Wednesday, 20 February 2019
Film Review:- Gully Boy
‘’स्वप्न पाहायला शिका.’’
Saturday, 16 February 2019
साहेब
साहेब
सकाळचे १०.०० वाजले होते.सर्वत्र मंद गारेगार वारा सुटला होता.बऱ्याच पायांचा आणि बुटांचा आवाज येत होता.मधूनच खाट...खाट...असा आवाज येत होता.मधूनच मोठ्या मशीनचा आवाज येत होता.कोल्हापूरमध्ये मोठ्या कंपनीचा वीक-एंड नंतरचा पहिला दिवस सुरु होता.म्हणून सर्व स्टाफ घाईमध्ये काम करत ऑफिसमध्ये फिरत होता.कंपनीची २ मजले बिल्डींग होती.
सकाळी १०.३० वाजता कंपनीच्या जिन्यामधून टाक...टाक....असा बुटांचा आवाज येऊ लागला.२७ वर्षाचा तरुण मुलगा जिना चढत कंपनीकडे येत होता.जिना चढत तो रिसेप्शन जवळ आला.तिथे रिसेप्शन जवळ तो येऊन बसला.रिसेप्शन टेबल जवळ असलेल्या शिपायाने त्याला पाहिले.
“कुणाला भेटायचे आहे?’’
“माझी ‘मार्केटिंग’ पदासाठी निवड झाली आहे.म्हणून मी भेटायला आलो आहे.”
“तुम्ही एच.आर साहेबांना भेटा.थांबा मी फोन लावतो.”
शिपायाने लगेचच फोन लावला.
५ मिनिटात एच.आर हजर झाले.तो तरुण एच.आर ला कागद दाखवू लागला.
“माझी निवड झाली आहे.मला साहेबांनी पाठवले आहे.हा कागद.”
साहेब म्हणल्यावर ‘एच.आर’ दचकला.कारण कंपनी च्या मालकांना सगळे ‘साहेब’ म्हणत होते.साहेबांविषयी ‘एच.आर’ ला खूप आदर आणि दरारा वाटत होता.साहेबांनी साम..दाम...दंड...भेद ह्या गोष्टींचा वापर करून कंपनी वाढवली होती.त्याचबरोबर त्यांनी अनेक शत्रू अंगावर ओढवले होते.अनेक कामचुकार करणाऱ्या कामगारांना त्यांनी घरचा रस्ता दाखवला होता.
“पण आम्ही कुठलीही भरती सध्या करून घेत नाही.आम्ही जाहिरात सुद्धा पोस्ट केली नाही.”
“मला कामाची गरज आहे.’’
एच.आर तो कागद निरखून पाहू लागला.त्या कागदावर साहेबांची सही होती.त्याचबरोबर तो त्या तरुणाला निरखून पाहू लागला.तो तरुण ६ फुट होता.त्याची शरीरयष्टी पिळदार होती.पण त्याचे डोळे खूप रहस्यमयी होते.त्या डोळ्यांकडे पाहून ‘एच.आर’ दचकला.
“ठीक आहे.आजपासून कामाला सुरु करा.”
तो तरुण आणि ‘एच.आर’ कंपनीच्या प्रिमायसेस मध्ये गेले.तो तरुण मार्केटिंग विभागात गेला.तिथे ३ लोकं होती.तो लगेच काम करू लागला.
२ दिवसांनी...
सकाळचे १२.०० वाजले होते.कंपनीमध्ये सर्वजण काम करत होते.एच.आर त्याच्या कामात होता.काम करत असताना ‘एच.आर’ च्या टेबलवर त्याला एक कागद दिसला.तो कागदावरचा मजकूर वाचू लागला.
“काही खासगी कारणांसाठी मी राजीनामा देत आहे.”
