Monday, 23 September 2019

एस्ट्रॉलॉजर(Astrologer)

आजूबाजूला झाडं आणि लांबून मोठे डोंगर दिसत असतात.एका बाजूला मोठी वाहने जात असतात.जोरजोरात आवाज करत ट्रक आणि बस निघाले असतात.तेवढ्यात लांबून एक ‘एफ.झेड’ दुचाकीस्वार दिसू लागतो.कानात हेड फोन,डोक्यात हेल्मेट घालून ‘लेडी हिअर मी टूनाइट’ हे गाणे ऐकत तो निघाला असतो.आकाशात उन-पाऊसाचा लपंडाव सुरु असतो.त्याच्या सिप्डोमीटरवर ८०-१०० चा स्पीड दिसत असतो.त्या दुचाकीस्वाराचे वय २८-३२ च्या आसपास असावे.तो गाणी ऐकत पुढे निघाला असतो.हळूहळू रस्त्यावर वर्दळ कमी होते.तेवढ्यात त्याच्या गाडीसमोर एक कुत्रं येते.ते कुत्रं तो चुकवण्याचा प्रयत्न करतो.पण त्या नादात तो जमिनीवर हेल्मेटसकट पडतो.त्या कुत्र्याला काहीही होत नाही.पण त्याला खरचटले असते.त्याची गाडी भर रस्त्यात आडवी पडते.
तेवढ्यात रस्त्यावर एक बुलेट चालवणारी व्यक्ती त्याची पडलेली बाईक पाहून थांबते.ती व्यक्ती बुलेट रस्त्याच्या शेजारी लावते आणि त्याची पडलेली बाईक रस्त्यावरून उचलून रस्त्याच्या कडेला आणते.तो अजून जमिनीवर पडलेला असतो.ती व्यक्ती त्याचा हात धरते आणि त्याला उभे राहायला मदत करते.
“फार लागले का..?’’
त्या व्यक्तीचा आवाज ऐकून तो दचकतो.
तो आवाज मुलीचा असतो.
ती व्यक्ती २९ वर्षाची मुलगी असते.
ती मुलगी तिचे हेल्मेट काढते.
हेल्मेट काढल्यावर तिचे मोकळे केस त्याला दिसत असतात.
“नाही.फार काही नाही.कीट घातला आहे.Thanks.’’
“सावकाश चालवत जा...गाडी.’’
ती तरुणी त्याला सांगत असते.
“अचानक कुत्रं आडवे आले.’’
त्याचे हेल्मेट तो काढतो.
Thanks.’’
ती त्याच्याकडे पाहून स्मितहास्य देते आणि तिच्या बुलेटजवळ जाते.लागलीच ती बुलेट स्टार्ट करते आणि निघते.
तो काहीवेळ उभा राहतो.काही वेळ उभा राहिल्यावर तो त्याच्या गाडीजवळ जातो.
“एकटी मुलगी...बुलेट वर..”
तो विचार करतो.
विचार करत तो परत हेल्मेट घालतो आणि त्याच्या ‘एफ-झेड’ वर बसून निघतो.
ह्या वेळेस तो त्याचा वेग ५० ठेवतो.
थोडे अंतर पार केल्यावर त्याला हॉटेल दिसते.
तो वेळ पाहतो.दुपारचे १२.३० वाजलेले असतात.
हॉटेल बऱ्यापेकी मोठे असते.तिथे तो त्याची गाडी पार्क करतो आणि हॉटेलमध्ये जेवायला जातो.हॉटेलमध्ये गर्दी दिसत असते.तो तिथे मोकळ्या टेबलजवळ जाऊन बसतो.थोड्यावेळाने तो जेवणाची ऑर्डर देतो.
२५ मिनिटांनी:-
तो जेवण करून हॉटेलच्या बाहेर येतो.बाहेर आल्यावर तो त्याच्या गाडीजवळ येतो.तिथे आल्यावर त्याला आश्चर्याचा धक्का बसतो.तिथे त्याच्या गाडीच्या शेजारी त्याला थोड्याच वेळापूर्वी त्याला भेटलेल्या मुलीची बुलेट असते ‘क्लासिक ३५० सी.सी’. तो आजूबाजूला पाहत राहतो.त्याला कुणीच दिसत नाही.परत तो त्याच्या बाईक वर बसतो आणि ती सुरु करतो.
“हाय!’’
त्याला आवाज येतो.
त्याच्या शेजारी त्याला ती मुलगी दिसते. 
तो,’’हाय!’’
त्याच्याकडे पाहत ती स्मितहास्य करते.तो देखील तिच्याकडे पाहत स्मितहास्य करतो.
ती लगेच तिच्या डोक्यावर हेल्मेट घालते आणि निघते.
तो तिच्याकडे पाहत राहतो.
“ही एकटीच बुलेट वरून कशी काय जात आहे?कुणीच हिच्याबरोबर दिसत नाही.’’
तिच्याकडे पाहत तो मनातल्या मनात विचार करत राहतो.
विचार करत तो पुढच्या प्रवासाला जातो.

