माझा दिवस रोज सकाळी ६. ०० ला सुरु होतो . सकाळी निद्रेतून बाहेर आल्यावर सकाळ ,महाराष्ट्र टाइम्स ,टाइम्स ऑफ इंडिया वाचल्याशिवाय दिवसाची सुरवात सध्या कुणाचीच होत नाही . सकाळ व महाराष्ट्र टाइम्स मध्ये मी सध्याच्या बातम्या ,आर्थिक बातम्या ,नोकरीच्या बातम्या वाचत होतो . पेपर वाचत असताना काही बातम्या माझे लक्ष वेधून घेत होत्या . कमी होत असलेल्या नोकऱ्या ,चालू असलेली जागतिक मंदी ,तडकाफडकी काढून टाकलेले इंजिनिअर ,ह्या बातम्यांनी सध्या दिवस सुरु होत होता . आणखी एका बातमीने मला अस्वस्थ केले . सकाळ मध्ये पहिल्या पानावर एका दुसऱ्या वर्षी शिकत असलेल्या विद्यार्थ्याने नस कापलेली बातमी होती व टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एका तिसऱ्या वर्षी शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बिल्डिंग वरून उडी मारलेली बातमी होती . हि बातमी वाचून माझ्या काळजात धस्स झाले . मी चहा बाजूला ठेवला व पूर्ण बातमी वाचली . हे विद्यार्थी मेकॅनिकल इंजिनीरिंग ला शिकणारे होते . सुदैवाने त्यांना वाचवण्यात यश आले असल्याने मला हायसे वाटले . त्यांनी एवढ्या टोकाचा घेतलेला निर्णय ह्यामागचे कारण होते त्यांना शिक्षणात आलेले अपयश .हे कारण वाचल्यावर मला त्या दोघांचा खूप राग आला . त्यांनी का आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला ?ते नर्वस होते का ?त्यांना स्वतःच्या आयुष्याबद्दल प्रेम नव्हते ?त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण हेच सर्वोच्च मानले ?
ह्या नकारात्मक बातम्या वाचून मी पुढे पेपर वाचन केले नाही . मी चहा पिऊन आवरलो व सॅक घेऊन सकाळी ६.३० ला व्यायाम करण्यासाठी बाहेर पडलो . जिम ला जाताना मी विचार करत होतो . मला त्या दोन मुलांची दया आली . अपयश पचवायची त्यांच्यात हिम्मतच नव्हतीच का ?त्यांच्याकडे कुणी शिक्षकांनी लक्ष का नाही दिले ?त्यांच्या आई वडिलांना किती त्रास झाला असणार ?एवढ्या टोकाला जायचे काय कारण होते ?
मला माझं मेकॅनिकल इंजिनीरिंग चे दिवस आठवले . मला सांगायला अजिबात संकोच वाटत नाही की मी तीनदा नापास झालो होतो . बऱ्याचदा मला काही ठराविक शिक्षकांनी बोलून बोलून माझे जोरदार
ह्या नकारात्मक बातम्या वाचून मी पुढे पेपर वाचन केले नाही . मी चहा पिऊन आवरलो व सॅक घेऊन सकाळी ६.३० ला व्यायाम करण्यासाठी बाहेर पडलो . जिम ला जाताना मी विचार करत होतो . मला त्या दोन मुलांची दया आली . अपयश पचवायची त्यांच्यात हिम्मतच नव्हतीच का ?त्यांच्याकडे कुणी शिक्षकांनी लक्ष का नाही दिले ?त्यांच्या आई वडिलांना किती त्रास झाला असणार ?एवढ्या टोकाला जायचे काय कारण होते ?
मला माझं मेकॅनिकल इंजिनीरिंग चे दिवस आठवले . मला सांगायला अजिबात संकोच वाटत नाही की मी तीनदा नापास झालो होतो . बऱ्याचदा मला काही ठराविक शिक्षकांनी बोलून बोलून माझे जोरदार
खच्चीकरण करत होते .तोंडी परीक्षण च्या वेळेस बऱ्याचदा मला तोंडावर अपमानास्पद बोलणे ऐकून घ्यावे लागले होते . मी नापास झाल्यावर माझ्यावर झालेला त्याचा नकारात्मक परिणाम मी अनुभवला आहे ,नापास होणे म्हणजे जणू काही फार मोठा गुन्हा करणे असे हावभाव असलेले चेहरे मी पाहिले आहेत .माझ्या कॉलेज च्या एक सिनियर शिक्षकाने मला शिक्षण पूर्ण करण्याचे थेट आव्हान दिले होते . पण ह्या सर्व गोष्टीना मी पुरून उठलो व माझा शिक्षण हे फर्स्ट क्लास नि पूर्ण झाले . ह्या सर्व माझं खचीकरण करणार्यांना मी खोटे ठरवले व निव्वळ जिद्दीवर माझं शिक्षण पूर्ण झाले होते .
इंजिनीरिंग हे कधीच सोप्पे नसते व कधीच अवघड नसते व कुणीही इंजिनीरिंग गृहीत धरून चालू नये . नस कापणे,आत्महत्या करणे हा समस्यांवर उपाय नाही . आपल्या आयुष्यात यश अपयश व नोकरी कधीच कायमची नसतात . नापास होणे हे नैसर्गिक आहे . जो माणूस काम करतो तोच अपयशी होती . स्वतःवर पूर्ण आत्मविश्वास असल्यावर ह्या जगात अशक्य असे काही नाही . कुणी हुशार नसतो व कुणी ढ नसतो सर्वाना समान बुद्धिमत्ता असते . शिक्षण घेताना किंवा नोकरी करताना अपयश येणार ते कुणी टाळू शकत नाही पण तेच अपयश पचवून धक्के खाऊन जो पुढे जात राहतो तोच नंतर जिंकतो .मला शिक्षण पूर्ण करायचेच होते त्यामुळे सर्व आलेल्या धक्क्यांना पुरून उठून पुढे जात राहिलो व ३ डिग्री पूर्ण करून स्वतःच्या नजरेत मी कधीच अपयशी झालो नाही . अंगात जिंकण्याचा किडा असल्यावर येणाऱ्या अपयशाने आपण कधीच खचून जात नाही . मी विचार केला आता हि दोन मुले काय करणार ?त्यांच्या आई वडिलांना काय वाटणार ?त्यांना धीर कोण देणार ?आता येणाऱ्या टोमण्यांना ते कसे तोंड देणार ?
मी तळवलकर ला पोचलो . हे जिम माझे आवडते आहे . मी माझा पोशाख बदलून थेट जिम Floor ला गेलो . तिथे असलेले काही सुविचार मला उत्साहित करीत होते .
''I am neither clever, nor intelligent but i am successful bcoz i kept going and going and going'.
''Every champion was once contendor who refused to give up''
हॉलिवूड च्या रॉकी सिनेमाची हे सुविचार अनुभवाचे बोल होते . असे सुविचार आपला दिवस नक्कीच आशादायी करतात . मी मनातल्या मनात प्रार्थना केली ती दोन मुले सुखरूप असतील व मी रॉकी बाल्बोआ च्या गाण्यावर वोर्क आऊट ला सुरवात केली .
Rising up, back on the street
Did my time, took my chances
Went the distance, now I'm back on my feet
Just a man and his will to survive
So many times it happens too fast
You trade your passion for glory
Don't lose your grip on the dreams of the past
You must fight just to keep them alive
It's the eye of the tiger
It's the thrill of the fight
Rising up to the challenge of our rival
लेखन -कौशिक श्रोत्री
९९२१४५५४५३
©