IMTEX -२०१७ चा कार्यक्रम जाहीर झाला व माझी बंगलोर ला IMTEX-२०१७ ला जायची उत्सुकता वाढली . तब्बल ८ दिवस पूर्ण IMTEX (इंडियन मशीन टूल एक्सिबिशन) असल्याने व नवीन मशीनरी ,नवनिर्मिती पाहायला मिळणार असल्यामुळे मी खूप उत्सुक होतो . कॅडकॅम व ऑटोमेशन व नवीन तंत्रज्ञान ह्या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती घ्यायला मी बंगलोर ला निघालो . दक्षिण भारताची गार्डन व प्लॅटिनम सिटी मध्ये प्रवास करणे हा एक खूप सुखद अनुभव होता .बरोबर पहाटे ६ वाजता मी बंगलोर ला पोचलो . एव्हाना थंडी नाहीशी झाली होती . हॉटेल वर जाऊन फ्रेश होऊन मी थेट तुमकूर रोड ला असलेलं इंडियन मशीन टूल एक्सिबिशन ला निघालो . मी ब्रिगेड रोड ला उतरलो असल्याने तुमकूर ला पोहोचायला बराच वेळ जाणार होता .ओला च्या टॅक्सी मधून एक्सिबिशन ला निघालो . एक्सिबिशन ला जाताना सर्वप्रथम बंगलोर शहर पहायचा योग आला . प्रशस्त व खड्डा नसलेले रस्ते मी पहिल्यांदा पाहत होतो . झपाट्याने जाणारी मोनो रेल पाहत मी अखेर ईमटेक्स ला पोचलो . एमटेक्स हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन असल्याने त्याची भव्यता मला जाणवली . व्हिसिटर चा बिल्ला घालून मी प्रदर्शन पाहायला पुढे निघालो . ४८००० SQUARE फूट एवढ्या जागेत व्यापलेल्या प्रदर्शनाची म्हणजे काय असते हे मी सर्वप्रथम पाहत होतो ,चारी बाजूला शिस्तीमध्ये येणारे उद्योजक व अनिवासी भारतीय ,प्रदर्शनामध्ये आलेल्या पाहुण्यांची -प्रवेशद्वार पासून प्रदर्शन हॉल पर्येंत मदतीला असणारे आधुनिक इलेक्ट्रिक पॅसेंजर गाडी ,नवनिर्मिती व मेक इन इंडिया चे लावलेल्या जाहिराती ,दिमतीला असलेले मदतनीस ,पोटपूजा करण्यासाठी दिमतीला असलेले फूड कोर्ट आणि कडक स्वच्छता हे सर्व वातावरण पाहून मी भारावून गेलो . ४८००० SQUARE फूट एवढ्या जागेमध्ये तब्बल ६ हॉल मध्ये सर्व प्रदर्शन भरले होते . हॉल १ च्या बाहेर प्रदर्शनामध्ये भाग घेतले असलेल्या कंपन्यांची नावं होती. मशीन मॅनुफॅक्चर ,टुलिंग मधल्या अग्रेसर कंपन्या ,Hydraulics व P neumatics च्या कंपन्या ,ऑटोमेशन मधील कंपन्या ,कॅडकॅम मधील उगवत्या कंपन्या आणि अभियांत्रिकी व्यवसाय मधल्या अग्रेसर कंपन्या एवढ्या मिळून ७५०कंपनी ह्या प्रदर्शनामध्ये होत्या . मी प्रदर्शन पाहायला सुरवात केली व आंतरराष्ट्रीय प्रदर्शन म्हणजे काय असते ह्याचा अनुभव घेत होतो . माझ्यासारख्या वयाच्या मुलांना अश्यावेळी काय पाहू आणि काय नाही हे पटकन उमजत नाही . सर्व स्टॉल पाहणे हे शक्य नसल्याने मी काही नेमके स्टॉल पाहिले
FIE PRIVATE LTD -स्पेशल पर्पज मशीन,CNC मशीन बनवणारी फाय च्या स्टॉल वर स्वयंचलित रॉकवेल हार्डनेस टेस्टर ,कॉम्प्रेसर टेस्टर ,आणि स्प्रिंग टेस्टिंग मशीन पाहायला व त्याचा कामात कसा उपयोग होईल हि नाविन्यपूर्ण माहिती मिळाली.
POLYWORKS इंडिया - कॅनडा मधील कॅम आणि ३डी स्कॅन मधील अग्रेसर असलेली ह्या कंपनी च्या स्टॉल वर ३डी स्कॅनिंग व ३डी चा वापर करून आपली Quality सुधारणा कशी करावी ह्याबाबत पूर्ण नवीन माहिती मिळाली . कॅडकॅम आणि ३डी स्कॅनिंग हे दोन क्षेत्र माझं आवडीचे असल्याने मी खूप उत्सुक होतो . 3D स्कैनिंग इंस्पेक्शन ही संकल्पना कशी असते ह्याची ह्या स्टॉल वॉर माहिती मिळाली.