सात दिवसांनी:-
तो ऑफिसमध्ये जायच्या गडबडीत असतो.सकाळचा ब्रेकफास्ट आवरून तो त्याच्या घरातून ऑफिसमध्ये जायला निघतो.त्याची स्कोडा rapid घेऊन तो ऑफिसला निघतो.त्याचे ऑफिस घरापासून १५ मिनिटांवर असते.त्याचे ऑफिस तिसऱ्या मजल्यावर असते.ऑफिसजवळ आल्यावर तो गाडी पार्क करतो.गाडी पार्क केल्यावर त्याला तिथे पार्किंग मध्ये रोड ट्रीपला भेटलेल्या तरुणीची बुलेट दिसते.परत त्याला आश्चर्य वाटते.तो आजूबाजूला पाहतो.त्याला कुणीच दिसत नाही.ग्राउंड फ्लोअरला तो लिफ्टमध्ये जातो.लिफ्टमधून तो तिसऱ्या मजल्यावर त्याच्या ऑफिसकडे जातो.तिसरा मजला आल्यावर तो लिफ्टच्या बाहेर येतो.लिफ्टच्या बाहेर आल्यावर त्याला बुलेटवाली मुलगी दिसते.
“हाय!’’
“हाय!’’
ती,“इथे..?’’
तो,“हो.मी इथे काम करतो.माझे ऑफिस इथेच आहे.”
ती,“कशी होती रोड ट्रीप?’’
तो(हसून),“गुड.आणि thanks to you.’’
ती त्याच्याकडे पाहून गोड स्मितहास्य देते.
ती,“तुम्ही वेगाने चालवता का गाडी?’’
तो,“कधी...कधी..’’
ती,“तरीच तुम्ही घसरून पडला.’’
तो तिच्याकडे पाहून स्मितहास्य करतो.
ती,“बाय.’’
त्याला तिला काहीतरी विचारायचे असते.पण नेमका तेव्हा त्याचा फोन वाजू लागतो.तो फोन उचलतो आणि लिफ्टच्या बाहेर थांबतो.फोनवर बोलून झाल्यावर तो तिच्याकडे पाहतो.पण ती कुठेच नसती.
“गेली की काय बहुतेक.’’
विचार करत तो ऑफिसमध्ये जातो.

सायंकाळी ६.००:-
तो ऑफिसमधून बाहेर पडतो.बाहेर पडल्यावर तो पार्किंग मध्ये जातो आणि त्याची स्कोडा गाडी सुरु करून निघतो.बाहेर पडल्यावर तो मेन रोडला येतो आणि सिग्नल जवळ थांबतो.तिथे थांबल्यावर त्याला त्याच्या गाडीच्या शेजारी बुलेटवाली मुलगी दिसते.तो तिच्याकडे पाहून परत स्मितहास्य करतो.ती त्याच्याकडे पाहते.त्याला हलके स्मितहास्य देते.तिच्याकडे तो पाहतच राहतो.तेवढ्यात सिग्नल पडतो आणि ती निघती.
“कोण असेल ही?’’
विचार करत तो निघतो.

दुसरा दिवस:-
तो ऑफिसमध्ये असतो.ऑफिसमध्ये आल्यावर आज त्याला ती ग्राउंड फ्लोअरला दिसत नाही.पण ती त्याच्या नजरेसमोरून जात नाही.
“कोण असेल ती...?’’
तो विचार करतो.त्याच्या ऑफिसच्या सुरक्षा रक्षकाकडे तो तिची हलकी चौकशी करतो.तिच्याबद्दल माहिती विचारतो.पण त्याला कुणीच काही सांगत नाही.कारण त्या सुरक्षा रक्षकाला फारशी माहिती नसते.तेवढ्यात त्याला रोडट्रीप वर असतानाचा प्रसंग आठवतो.


