती,’’Hi!! कुठे लक्ष आहे तुझे?
तो आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता.
तो,’’मी कामात होतो.मला महत्वाचा मेल करायचा होता.’’
ती,’’वाह!वाह! सी.सी.डी काय कामाची जागा आहे का??
तिच्या चेहऱ्यावर चिडचिड जाणवत होती.
तो,’’(शांतपणे) हो...एका हातात कॉफी आणि दुसऱ्या हातात काम...’’
ती,’’ बघेल तेव्हा तू कामातच असतोस.आपण फोन वर असतो तेव्हा देखील तू कामातच असतोस.आता मला कॉफी साठी पण विचारणार नाहीस.’’
तो(गोड आवाजात),’’अगं, मी तुला विचारणारच होतो पण त्याआधी तूच मला विचारलेस.तू काय घेणार कॉफी की आणखीन काही...’’
ती तडक जागची उठली आणि counter वर जाऊन order देऊन आली.
ती(चिडचिड करत),’’ असा कसा रे तू.एवढ्या लांबून मी तुला भेटायला आली आहे काही तरी compliments देशील मला पाहून असे मला वाटत होते पण...’’
तो,’’सर्व मुली ह्या खूपच सुंदर असतात.काही मनाने सुंदर असतात;काही रूपाने सुंदर असतात.तुम्हा मुलींच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास असेल तर तुम्ही खूप सुंदर दिसता त्यासाठी तुम्हाला मेक-अप करायची काही सुद्धा गरज नाही’’.
ती,’’हो का....बरर......’’
ती(मनातल्या मनात),’’किती तत्व सांगत आहे हा.एवढी मी मेक-अप करून आले तरीही ह्याचे लक्ष्य कसे नाही.तिथे मॉल मध्ये सर्व मुलं डोळे फाडून मला पाहत होती आणि हा..... मी कशी दिसते ह्याचे उत्तर सरळ सरळ देता येत नाही ह्याला.’’
तेवढ्यात तिची कॉफी आली.
ती(कॉफी चे घुटके घेत),’’हे पहा,आपले relation आता पुढे कसे जाणार?मी खूप विचार केला आहे.लग्न झाल्यावर आपण काही दिवस तुझ्या घरी राहू मग स्वतंत्र घरात राहू.’’
तो,’’लग्न.....मी इतक्यात लग्न करणार नाही. माझी आत्ता कुठे career ची सुरवात आहे’’.
ती,’’ का.....आपण फोन वर बोलताना तू खूप लग्नाच्या आणि प्रेमाच्या गुलूगुलू गोष्टी करत होतास.Career सेट होईल.आता मी मागणी केल्यावर तुझे पाय लटपटत आहेत.’’
तिच्या आवाजाची तीव्रता वाढत जात होती.C.C.D मध्ये सर्व जण तिच्याकडे पाहू लागले.
ती,’’Disgusting. मुलं सगळी एकसारखीच.फक्त एकत्र तुम्हाला फिरायचे असते आणि एकत्र राहायची वेळ आली की लगेचच तुम्हाला विचार करायला वेळ पाहिजे’’.
तो,’’माझं ऐकून तरी घे..’’
ती जागची उठून बसते.तिची कॉफी संपलेली असते.
ती,’’Enough is enough. I am breaking up with you. Go to hell’’.
ती तिच्या पर्स मधून काही कागदपत्रे त्याच्या तोंडावर मारून निघून जाते.तिच्याकडे(तो सोडून) सर्वजण निर्विकार पणे पाहत राहतात.
ती पार्किंग मध्ये येते.ती गाडीकडे जात असताना तिला कुणाची तरी हाक ऐकू येते.
‘’Hi...”
त्या हाकेकडे ती पाहते आणि तिला धक्काच बसतो.
“Hi, I am Nikhil your Facebook Instagram friend. Finally, we are meeting the first time in C.C.D.I was calling you since last 1 hour but you did not picked up my call. By the way, you look pretty.’’.
ती त्याला निरखून पाहते.तिचे निळे डोळे आश्चर्यचकित झालेले असतात.
ती,’’Hi Thanks. Sorry I was unable to pick up your phone’’.
ती(मनातल्या मनात),’’ हा जर का निखील आहे तर मग मी C.C.D मध्ये ज्या मुलाबरोबर होते तो कोण होता....?’’