मार्केटिंग हेड चा राजीनामा वाचून ‘एच.आर’ अचंबित झाला.त्याने त्याला फोन लावायचा प्रयत्न केला.पण त्या ‘मार्केटिंग हेड’ चा फोन लागला नाही.मार्केटिंग हेड चा राजीनामा आल्यावर लगेचच तो तरुण त्या पदावर रुजू झाला.
२ दिवसांनी...
२९ वर्षाची तरुणी जिना चढत कंपनी मध्ये येत होती.ती रिसेप्शन जवळ थांबली.तिने तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकाला कागद दिला आणि त्याला ‘एच.आर’ ला फोन करायला सांगितला.एच.आर पळत पळत बाहेर आला.
“माझी ‘क्वालिटी हेड’ पोस्ट साठी निवड झाली आहे.मला साहेबांनी पाठवले आहे.”
ती साहेबांची स्वाक्षरी असलेला कागद एच.आर ला दाखवू लागली.त्यावर साहेबांची सही होती.
एच.आर विचार करू लागला.साहेब तर परदेशात गेले आहेत.जाताना काहीच काही सांगून गेले नाहीत.सध्या कंपनी मध्ये सर्वजण उत्तम काम करत आहेत.
“ठीक आहे.तुम्ही आत या.”
एच.आर आणि ती तरुणी परत क्वालिटी विभागात गेले.ती तरुणी ५ फुट ८ इंच होती.नैसर्गिक सौंदर्य भरभरून असल्यामुळे तिच्याकडे सर्व ऑफिसस्टाफ भरभरून पाहू लागला.ती क्वालिटी विभागात गेली आणि तिने काम सुरु केले.
३ दिवसांनी....
परत एच.आर ला काम करत असताना एक कागद दिसला.तो कागद क्वालिटी हेड च्या राजीनाम्याचा होता.
“खासगी कारणांसाठी मी राजीनामा....”
एच.आर ला काय करावे कळेना.त्याने क्वालिटी हेड ला फोन लावायचा प्रयत्न केला.पण त्याचा फोन बंद होता.
आणि हे काही दिवस सुरु झाले.क्वालिटी हेड,प्रोडक्शन हेड,अकाऊंट हेड,स्टोअर हेड....असे करत हे अनेक दिवस सुरु होते.एच-आर सोडून गेलेल्या सर्वांना फोन लावायचा प्रयत्नात होता.पण सर्वांचे फोन बंद होते.अखेर ही गोष्ट प्लांट हेड च्या कानावर गेली.तो आणि ‘एच.आर’ दोघेही अस्वस्थ झाले.खूप विचार करून दोघांनी साहेबांच्या घरी जायचे ठरवले.
एक दिवसांनी...
सायंकाळचे ५.०० वाजले होते.प्लांट हेड आणि ‘एच.आर’ दोघे साहेबांच्या घरी निघाले.साहेबांचे घर कोल्हापूरपासून लांब पन्हाळ्याजवळ आजूबाजूला घनदाट झाडी असलेल्या परिसरात होते.दोघेही त्यांच्या अल्टो गाडीमधून निघाले.वातावरण बरेच पावसाळी होते.सायंकाळी ५.३५ मिनिटांनी दोघे साहेबांच्या घरी पोहोचले.साहेबांचा मोठा बंगला होता.आजूबाजूला पक्षांचा किलकिलाट सुरु होता.बंगल्याजवळ डोंगर होता.प्लांट हेड आणि ‘एच.आर’ दोघे गाडीमधून उतरले आणि गेट जवळ आले.
प्लांट हेड,’’कोण दिसत नाही.”
एच.आर,’’बघूया.’’
दोघे गेट च्या आत गेले.गेट च्या आत मोठे अंगण होते.एका बाजूला पिंपळाचे झाड दिसत होते.तिथे मोठा झोपाळा दिसत होता.तो पाहून दोघे दचकले.तो झोपाळा पुढे-मागे होत होता.पण त्यावर कुणीही दिसत नव्हते.दोघे मुख्य दरवाज्याजवळ आले.दरवाज्याजवळ बेल होती.ती बेल ‘एच.आर’ ने वाजवली.पण कुणीही दार उघडत नव्हते.तेवढ्यात ‘एच.आर’ आणि ‘प्लांट हेड’ ला आपल्या मागे कुणीतरी उभे असल्याचे वाटू लागले.
