Wednesday, 25 January 2017

सिने परीक्षण -काबिल

ह्रितिक रोशन एक राजपुत्राला साजेसे असलेलं एक व्यक्तिमत्व व अभिनेत्याला एका अंध व्यक्तिरेखेच्या भूमिकेत पाहणे जरा कठीणच होते . पण सिनेमा पाहिल्यावर हा एक नक्कीच कसलेला अभिनेता आहे हे जाणवत राहते .
सिनेमा ची कथा  रोहन भटनागर (ह्रितिक रोशन) व सुप्रिया (यामी गौतम ) ह्यांच्याबोवती फिरते . एक कसलेला परंतु अंध असूनही नकलाकार असलेला रोहन भटनागर(ह्रितिक रोशन ) ची भेट एका अंध असलेली मुलगी सुप्रिया (यामी गौतम )शी होते . पुढचे आयुष्य एकत्र जगण्याचे दोघे एकमेकांना वाचन देतात व एकत्र येतात . एकत्र येऊन पुढच्या आयुष्याची वाटचाल सुरु असताना सुप्रिया (यामी गौतम ) चा एका अनपेक्षित घटनेने मृत्यू होतो . ह्या अनपेक्षित घटनेमध्ये एका राजकीय पुढार्यांचा भावाचा सहभाग असल्याने त्याचा रोहन भटनागर (ह्रितिक रोशन ) च्या आयुष्यावर परिणाम करून जातो .पुढे न्याय व्यवस्था कडून पूर्ण न्याय न मिळाल्याने व घटनेला राजकीय वरदहस्त मिळाल्याने रोहन भटनागर ( ह्रितिक रोशन ) अखेर स्वतः पुढे होऊन अत्यंत चलाखीने व धूर्तपणे थंड डोक्याने खेळी करून आपल्या पत्नीच्या मारेकर्यांना शोधून काढतो व सिनेमा संपतो . सिनेमा पाहताना आपण अशी कथा असलेले सिनेमे पहिले असल्याचं जाणवते . यामी गौतम न एका अंध मुलीची भूमिका खूप चांगली केली आहे .एक साधी ,सरळ असलेली एका मुलीची भूमिका तिला खूप छान जमली आहे . नरेंद्र झा व मराठमोळा गिरीश कुलकर्णी ह्या २ अभिनेत्यांना   एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका पूर्णपणे पेलली आहे. खलनायक असलेले रोहित व रोनित रॉय हे दोघे भूमिकेत  फिट बसतात. अखेर सिनेमाचे प्रमुख आकर्षण ह्रितिक रोशन . ६फूट ,पिळदार शरीरयष्टी ,गोरापान व ज्याच्याकडे पाहताच समस्त तरुणांचा आदर्श व   समस्त तरुणींचा लाडका असलेला व राजपुत्राला हि लाजवेल व सुप्रसिद्ध डान्सर  असे व्यक्तिमत्व असलेले ह्रितिक रोशन हा ह्या सिनेमा मध्ये आपल्या अभिनयाचा शेवट(सर्वोच ) करतो . एका अंध व्यक्तीची भूमिका करताना त्याचा त्याने केलेला  बारीक अभ्यास,अंध व्यक्तीची रोजच्या असलेल्या गोष्टी व  मेहनत आपल्याला जाणवते . मध्यंतरानंतर कथेमध्ये पूर्ण बदल होतो व व्यवस्थेच्या  च्या विरोधात लढाई करायचे धाडस करतो व हा अभिनय आपल्याला सिनेमा मध्ये आणखीन खोलवर घेऊन जातो . कथेमध्ये अंध व्यक्ती ह्या पूर्णपणे स्वावलंबी व स्व-कमाई करणारे व स्वतः स्वतंत्र राहणारे आहेत ह्यावर अधिक प्रकाश टाकला आहे हे वेगळेपण पूर्ण जाणवते .कुठल्याही व्यक्तीला कमी लेखू नये ह्यावर कथेमध्ये प्रकाश पडला आहे .
सिनेमाच्या  कथेमध्ये खूप उणिवा जाणवतात . ह्रितिक रोशन व यामी गौतम हे अंध कसे झाले ह्याचा उलगडा सिनेमा मध्ये होत नाही . दोघांच्याही घरचे एक हि व्यक्ती नाहीत हे पाहून जरा आश्चर्य होते . पण ह्रितिक रोशन हा अष्टपैलू अभिनेता आपल्याला कथेच्या उणीव विसरायला लावतो व आपल्याला कथेच्या पूर्ण खोलात घेऊन जातो. एक उपेक्षित पात्र ह्रितिक रोशन ने पूर्ण मेहनतीने रंगवले आहे .  सिनेमा चे संगीत आपली पूर्ण निराशा करते . कथेचे  मास्टरटेलर असलेले  राकेश रोशन व ह्रितिक रोशन आपले पैसे पूर्ण पणे फेडतात .
माझ्याकडून ह्या सिनेमाला फर्स्ट क्लास .
जरूर पाहावा .

