Wednesday, 1 November 2017
Ocean of flying dreams...
Friday, 27 October 2017
Film Review--Faster Fene
बनेश फेणे ( अमेय वाघ) त्याची मेडिकल ची परीक्षा देण्यासाठी पुण्यात येतो.पुण्यात आल्यावर त्याची गाठ एका ध्येयवेड्या मुलाशी पडते. नेमका त्या ध्येयवेडा मुलाचा मृत्यू होतो.परीक्षेच्या काही मिनिटे आधी त्या मुलाची बनेश शी गाठ पडली असल्यामुळे बनेश ला ही बाब रुचत नाही. तो पूर्णपणे घटनेच्या मुळाशी जाण्याचे ठरवतो. घटनेचा शोध घेत असताना त्याला भा. रा. भागवत (दिलीप प्रभावळकर ),त्याची जुनी मैत्रीण अबोली(पर्ण पेठे ) आणि भूभू (शुभम मोरे) ह्यांची साथ मिळते. ह्या घटनेचा शोध घेत असताना बरेच मोठे गूढ समोर येते जे पाहून प्रेक्षक ही चकित होतात.
सिनेमाची कथा नावाप्रमाणे फास्ट आणि सुसाट आहे जी कुठेही अडखळत नाही.अमेय वाघ फास्टर फेणे च्या भूमिकेच्या पूर्ण खोलात शिरला आहे.त्याला इतर कलाकारांनी मस्त साथ दिली आहे. दिलीप प्रभावळकर भा. रा. भागवत ह्यांच्या भूमिकेत सहज छाप पडतात.इथे विशेषतः multitalented गिरीश कुलकर्णी ह्यांचा खलनायक प्रेक्षकांना मस्तपैकी घाबरून सोडतो. सिनेमा कुठेही रेंगाळत नाही.सिनेमा सर्व बाजूनी उत्तम आहे. सिनेमाची नायिका नावापुरती आहे.सिनेमा पाहत असताना फास्टर फेणे चा चपळपणा अंगात भिनतो.
तर फार विचार न करता एक ताकदीच्या सुसाट शोधकथेचा आस्वाद घेण्यासाठी व फास्टर फेणे नावाच्या बुलेट ला अनुभवण्यासाठी सिनेमा नक्की पाहावा.
परीक्षण:-कौशिक श्रोत्री,इचलकरंजी
©
Saturday, 7 October 2017
पुस्तक परीक्षण :- अंतर्बाह्य ,लेखक:- रत्नाकर मतकरी
एकदा वाचाच ...
माझ्याकडून फर्स्ट क्लास ...
लेखन -कौशिक श्रोत्री ....
©
Friday, 29 September 2017
Judwa 2 review
कथाशून्य,अतिअभिनय,अतिकर्कश नाच,1980 च्या काळाप्रमाणे 2017 ला वागण्याचा केला गेलेला फसवा प्रयत्न....
थोडक्यात.....
शोरूम मध्ये नवी कोरी original करकरीत बुलेट असताना ही देखील ती न घेता third hand बुलेट घेऊन तिला जरा उगीच रंग देऊन त्याची अवस्था ही न पाहता girlfriend ला इंप्रेस करण्याच्या केलेला केविलवाणा प्रयत्न....
माझ्याकडून 100 पैकी 20 मार्क
Storytellerkaushik....
Monday, 25 September 2017
वल्ली डे...
