Monday, 16 January 2017

सिने परीक्षण ट्रिपल X -रिटर्न ऑफ क्सान्डर केज

XXX-नावावरून ह्या सिनेमाची कथा हि अतिशय रोमांचकारी असणार अशी मला खात्री होती . हॉलिवूड चा अष्टपैलू अभिनेता,लेखक ,स्क्रिप्ट लेखक  विन  डिझेल चा मी अट्टल चाहता असल्याने हा  सिनेमा मी चुकवायचा नाही असे ठरवले . सदरच्या सिनेमाची कथा  XANDER CAGE (vin diesel ) एक सरकारी गुप्तहेर च्या आयुष्यापासून सुरवात होते . प्रचंड बलशाली व्यक्तिमत्व ,टॅटू नि गोंदवून घेतलेले व ८ बिस्कीट असलेले शरीर ,अतिशय चपळ व स्वतःचे आयुष्य मनसोक्त जगणाऱ्या  एक ऍथलेट असलेला हा विन एका मोठ्या अपघातापासून बचावतो . नंतर त्याची भेट एका गुप्तहेर संस्थेच्या एका प्रमुखांशी होते.अमेरिकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असलेले व अंतराळातले उपग्रहांची देखरेख करणारे एक गॅजेट अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थेमधून चोरीला जाते . अतिशय महत्वाचे असलेले गॅजेट शोधण्याची जबाबदारी अमेरिकेतील सर्वोच्च असलेली संस्था Xander कडे सोपवते . ४ लोकांचा समूहाने ते गॅजेट ची चोरी केली आहे हे कळल्यावर त्या गॅजेट च्या शोधात निघालेल्या Xander  ची भेट सेरेना (दीपिका पदुकोन )शी होते .दीपिका ,डोणी येन ,रुबी रॉस ह्या लोकांकडे असलेले गॅजेट खोटे आहे हे कळल्यावर  कथेमध्ये मोठा ट्विस्ट येतो व Xander,सेरेना  व त्याची टीम मोठ्या पेचात सापडती . त्यातून मोठ्या चलाखीने Xander व त्याच्या टीम ला गॅजेट सापडते व सिनेमा संपतो .
सदरचा सिनेमा पहिल्या शॉट पासून आपल्याला गुंतवून ठेवतो . विन डिझेल चे अफलातून स्टंट ,५० फूट टॉवर वरून मारलेली उडी ,वेळ आणि वेग ह्या २ गोष्टींशी सांगड ना घालता ऑडी ह्या गाडीच्या वेगाला थक्क करणारे त्याचे स्केटिंग कौशल्य , समुद्राच्या लाटेतूनही आरपार जाणारी  त्याची गाडी ,पॅराशूट न घालता १००० फूट आकाशातून मारलेली उडी ,निव्वळ डोळ्यांच्या नजरेने व व्यक्तिमत्वाने  सिनेमा मध्ये मुलींना हि आपलंसं करणारे Xander चे व्यक्तिमत्व पाहून टाळ्या व शिट्यांचा मोह आवारात नाही . हॉंकॉंग चा अभिनेता Donnie व ऑस्ट्रेलिया ची अभिनेत्री रुबी रोझ चा अभिनय व स्टंट पाहून आपले ८० टक्के पैसे वसूल होतात . भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोन ची छाप ह्या सिनेमा मध्ये दिसते . पण विन डिझेल च्या अभिनय व व्यक्तिमत्वासमोर ती फिकी पडते . सिनेमा ची कथा थोडीफार फास्ट अँड  furious च्या कथेशी आठवण करून देते .कथेमधील काही उणिवा आहेत .त्याची भरपाई विन डिझेल कडून होते . 
निखळ मनोरंजन ,स्टंट बाजी,विन डिझेल चा अभिनय व गोरीघारी दीपिका पदुकोन ला पाहण्यास हा सिनेमा नक्की पाहावा 
पूर्ण पैसे वसूल . 
३ स्टार्स 
लेखन -कौशिक विद्याधर श्रोत्री 
९९२१४५५४५३
वितरणाचे सर्व हक्क राखीव .


Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...