-----------------------------------------------------------------------------------------------------


तो जेवण करून हॉटेलच्या बाहेर येतो.बाहेर आल्यावर तो त्याच्या गाडीजवळ येतो.तिथे आल्यावर त्याला आश्चर्याचा धक्का बसतो.तिथे त्याच्या गाडीच्या शेजारी त्याला थोड्याच वेळापूर्वी त्याला भेटलेल्या मुलीची बुलेट दिसते ‘क्लासिक ३५० सी.सी’. तो आजूबाजूला पाहत राहतो.गाडीजवळ त्याला कुणीच दिसत नाही.परत तो त्याच्या बाईकवर बसतो आणि ती सुरु करतो.
“हाय!’’
त्याला आवाज येतो.
त्याच्या शेजारी त्याला मुलगी दिसते. 
तो,“हाय!’’
ती,“Have a safe journey.’’
Yes. Thanks. You too.’’
त्याच्याकडे पाहत ती स्मितहास्य करते.तो देखील तिच्याकडे पाहत स्मितहास्य करतो.
ती लगेच तिच्या डोक्यावर हेल्मेट घालते आणि निघते.
तो तिच्याकडे पाहत राहतो.
ती निघाल्यावर त्याला तिने गाडी पार्क केलेल्या जागेत काहीतरी दिसते.तो जवळ जाऊन पाहतो.त्याला visiting कार्ड दिसते.
“ही एकटीच बुलेट वरून कशी काय जात आहे?कुणीच हिच्याबरोबर दिसत नाही....आणि हे कार्ड...’’
तिच्याकडे पाहत तो मनातल्या मनात विचार करत राहतो आणि कार्ड पाहतो.त्यावर लिहिलेले असते.
“स्नेहा....
बी.इ(मेक), एम.बी.ए( मार्केटिंग), Astrologer.’’


----------------------------------------------------------------------------------------------


त्याला तो प्रसंग आठवतो.ते कार्ड त्याने त्याच्या पाकिटात ठेवले होते.तो त्याचे पाकीट उघडतो आणि त्या मुलीचे कार्ड पाहतो.
““स्नेहा....
बी.इ(मेक), एम.बी.ए(मार्केटिंग), Astrologer.’’
“Astrologer.’’
“ही मुलगी...चक्क भविष्य सांगते.’’
तो ऑफिसमध्ये एकटाच बसलेला असतो.कार्डमध्ये तिचा पत्ता असतो.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------


