Friday, 4 October 2019

Film Review:- WAR


चित्रपट:- व्हॉर(war)
दिग्दर्शक:-सिद्धार्थ आनंद.
लेखक:-सिद्धार्थ आनंद.
डायलॉग:-अब्बास टायरवाला.
संगीत:-विशाल-शेखर.
लीड:- ह्रिथिक रोशन.
     टायगर श्रॉफ.
     वानी कपूर.
     आशुतोष राणा.
प्रोडूसर:-आदित्य चोप्रा
कथा:-खालिद(टायगर श्रॉफ) हा इंडियन आर्मी मध्ये काम करत असतो.त्याच्यावर कबीर( ह्रिथिक) ला एलीमिनेट करायची जबाबदारी त्याचे वरिष्ठ सोपवतात.कारण ‘खालिद’ आणि ‘कबीर’ ह्यांचे नाते गुरु शिष्याचे असते.त्यानंतर सुरु होतो अखंड पकडापकडीचा आणि पळापळीचा न थांबणारा खेळ...
खूप दिवसांनी चांगला दर्जाचा सिनेमा आलेला आहे.मध्यंतरी असलेले टुकार आणि ढापलेले सिनेमा पाहून कधीकधी सिनेमे पहायची इच्छा राहत नाही.ह्या सिनेमाची कथा दमदार आहे.ह्यात दिग्दर्शकाने सर्व दर्जेदार गोष्टी दिलेल्या आहेत.डोळ्यांच्या आरपार जाणारा पाठलाग,२.५ तासात ७ प्रकारचे देश पर्यटन करायची संधी...डान्स आणि बरेच काही.पण ‘सिद्धार्थ’ एक गोष्ट विसरला.कथा ही तर्कहीन होऊन नाही चालत.काही प्रसंगात कथा तर्कशून्य वाटत राहते.काही प्रसंग हे ‘एम-आय’  पिक्चर मधून जसाच तसे ढापलेले दिसतात.काही प्रसंग ‘विन डीझेल’ च्या सिनेमांची आठवण करून देतात.कदाचित दिग्दर्शक ढापण्यात हुशार असावा.पण हा सिनेमा कुठेही बोअर करत नाही.काही कथेला चांगले वळण आणि ट्वीस्ट द्यायचे प्रयत्न केले गेले आहेत.पण ते जमलेले नाहीत.
अभिनयाच्या बाबतीत ४५ वर्षाचा ह्रिथिक रोशन पुन्हा नवतारुण्यात प्रवेश करताना दिसतो.हा माणूस आपल्या अभिनयाच्या जोरावर कथेचा उणीवा खाऊन टाकतो.आर्मीचा कसलेला सोल्जर च्या भूमिकेत हा चांगला शोभला आहे.ह्याला काय जमत नाही असे नाही.सर्व महिलांचा ड्रीम पुरुष असलेला आणि सर्व मुलांचा आदर्श असलेला हा माणूस कुठेही कमी पडत नाही.तो जास्त प्रगल्ब होत आहे.
दुसऱ्या बाजूला हवेतून हवेत आणि जमिनीवर उड्या मारणारा टायगर श्रॉफ.ह्याला आता कुठे जरा जरा अभिनय येऊ लागला आहे.अजूनही ह्याला सिनेमा पाहताना हा फक्त उड्या मारतो कि काय? असा प्रश्न पडतो.अभिनय देखील करावा लागतो हे बहुदा हा टायगर विसरला असावा.ह्रिथिक समोर तो अक्षरशः उंदीर वाटतो.
वानी कपूरला ह्या सिनेमात बहुदा वेळ जात नाही म्हणून घेतले असावे.
आशुतोष राणा ठीक आहे.
विशाल-शेखर चे संगीत अव्वल दर्जाचे आहे.
शेवटी पिक्चर चा हिरो ठरतो पिळदार बायसेपवाला,भाया सरसावत चेहऱ्यावर सनग्लास्सेस घालत,पिळदार दंड दाखवत अनेक मुलींना बेहोष करणारा ह्रिथिक रोशन.
माझ्याकडून १००/७०.
#सिनेमा जराही बोअर करत नाही.#
#सिनेमा थेटरलाच जाऊन पहा#
#पायरसी थांबवा#
©
Kaushik

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...