MASTERCAM व CAMWORKS- 1983 ला अमेरिका मध्ये सुरु झालेली MASTERCAM व Dassult ची CAMWORKS हे सॉफ्टवेअर नव्याने पाहायला मिळाले . २D -३D ड्रॉईंग व दृफ्टिंग,असेम्ब्ली ,सिम्युलेशन चा वापर करून मशिनिंग करताना सायकल TIME कसा कमी करता येईल हि नवीन माहिती इथे मिळाली .
JYOTI CNC- भारतातली CNC MACHINE तयार करण्यात सर्वात अग्रेसर असलेली ज्योती च्या स्टॉल वॉर CNC MACHINE च्या असंख्य ५ ऍक्सिस पर्येंत असलेल्या TURNING CENTER मशीन विक्रीला होत्या .
MARSHAL MACHINE TOOLS- AUTOMATION चा वापर करून मानवविरहित मशीनिंग लाईन कशी असते ह्याचा एक डेमो पाहायला मिळाला ज्यामध्ये कुका नावाचा रोबो ३ CNC मशीन हाताळत होता व मशीनिंग करून झाल्यावर ऑनलाईन जॉब ची तपासणी करून थेट पॅकिंग मध्ये जॉब पोहोचवत होता ह्या डेमो मध्ये मशीन लाईन मानवविरहित कशी चालू शकते हे उदाहरण होते
|
ऑटोमेटेड CNC |
|
OOASIS |
इथे मला आणखीन एक मशीन पाहायला मिळाले . ह्या मशीन मध्ये कौशल्याची गरज न भासता फक्त जॉब मध्ये ठेवल्यावर त्याचे सर्व READING कॉम्पुटर मध्ये डिस्प्ले होतात . OOASIS असे नाव असलेल्या मशीन ची किंमत हि CMM पेक्षा १० टक्के कमी आहे.
SOLIDCAM व ऑटोडेस्क -DESIGN व कॅडकॅम हे माझं आवडीचे काम असल्याने मी कॅडकॅम ची ताजी व सध्या चालू असलेल्या सॉफ्टवेअर ची कायम माहिती घेतो . सॉफ्टवेअर चा वापर करून CNC व VMC प्रोग्रामिंग कसे करावे ह्याची उत्तम माहिती मिळाली .
SCHUNK व FESTO- इथे पिक अँड प्लेस ह्या वापरासाठी रोबो चा डेमो होता ज्याचा उपयोग INSPECTION,JOB LOADING,PACKING,वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ठेवणे ह्यासाठी उपयोग होईल .
|
PICK AND PLACE ROBO |
|
3d scanning zeiss |
|
HUMANOIDROBO |
मी पाहिलेले व क्षणचित्रे काढलेले काही मशीन
|
बोईंग लँडिंग व्हील माझांक मेक
|
टुलिंग ,viberation,bearing,oil,lubricant,casting ह्या सर्व संदर्भ व चे स्टॉल तिथे ७ दिवस चालू होते. Mechanical engg व manufacturing क्षेत्राला लागणारे सर्व मार्गदर्शन तिथे समोर ७ दिवस होते . मेक इन इंडिया च्या अंतर्गत नवीन संशोधन व माहिती तिथे पाहायला मिळाली . ७५० स्टॉल व ७ दिवस प्रदर्शन व प्रत्येक स्टॉल ची माहिती हि घेणे शक्यच नव्हते . अश्या ठिकाणी जाण्याचा फायदा खूप मिळाला . मार्केट मध्ये कुठल्या कंपन्या आहेत ,कुठले टुलिंग सध्या चालू आहे ,नवीन कॅडकॅम सॉफ्टवेअर कुठले आहेत ,MULTIGAUGING च्या काय कल्पना आहेत ,VMC CNC MACHINES HARDNESS TESTER कुठले आहेत ,त्याच्या किमती ,त्याचे माहितीपत्रक ,नवीन जॉब तपासणी पद्धत ,रोबोट ,ऑटोमेशन व अभियांत्रिकी चे असंख्य प्रकार व सर्वात महत्वाचे म्हणजे अश्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सर्व उद्योजक येत असल्याने त्यांना जवळून पाहायला मिळाले ,त्यांचे प्रेसेंटेशन ,त्यांचे बोलणे अश्या असंख्य गोष्टी अनुभवास मिळाल्या . नक्कीच अश्या प्रदर्शनात भेट देऊन आपला व्यावरहीक attitude वाढीस मदत मिळते म्हणून इमटेक्स सारखे प्रदर्शन कधीच चुकवू नये तिथे अवश्य जावे. २ वर्षातून एकदा .
लेखन -कौशिक श्रोत्री
९९२१४५५४५३