तीन दिवसांनी:-
तिच्या कार्डवर लिहिलेल्या पत्यावर तो त्याच्या गाडीतून निघाला असतो.तिने दिलेला पत्ता कोल्हापूरजवळ असतो.कोल्हापूरात जोरात पाऊस पडत असतो.विजांचा कडकडाट सुरु असतो.सायंकाळचे ५.०० वाजलेले असतात.तो स्नेहाच्या पत्यावर निघाला असतो.पत्ता हुडकत तो रंकाळ्याजवळ येतो.तिथून तो सुसाट निघतो.थोड्या अंतरानंतर त्याला स्नेहाचा पत्ता सापडतो.रंकाळ्यापासून ६ किलोमीटर अंतर पार केल्यावर त्याला एक मोठा बंगला दिसतो.तिथे तो त्याची स्कोडा थांबवतो.त्या बंगल्याबद्दल तो आजूबाजूला चौकशी करतो. पण कुणीच त्याला काहीच सांगत नाही.तो बंगला पाहिल्यावर त्याला रामगोपाल वर्माचे सिनेमे आठवतात.खास करून ‘कौन’ सिनेमा.तो बंगला मुख्य रस्त्यापासून एकदम आत असतो.बंगल्याभवती मोकळे रान असते.बंगला खूप मोठा असतो.तो गाडीतून उतरतो.बाहेर एव्हाना पाऊस थांबला असतो.बंगल्याच्या मेन गेट जवळ तो येतो.ते गेट उघडे असते.तो आत जातो.तिथे त्याला मोठा झोपाळा दिसतो.त्याचबरोबर त्याला बंगल्यात मोठी पिंपळाची झाडे दिसतात;आणि..विविध रंगाचे मांजर देखील दिसतात.तो ते सारे पाहत जात असतो.तेवढ्यात त्याच्या समोर ती येते.
“हाय! तुम्ही इकडे..?’’
“हो.तुमचे कार्ड पाहिले.रोड ट्रीप वर असताना तुमच्या गाडीजवळ ते मला दिसले.’’
“असेल..पडलेले...मी व्हिझीटिंग कार्ड घेऊन जात असते.त्यामुळे मला फायदा होतो खुपदा.’’
“या..ना...”
तो बंगल्यात हॉलमध्ये जातो.हॉल मोठा असतो.तिथे असलेल्या खुर्चीवर तो बसतो.ती त्याच्या जवळ असलेल्या टेबलजवळ बसते.तिथे ती laptop उघडते.
“तुम्हाला पाणी आणू.’’
“नको.’’
“मग चहा?’’
“खरंच काही नको.’’
“तुम्ही astrologer...’’
“हो...आहे म्हणून तर मी कार्ड वर लिहिले आहे.का..?मुलगी असू शकत नाही का..?’’
तो(हसून),“तसे काही नाही.मला जरा आश्चर्य वाटले.कारण मुली शक्यतो नसतात.’’
“फार नसतात मुली तश्या.मला आवड आहे.’’
“ही फिरणारी मांजरं.’’
“मी पाळले आहेत.’’
तिच्या डोळ्यांमध्ये तो पाहत राहतो.ते त्याला आवडू लागतात.ते खूप बोलके असतात.तिचा आवाज देखील नाजूक आणि हळुवार असतो.तिचे ओठ...तिचे हात...सारे काही तो टिपू लागतो.
“तर..तुम्ही पत्रिका पाहायला आलात.’’
“हो...खरे सांगू, माझा ह्या ज्योतिषीशास्त्रावर विश्वास नव्हता.पण आत्ता बसू लागला आहे.कारण काही दिवस मी करा आर्थिक अडचणीत आहे.’’
“तुमचे नाव?’’
“चिन्मय.’’
त्याची जन्मवेळ आणि तारीख ती विचारते.नंतर तो त्याची अडचण तिला सांगतो.त्याची कंपनी अडचणीत असते.त्याची अडचण ती ऐकून घेते.ती त्याची पत्रिका पाहते आणि त्याला काहीतरी सांगत असते.
“अडचण आली की सर्वांना ज्योतिषी आठवतो.असेच आहे.तोपर्यंत आठवत नाही.तुमची अडचण सहा महिन्यात जाणार म्हणजे जाणार.तुमचा व्यवसाय पुन्हा वाढणार.फक्त सहा महिने जोर लावा.अजिबात निराश होऊ नका.चांगले विचार करा.नकारात्मक अजिबात विचार करू नका.जिद्द सोडू नका.’’
“नक्की..सहा महिने.”
त्याचे डोळे विस्फरतात.
“हो.माझा शब्द लिहून ठेवा.आणि...”
ती निळ्या रंगाचे कापड त्याला देते.
“ह्या कापडाची घडी करा आणि तुमच्याजवळ ठेवा.मला सहा महिन्यांनी भेटायला या.तुम्हाला सांगितलेले उपाय करत जा.”
“निळे कापड..?’’
“ठेवा...काहीही होणार नाही.’’
तो निळ्या रंगाचे कापड त्याच्या पाकिटात ठेवतो आणि त्याच्या इतर अडचणी तिला सांगतो.
“निश्चिंत राहा.तुम्हाला हे सहा महिने कसोटीचे आहेत.’’
“हो.खूपच कसोटी सुरु आहे.’’
ती त्याला पाहून स्मितहास्य करते.
“गाडी हळू चालवता...”
तो जोरात हसतो.
“हो.”
“तुम्ही इथे एकट्याच...अश्या बंगल्यात....”
“हो...मला काहीच वाटत नाही.’’
“तुम्हाला ह्याआधी कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत आहे.पण नेमके आठवत नाही.’’
ती त्याच्याकडे पाहून स्मितहास्य करते.
तो देखील तिच्याकडे पाहून स्मितहास्य करतो आणि निघतो.
बंगल्याच्या बाहेर आल्यावर तो वेळ पाहतो.सायंकाळचे ७.०० वाजलेले असतात.एव्हाना पाऊस थांबलेला असतो.आजूबाजूला गारेगार वारे सुटले असते.तो गाडीत बसतो आणि स्टार्ट करून निघतो.ती बंगल्यातून खिडकीच्या काचेतून त्याच्या गाडीकडे पाहत राहते.