दोघांनी मागे वळून पाहिले.
“अरे..तुम्ही....इकडे काय करताय?’’
आपल्या साहेबांना पाहून दोघांना काहीसा धक्का बसला. पण दोघांनाही काहीसे हलके वाटू लागले.
एच.आर,“ साहेब....तुम्ही तर परदेशात....”
साहेब,“ अरे...हो...मी गेलो होतो.आज सकाळी आलो.”
प्लांट हेड,“ साहेब....कंपनी मध्ये गेले काही दिवस बरेच लोकं येत आहेत.त्या सर्व लोकांकडे तुम्ही दिलेले शिफारस पत्र आहेत.”
“अरे.हो.मीच दिली होती.आपण अजून नवीन काम चालू करतोय.म्हणून मी परदेशात जाताना काही ओळखीच्या लोकांना कामावर घ्यायचं ठरवले होते.”
साहेबांचे उत्तर ऐकून ‘एच.आर’ आणि ‘प्लांट-हेड' सुटकेचा निःश्वास टाकतात.
“तुम्ही आत या.”
साहेब,एच-आर आणि प्लांट हेड तिघे बंगल्यात जातात.’एच.आर’ आणि ‘प्लांट हेड’ बंगला निरखून पाहू लागतात.बंगला बराच रहस्यमयी वाटत होता.बंगल्यात २-३ काळ्या रंगाचे मांजर त्यांना फिरताना दिसते.तिघे हॉलमध्ये थांबलेले होते.हॉलमध्ये प्लांट हेड ला मोठे पुस्तक नजरेला पडले.सायंकाळचे ५.५० वाजले होते.तिघे हॉलमध्ये गप्पा मारू लागले.चहापाणी करून अखेर ‘एच.आर’ आणि ‘प्लांट हेड’ कोल्हापूरला त्यांच्या घरी निघाले.
तीन दिवसांनी सकाळी १०.०० वाजता....
प्लांट हेड कंपनीचे जिने चढत ऑफिसमध्ये येत होते.ऑफिसमध्ये आल्यावर ते आपल्या केबिन मध्ये निघाले.जाताना त्यांना स्टाफ दिसत होता.त्याचबरोबर त्यांना स्टाफमध्ये एक नवीन व्यक्ती दिसली.
प्लांट हेड ने त्या व्यक्तीला विचारले.
“आपण...?’’
“मी ‘एच.आर’ पदावर इंटर्न म्हणून लागलोय कालपासून.साहेबांनी मला पाठवले आहे.’’
प्लांट हेड, “ ठीक आहे.”
हेड आपल्या ऑफिसमध्ये जाऊन बसले.ऑफिसमध्ये बसल्यावर त्यांच्या डोक्यात विचार सुरु झाले.काल साहेबांच्या घरचे चित्र त्यांना दिसू लागले.साहेबांच्या हॉलमध्ये ठेवलेले पुस्तक...हलणारा झोपाळा..काळे मांजर...आणि इतर गोष्टी त्यांना दिसू लागल्या.त्या पुस्तकाचे नाव त्यांना क्लिक झाले.
“Business management सारखी पुस्तके वाचणारे साहेब black magic, hypnotism सारखी पुस्तकं कधीपासून वाचू लागले...?”
प्लांट-हेड मनातल्या मनात विचार करू लागले.तेवढ्यात टेबलवर मराठी पेपर होता.तो पेपर प्लांट-हेड वाचू लागले.पहिले पान वाचून ते दुसरे पान वाचू लागले.त्याच्यावर मोठी बातमी आली होती.बातमीबरोबर काही फोटो होते.बातमी एक आठवड्यापूर्वीची होती.त्याचे सविस्तर वर्णन होते.