लेखन -कौशिक श्रोत्री
९९२१४५५४५३
©

Monday, 16 January 2017

सिने परीक्षण ट्रिपल X -रिटर्न ऑफ क्सान्डर केज

XXX-नावावरून ह्या सिनेमाची कथा हि अतिशय रोमांचकारी असणार अशी मला खात्री होती . हॉलिवूड चा अष्टपैलू अभिनेता,लेखक ,स्क्रिप्ट लेखक  विन  डिझेल चा मी अट्टल चाहता असल्याने हा  सिनेमा मी चुकवायचा नाही असे ठरवले . सदरच्या सिनेमाची कथा  XANDER CAGE (vin diesel ) एक सरकारी गुप्तहेर च्या आयुष्यापासून सुरवात होते . प्रचंड बलशाली व्यक्तिमत्व ,टॅटू नि गोंदवून घेतलेले व ८ बिस्कीट असलेले शरीर ,अतिशय चपळ व स्वतःचे आयुष्य मनसोक्त जगणाऱ्या  एक ऍथलेट असलेला हा विन एका मोठ्या अपघातापासून बचावतो . नंतर त्याची भेट एका गुप्तहेर संस्थेच्या एका प्रमुखांशी होते.अमेरिकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असलेले व अंतराळातले उपग्रहांची देखरेख करणारे एक गॅजेट अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थेमधून चोरीला जाते . अतिशय महत्वाचे असलेले गॅजेट शोधण्याची जबाबदारी अमेरिकेतील सर्वोच्च असलेली संस्था Xander कडे सोपवते . ४ लोकांचा समूहाने ते गॅजेट ची चोरी केली आहे हे कळल्यावर त्या गॅजेट च्या शोधात निघालेल्या Xander  ची भेट सेरेना (दीपिका पदुकोन )शी होते .दीपिका ,डोणी येन ,रुबी रॉस ह्या लोकांकडे असलेले गॅजेट खोटे आहे हे कळल्यावर  कथेमध्ये मोठा ट्विस्ट येतो व Xander,सेरेना  व त्याची टीम मोठ्या पेचात सापडती . त्यातून मोठ्या चलाखीने Xander व त्याच्या टीम ला गॅजेट सापडते व सिनेमा संपतो .
सदरचा सिनेमा पहिल्या शॉट पासून आपल्याला गुंतवून ठेवतो . विन डिझेल चे अफलातून स्टंट ,५० फूट टॉवर वरून मारलेली उडी ,वेळ आणि वेग ह्या २ गोष्टींशी सांगड ना घालता ऑडी ह्या गाडीच्या वेगाला थक्क करणारे त्याचे स्केटिंग कौशल्य , समुद्राच्या लाटेतूनही आरपार जाणारी  त्याची गाडी ,पॅराशूट न घालता १००० फूट आकाशातून मारलेली उडी ,निव्वळ डोळ्यांच्या नजरेने व व्यक्तिमत्वाने  सिनेमा मध्ये मुलींना हि आपलंसं करणारे Xander चे व्यक्तिमत्व पाहून टाळ्या व शिट्यांचा मोह आवारात नाही . हॉंकॉंग चा अभिनेता Donnie व ऑस्ट्रेलिया ची अभिनेत्री रुबी रोझ चा अभिनय व स्टंट पाहून आपले ८० टक्के पैसे वसूल होतात . भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोन ची छाप ह्या सिनेमा मध्ये दिसते . पण विन डिझेल च्या अभिनय व व्यक्तिमत्वासमोर ती फिकी पडते . सिनेमा ची कथा थोडीफार फास्ट अँड  furious च्या कथेशी आठवण करून देते .कथेमधील काही उणिवा आहेत .त्याची भरपाई विन डिझेल कडून होते . 
निखळ मनोरंजन ,स्टंट बाजी,विन डिझेल चा अभिनय व गोरीघारी दीपिका पदुकोन ला पाहण्यास हा सिनेमा नक्की पाहावा 
पूर्ण पैसे वसूल . 
३ स्टार्स 
लेखन -कौशिक विद्याधर श्रोत्री 
९९२१४५५४५३
वितरणाचे सर्व हक्क राखीव .


Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...