थोड्या दिवसांनी:-
चिन्मय त्याच्या ऑफिसमध्ये असतो.एव्हाना त्याची आर्थिक परिस्थिती सुधारलेली असते.तो मिटिंगवर मिटिंग घेत असतो.मिटिंग मध्ये त्याच्या ऑफिसचा सर्व स्टाफ हजर असतो.पण त्याला एक गोष्ट खटकते.त्याच्या ऑफिसचे तीन महत्वाचे वरिष्ठ लोकं मिटिंगला आलेले नसतात.तो चौकशी करतो तर त्याचा स्टाफ त्या तीन लोकांनी राजीनामा दिल्याचे कारण सांगतात.तो कारण विचारतो.पूर्ण चौकशी झाल्यावर त्याला कळते की त्या तीन लोकांनी कंपनीचे नुकसान होईल असे काम केले होते.ते वरिष्ठ असल्याने कुणीच त्यांना विचारले नव्हते.त्याला कळते की त्या तीन वरिष्ठ लोकांमुळे आपली कंपनी खड्यात जाणार होती.त्या तीन लोकांना तो फोन करायचा प्रयत्न करतो. पण ते फोन लागत नाहीत.त्या तीन लोकांनी राजीनामा दिल्यावर कंपनी खूप सुधारली असते.चिन्मयची तब्येत देखील सुधारते.त्याचा स्टाफ पूर्ण जोमाने काम करू लागतो.त्याची कंपनी परत नफ्यात येते.

सहा महिन्यांनी:-
चिन्मय परत स्नेहाला भेटायला येतो.सकाळचे ११.०० वाजलेले असतात.तो बंगल्याच्या बाहेर येतो.ह्या वेळेस त्याच्याकडे ऑडी असते.तो गाडीतून उतरतो आणि बंगल्यात येतो.बंगल्याच्या बाहेर त्याला स्नेहा दिसते.
“हाय! या ना.”
तो तिच्याकडे पाहून हसतो.
“बरोबर सहा महिने झाले.”
“हो.”
चिन्मय आणि स्नेहा हॉलमध्ये जातात.चिन्मय आजूबाजूला पाहतो.पण त्याला एकही मांजर दिसत नाही.त्याला दोन नवीन कुत्री दिसतात.चिन्मय सारे काही स्नेहाला सांगतो.
“गुड..म्हणजे तुमची परिस्थिती बदलली.आता ऑडी घेऊन आला आहात.’’
तो हळुवार हसतो.
“हो.खुप बदल झाला आहे.’’
ती त्याच्याकडे पाहून परत हसते.
तो,“Thanks.”
Thanks कशाला? तुम्ही स्वतः राबलात म्हणून परिस्थिती बदलू शकलात.मी फक्त तुम्हाला उपाय सांगितले.तुमची जिद्द अफाट आहे.तुम्ही सकारात्मक राहिला म्हणून पुढे आला.’’
“पाकिटात निळे कापड ठेवण्याचा खूप फायदा झाला.पण आत्ता हे कापड नको.पुढे मी समर्थ आहे सर्व गोष्टींना तोंड द्यायला.’’
तो ते कापड त्याच्या पाकिटातून काढतो आणि तिथे खुर्चीवर ठेवतो.ती त्याला ते कापड त्याच्याजवळ ठेवायला सांगते पण तो ठेवत नाही.
“तुम्ही चहा घेणार.’’
“नको.मला गडबड आहे.आज मांजर दिसत नाही.’’
“असेल...इकडेच...कुठेतरी...”
ती,“एक सांगू...”
तिचे बोलके डोळे पाहून तो थबकतो.
“तुम्ही खूप सरळ आहात.मी पत्रिका पाहून सांगते आहे.सहा महिन्यांपूर्वी मी हे बोलले नव्हते.नका इतके सरळ राहू.पण आत्ता तुम्ही बदलला आहात.सहा महिन्यांपूर्वी तुम्ही खूप सरळ होता.”
तो काहीच बोलत नाही.तिच्याकडे पाहून स्मितहास्य करतो.
“तसे काही नाही.स्वभाव आहे माझा सरळ.कधीकधी ह्याचा फायदा उठवला गेला.’’
“म्हणून मी सांगत आहे.त्याचा फायदा उठवून देऊ नका.’’
‘’तुमची इथे...एकट्याच राहता.’’
“आई बाबा असतात.दोघे आता बाहेर आहेत.’’
“तुमचे वय...’’
ती हसते.
“का….मुलींना वय विचारतात का...?’’
“ओह्ह..सॉरी..मी निघतो.’’
तो निघतो.
ती बंगल्यात हॉलमध्ये खुर्चीवर बसलेली असते.तो बंगल्यातून बाहेर पडतो.तिच्याजवळ त्याने निळे कापड ठेवलेले असते.ती एकटीच बंगल्यात असते.तिच्याजवळ आय-डी कार्ड पडलेले असते.ते ती हातात घेते.त्यावर तिचे नाव लिहिलेले असते.त्याचबरोबर त्यावर ‘चिन्मय’ मालक असलेल्या कंपनीचे नाव लिहिलेले असते.
“तुझ्याच कंपनीत काम करत होते मी; तरी ओळखला नाहीस मला चिन्मय....मला पाहिल्यासारखे म्हणत होतास.पण मी आठवले नाही तुला.’’