“पन्हाळ्याजवळ एका डोंगराजवळ निर्जीव ठिकाणी बंगल्याजवळ काही देह सापडले....तपास सुरु आहे...”
पेपरमध्ये आलेले फोटो पाहताच प्लांट-हेड ची पाचावर धारण झाली.
सर्व फोटो कंपनी मध्ये सध्या साहेबांची शिफारस पत्र घेऊन आलेल्या व्यक्तींचे होते आणि कंपनी सोडून गेलेले सर्व हेड लोकांचे होते.शेवटचा फोटो पाहून प्लांट-हेड ला मोठा शॉक बसला.तो फोटो त्याच्या साहेबांचा होता.
त्याला काही आठवू लागले.तो हालणारा झोपाळा...काळे मांजर...ते विचित्र पुस्तक black magic...त्याला मोठा शॉक बसला.
तेवढ्यात दोन पायांचा आवाज येऊ लागला.प्लांट-हेड च्या ऑफिस चा दरवाजा उघडला गेला.
“नमस्कार.माझी ‘प्लांट-हेड’ जागेसाठी निवड झाली आहे.मला साहेबांनी पाठवले आहे.”
©
kaushik
Sunday, 3 February 2019
Book Review:- संभ्रमाच्या लाटा;लेखक:-रत्नाकर मतकरी
सारे वस्तुमात्र काळोखाच्या डोहात बुडून गेलेले.
अंधाराच्या काळ्या वर्णाखेरीज दुसऱ्या कुठल्याही रंगाची नावनिशाणी राहिलेली नाही. रंग सोडाच, पण सारे आवाज देखील जसे काही काळ्या पांघरुणात घुसमटून गेलेले. सर्वत्र निश्चल शांतता.
काळ्याशार दगडाची प्रचंड मोठी कमान.
त्यामध्ये शिशवी लाकडाचा भक्कम दिंडीदरवाजा.
दरवाजातून आत गेले की दुतर्फा गर्द झाडी. काळोखात वाऱ्याच्या झुळकीबरोबर मागेपुढे माना वेळावणारी आणि सरसर आवाज करत फांद्या नाचवणारी काळ्या झाडांची पिशाचे.
जीव मुठीत धरून पाय-वाटेने चालत गेले की लागल्या वाड्याच्या पायऱ्या... दगडी पायऱ्या. त्यावर कुठे कुठे जीर्ण गावात माजलेले. .....
रत्नाकर मतकरी ह्यांच्या प्रत्येक वाक्यात आणि ओळीत एक प्रकारचे आंतरिक भय लपलेले असते .प्रत्येक कथा वाचकाला वेगळ्या अश्या जगात घेऊन जाते. प्रत्येक कथेमध्ये प्रत्येकी पात्राला असणारा आगळा वेगळा न्याय आणि प्रत्येक वाक्यात ठासून भरलेलं भय आणि उत्कंठा जाणून घेण्यासाठी अवश्य पुस्तक वाचाच.
लेखकांनी तर शब्दांचे राजा असलेले रत्नाकर मतकरी ह्यांच्या सर्व पुस्तकांचे पारायण करावे.
©
कौशिक
Featured post
सिनेमा
सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...
-
प्रचंड चर्चेत असलेला सिनेमा पद्मावत पाहायचा योग आला.ह्या सिनेमाच्या दिग्दर्शकाचा मी खूप मोठा चाहता कधीच नव्हतो.पण कलाकारांसाठी सिनेमा कडे म...
-
नुकताच पावसाळ्याची सुरवात झाली आहे.ह्या वीकएंड ला रोडट्रीप करायचं बेत आखून मी बाहेर पडलो.धुवाधार पावसात माझ्यासारख्या भटक्या ला घरात बसणे श...
-
I had just arrived in Pune at 4.00 A.M.It's always good to be back in your favourite city.I had my paper Legal Aspects of Supply Cha...