Sunday 4 February 2018

Book Review-Mexico to Mumbai, Writer:-Mr.Harshad Barve

मेक्सिको आणि मुंबई ह्या दोन शहरांमध्ये घडणाऱ्या घटनांभवती पूर्ण कथा आहे.भारतात 2014 नंतर मोठ्या प्रमाणात परिस्तिथी बदलून गेलेली  असते. २०१४ ला प्रथम मिळालेले बहुमताचे सरकार,परराष्ट्र मंत्र्यांनी शेजारच्या देशाचा पुराव्यांसकट फोडलेला बुरखा,काश्मीर मध्ये दहशतवाद्यांना बसलेली जरब,काश्मीर मध्ये दहशतवाद्यांना असलेली  शूट टू किल ही व्युव्हरचना त्यामुळे जेरीस येऊन शेजारच्या राष्ट्रात भारतविरोधी मोठा कट रचला जातो. ह्या कटामध्ये शेजारचे राष्ट्र भारताच्या  विरोधात असलेल्या सर्व दहशतवाद्यांना सामील करून घेते आणि हा कट उध्वस्त करण्याची जबाबदारी अजय भाटवडेकर टीम वर येते.सुरवातीपासून कथा कुठेही न अडखळता वेगवान धावत सुटते.कथेचा थरार सुसाट वेग पकडतो.कटासाठी केलेलं planning,मेक्सिको चा  ड्रग्ज माफिया आंद्रे ची घेतलेली मदत,ड्रग्स ची काळी दुनिया,भारताशी गद्दारी करणारे रामसरण सहाय, तस्लिमा हुसेन, संजय खेतान, राणा जाफर वस्ती ह्यांचा वापर करून कटाच्या मुळाशी जाणारे अजय भाटवडेकर,रंजन आणि अमिताभ भट्टाचार्य आणि  त्यांना  फ्री हॅन्ड देणारे भारताचे  परराष्ट्र  मंत्री  रश्मी स्वराज  आणि  पंतप्रधान  नरेंद्र  कश्यप ह्या पात्रांचा पूर्ण प्रवास आपल्याला बेबी सिनेमा ची आठवण करून देतो.सर्व च्या सर्व पात्र कथेमध्ये फिट्ट बसले आहेत आणि प्रत्येक जण स्वतःला व्यवस्थित न्याय देतात.तर थ्रिल,वेग,भारतीय गुप्तहेरांचे धाडस अनुभवण्यासाठी कथा नक्की वाचा. 
माझ्याकडून:-डिस्टींकशन 
लेखक-हर्षद बर्वे 
संपर्क:-फेसबुक 
पुस्तकाचा जेनर:-Thrillar(imaginary)
(रिव्हिव्ह चा उद्देश फक्त पुस्तक वाचन वाढावे हा आहे. )
कौशिक 
©

No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...