----------------------------------------------------------------------------------------------------

दोन वर्षांपूर्वी:-
स्नेहा चिन्मयच्या कंपनीत कामाला होती.प्रामाणिक काम करत करत तिची जोरदार प्रगती सुरु होती.तिला बुलेट चालवायला आवडत होते.म्हणून ती बुलेटवरून ऑफिसला येत होती.त्याचबरोबर तिला ज्योतिषीशास्त्राची आवड होती.तिच्या प्रेमळ स्वभावामुळे ती सर्वांशी जुळवून घेत होती.चिन्मय तिचा बॉस होता.पण त्याच्यापर्येंत तिला जाताच येत नव्हते.त्याच्या स्वभावाबद्दल ती ऐकून होती.तो सरळ,साधा होता.नुकताच तो कंपनीमध्ये येत होता.चिन्मयचे वडील रिटायर होण्यास १ वर्ष वेळ होता.चिन्मयची फौंड्री होती.त्याचा कामाचा झपाटा जोरात होता.त्याचे ऑफिस आणि फौंड्री वेगळ्या ठिकाणी होते.स्नेहाच्या वर तीन वरिष्ठ होते; त्यांच्यावर चिन्मय आणि त्याचे वडील होते.वरिष्ठांना नंतर स्नेहाचा त्रास होऊ लागला.तिचा प्रामाणिकपणा त्यांना पाहवेना.स्नेहाच्या ज्योतिषी असण्यावरून ते तिला विनाकारण डिवचत असत.त्यांच्या प्रत्येक कामात ती आड येत होती.ती ‘क्यू.ए’ म्हणून काम करत होती.सर्व खरा डाटा ती मिटिंगमध्ये सांगायचा प्रयत्न करत होती.पण तिला तिचे तीन वरिष्ठ बळीचा बकरा करू लागले.त्यातून ती निराश झाली.त्यातून त्यांनी स्नेहाचा मानसिक छळ सुरु केला.शेवटी तिने अस्वस्थ होऊन कंपनीच्या ‘एच.आर’ आणि ‘चिन्मयच्या’ नावाने कंपनीमध्ये काय सुरु आहे; ह्याबद्दल आणि राजीनामा देण्याबद्दलचे पत्र लिहिले.
पण नेमके ते पत्र त्या तीन वरिष्ठ लोकांच्या हातात लागले.त्यांनी मग तिला कायमचा धडा शिकवायचा निर्णय घेतला.त्यांनी तिचा खूप शोध घेतला. पण ती त्यांना सापडत नाही.थोड्या दिवसांनी तिच्याबद्दल ते चिन्मयला खोटी माहिती देतात आणि तिला खोट्या बळीचा बकरा बनवतात.


