विघ्नहर्ता
तुझ्या आगमनाची लागली होती ओढ.
तुझ्या येण्याने समस्त आसमंत झाले गोड.
तुझ्या स्वागतासाठी सर्व विभागलेले झाले एक.
सर्व कुटुंबांचा तु विघ्नहर्ता.
मोरया,मोरया,मोरया.
तु सर्व विद्यार्थ्यांचा गुरू.
तु सर्व तरुणांचा मार्गदर्शक.
तु सर्व कलाकारांचा दैवत.
तुच गुरू,तुच माता,तुच पिता,तुच मित्र.
मोरया,मोरया,मोरया.
तुझ्या नावाचा महिमा आहे आभाळाएवढा मोठा.
तुझ्या जयजयकारापुढे ध्वनी होतो छोटा.
तुझ्या नावानं सर्व विघ्न क्षणात होतात नाहीशी.
तुझ्या येण्याने सर्व जीवन झाले गोडधोड.
तुझा महिमा आहे समस्त शब्दांच्याहून थोर.
गणपती बाप्पा मोरया.
लेखक-कौशिक श्रोत्री
वितरणाचे सर्व हक्क राखीव.