अचानक कुत्र्यांचा भुंकण्याचा जोरजोरात आवाज आला आणि ही शांतता लुप्त झाली.Cheetah च्या वेगाने एक Mercedes Benz शहरातल्या रस्त्यावरून सुसाट वेगाने ठाण्याला निघाली होती.मध्यरात्री पसरलेल्या भयाण शांततेचा अक्षरशः चिरफाड करत ही गाडी वस्त्रनगरी इचलकरंजी पार करून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. इचलकरंजी चे सुप्रसिद्ध उद्योजक डी .के आपल्या तरुण ड्राइवर बरोबर मुंबई ला वकिलाला भेटण्यासाठी निघाले होते.डी.के म्हणजे व्यवसाय आणि प्रयोगशीलता ह्यांचा घनिष्ट उगम होता.गाडीचा ताबा तरुण ड्राइवर कडे होता.मध्यरात्री ३. ००ला साहेबांनी फोन करून उठवलं असल्यामुळे तो अर्धा जागा व अर्धा झोपेत होता आणि मनातल्या मनात डी . के साहेबांना मनसोक्त कोल्हापूरी शिव्या घालत होता.मध्यरात्री उठून गाडी चालवण्याची त्याची पहिलीच वेळ होती . सकाळी ४. ०० वाजता गाडी शिरोली पार करून कराडच्या दिशेने निघाली होती. डी.के साहेबांचं व्यक्तिमत्व म्हणजे ह्रितिक रोशन आणि देव आनंद ह्यांचं अनोखं मिश्रण होतं. ह्रितिक सारखा गोरा वर्ण व तगडी शरीरयष्टी,देव आनंद स्टाइल उत्साह,सहा फूट उंची,वय ६०, १९८० काळातला लावलेला चष्मा,अनुभवाने पांढरे झालेले केस ,बोक्याची नजर असलेले गूढ डोळे,सतत तणावामुळे गौतम गंभीर झालेला चेहरा ह्यामुळे ड्राइवर डी.के साहेबांशी बोलताना खूप विचार करून बोलत होता .
Friday, 22 September 2017
सहज आठवलं
तुझी सुंदरता,मोहकता, गोड आवाज ह्यात मी ओला चिंब होऊन स्वतःला विसरलो.
पण......
तुझ्या attitude ने ....एका क्षणात मी स्वतःला ओळखून बाजूला झालो ☺️☺️☺️☺️☺️
कौशिक.
Thursday, 21 September 2017
Book review-निळा सावळा लेखक-जी ए कुलकर्णी
27 वर्षाचा तरुण नुकतीच करकरीत नवीकोरी बुलेट घेतो.तो बुलेट वरून प्रचंड जोशात रोड ट्रिप साठी बाहेर पडतो.तो आंबा घाटात पोहोचतो.आंबा घाटात बुलेट चा फडफड....आवाज करत तो पुढे जातो.पण आंबा घाटात वेडीवाकडी वळणं आणि चालू असलेला सुसाट पाऊस त्याच्या सहनशक्तीचा अंत पाहतात.तो आंबा घाट बुलेट वरून पूर्ण करण्यासाठी सहनशक्ती पणाला लावतो.पुढे घाट संपून त्याची बुलेटआणि तो एका खड्डायुक्त मार्गावर येतात.पुढे हा रस्ता पार करताना त्याची आणि बुलेट ची सहनशक्ती व संयमाची परीक्षा सुरू होते.मनातल्या मनात तो विचार करतो कुठे आपण उगीचच ह्या माहिती नसलेल्या दिशेने जात आहोत.अखेर पाऊस कमी होत जातो व एकदाचा हा मार्ग त्याला गणपतीपुळ्याच्या जवळ घेऊन जातो व तो मनातल्या मनात सुस्कारा....सोडतो
परीक्षण-कौशिक श्रोत्री
वितरणाचे सर्व हक्क राखीव.
Featured post
सिनेमा
सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...
-
नुकताच पावसाळ्याची सुरवात झाली आहे.ह्या वीकएंड ला रोडट्रीप करायचं बेत आखून मी बाहेर पडलो.धुवाधार पावसात माझ्यासारख्या भटक्या ला घरात बसणे श...
-
सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...
-
सध्या श्रावण महिना व सणवार जोरात सुरु आहेत . अश्या श्रावण महिन्यात येणारे अनुभव आपल्याला सर्वगुणसंपन्न करून जातात . नुकताच मी ऑफिस मधून घरी...