-----------------------------------------------------------------------------------------------------------------

स्नेहा विचार करत उभी असते.
“माझी नंतर साधी कुणीच चौकशी सुद्धा केली नाही रे..चिन्मय..आणि तुझा साधा सहवास मला नाही मिळाला.’’
तिला चिन्मय आवडत होता.त्याचा सरळ स्वभाव तिला आवडत होता.पण तिचे खरे काम चिन्मय आणि वरच्या टीमजवळ पोहोचत नव्हते.तिचे वरिष्ठ ते पोहोचू देत नव्हते.
“बरे..झाले..ते तीन वरिष्ठ तुझ्या कंपनीमध्ये राजीनामा देऊन गेले...आता तुझी कंपनी जोरदार मुसंडी मारेल.भरपूर प्रगती कर.’’
ती विचार करत राहते.
“पण तू माझ्याकडे आलास..आलास नाही...मी तुला आणले...”
“तू मला भेटलास..रोड ट्रीपला...तुझी गाडी जोरात चालवायची सवय कधीच जात नाही.तू पडलास तेव्हा मी तुला धरले.परत तू मला भेटलास हॉटेलच्या बाहेर.मी तिथे माझे कार्ड टाकले.नंतर मी तुला तुझ्याच ऑफिसच्या बाहेर भेटले.ऑफिसमध्ये बरेच चेंजस झाले आहेत.तू खूप चांगले काम करत आहेस.तू मला भेटायला बंगल्यात आलास.मला खूप आनंद झाला होता.तुला मला कवेत घ्यायचे होते.तुझ्यासारखा मुलगा मला जोडीदार म्हणून हवा होता.तुझा स्पर्श मला अनुभवायचा होता.पण मी तुझा स्पर्श नाही घेऊ शकत.’’
तिच्याजवळ चिन्मयने वापरलेले निळे कापड होते.ते तिने हातात घेतले.त्या कापडाचे ती ओठांनी स्पर्श घेऊ लागली.नंतर ते कापड तिने हाताजवळ ठेवले.
“भरपूर प्रगती कर.आणि त्या तीन वरिष्ठ लोकांचा अजिबात शोध घेऊ नकोस.’’
त्या वरिष्ठ लोकांच्या विरोधात असलेले पुरावे तिने चिन्मयला मेल केले असतात.त्या वरिष्ठ लोकांचा शोध घेत असल्याचे चिन्मय तिला सांगून गेला होता.
एका विचित्र अपघातात चिन्मयच्या त्या अचानक राजीनामा दिलेले कंपनीचे तीन वरिष्ठ लोक बळी पडलेले असतात.तो अपघात तिने घडवून आणलेला असतो.
“चिन्मय..आता ह्यापुढे तू कंपनीच्या प्रामाणिक लोकांना बक्षीस देणार आहेस हे ऐकून मला खूप आनंद होत आहे.असेच मला जर का मिळाले असते दोन वर्षांपूर्वी...’’
“पण आता तू मालक आहेस.तुलाच आता हार्ड व्हावे लागेल.स्वभाव एव्हाना तुझा बदलून गेला आहे.आणि तू कंपनी भक्कम चालवशील ह्याची मला खात्री आहे.प्रत्येक वेळेस मला नाही येता येणार.माझ्या आई-बाबांची मी एकुलती एक होते रे..त्या तिघांनी त्याचा सुद्धा विचार केला नाही.त्या तिघांनी....मला...मी आता ह्या जगात....’’
तेवढ्यात तिच्याजवळ तिने पाळलेले मांजर आणि कुत्री येतात.
एवढ्यात बंगल्याच्या बाहेरून गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू येतो आणि हळूहळू पळणाऱ्या पायांचा आवाज ऐकू येतो.
स्नेहाने पाळलेले कुत्री आणि मांजर तिच्याजवळ येतात.
ती त्यांच्याबरोबर हवेत हळूहळू विरळ होत जाते.
आणि....चिन्मय ''स्नेहा..स्नेहा...'' असे जोरात ओरडत त्याच्या ऑफिसच्या लोकांबरोबर एक वर्ष निर्मनुष्य असलेल्या बंगल्यात धावतपळत येतो.
©
Kaushik




















No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...