Saturday, 23 June 2018

किल्ली

मध्यरात्रीचे २.०० वाजलेले होते.समस्त इचलकरंजी मध्ये पाऊसाचा जोरदार दणका सुरु होता.सर्वत्र काळोख पसरलेला होता.आजूबाजूला असणाऱ्या इमारती काळोखात चिडीचूप उभ्या होत्या.त्या इमारतींच्या शेजारी असलेले बंगले काळोखात हरवलेले होते.सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होते.लांब एखाद्या बंगल्याचा दिव्याचा ठिपका दिसत होता.सर्वत्र भयाण शांतता पसरलेली होती.मधूनच चमकणारी वीज ह्या भयाण शांततेला मुक्त वातावरण निर्माण करत होती.आजूबाजूला असणारी  झाडे वाऱ्याने आडवीतिडवी होत कोणत्या ही क्षणी कोसळतील अश्या बेतात होती.रस्त्यावर लांबून एखाद दुसरी बस दिसत होती.हळूहळू रस्त्यांवर पालापाचोळा आणि चिखल जमायला सुरु झाला.
रात्री ३.१५ ला पाऊसाचा दणका थांबला होता.एव्हाना आकाश मोकळे होऊन चंद्रदर्शन होत होते.सर्व रस्त्यांवर पालापाचोळा साठलेला होता.मधूनच कुत्र्यांचा भुंकण्याच्या आवाज येत होता.सर्वत्र मातीचा सुगंध पसरलेला होता.
हळूहळू कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाज वाढला आणि रस्त्यावर पसरलेली शांतता लुप्त होण्यास सुरवात झाली.हळूहळू फाडफाड... असा आवाज येऊ लागला.रस्त्याच्या लांबून एक ३२ वर्षाचा युवक त्याच्या बुलेट वरून हेल्मेट घालून येत होता.तो बुलेट वरून इचलकरंजी च्या मुख्य रस्त्यावरून निघाला होता.काही वेळानंतर तो एका अपरिचित रस्त्यावरून निघाला आणि एका मोठ्या टोलेजंग बंगल्याच्या बाहेर थांबला.शहरातच पण एका अपरिचित अश्या जागी तो बंगला होता.बंगल्याच्या आजूबाजूला बरेच बंगले होते.सर्व शहरात लाईट नसताना ह्या बंगल्यात लाईट सुरु होती.लगेचच त्याने बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाच्या केबिन च्या बाहेर आवाज दिला.झोपेतून जागा होत आणि जांभ्या देत तो उठला आणि त्याने केबिन मधूनच स्वयंचलित यंत्राच्या मदतीने लगेचच बंगल्याचे गेट उघडले.त्या युवकाने लगेचच त्याची बुलेट बंगल्याच्या आत घेतली.त्याने बुलेट आत घेतली आणि एक मिनिटांनी गेट लगेचच बंद झाले.
पहाटेचे ३.२५ वाजलेले होते.त्या युवकाने त्याची बुलेट बंगल्याच्या आत पार्क केली आणि तो बंगल्याच्या तळमजल्यावर गेला.तिथे त्याने बेल वाजवली.बंगला खूप मोठा होता.तळमजल्यावर असलेल्या एका खोलीत दिवा सुरु होता.बाहेर चिडीचूप शांतता असताना त्या तळमजल्यावर पहाटे “रॉकी बाल्बोआ” ची गाणी ऐकू येत होती.त्याने बेल वाजवल्यावर कुणीही दार उघडले नाही.परत तो बेल वाजवणार तेवढ्यात बाहेर असलेला सुरक्षा रक्षक म्हणाला
“अहो,दाराला लॉक केले नाही.बिनधास्त जा.’’
त्या सुरक्षा रक्षकाचे ऐकून त्या युवकाने दार उघडले आणि तो बंगल्याच्या तळमजल्यावर असलेल्या “शंभर वर्ष आयुष्य” असे नाव असलेल्या खोलीत गेला.तिथे त्याला विलक्षण दृश्य दिसले.रॉकी बाल्बोआ च्या गाण्यांवर ५२ वर्षाचे इचलकरंजी चे उद्योजक डी.के व्यायाम करत होते.लगेचच त्याने तळमजल्यावर असलेले दार बंद केले आणि तो तळमजल्यावर असलेल्या सोफ्यावर बसला.डी.के.बैठका मारत होते.बैठका मारून झाल्यावर त्यांनी लगेचच जोर मारायला सुरु केले.एक हात जमिनीवर आणि एक हात कंबरेच्या जवळ अश्या अवघड रीतीने ते जोर मारत होते.एका बाजूला रॉकी बाल्बोआ चे अमर्याद उर्जा निर्माण करणारे गाणे“आय ऑफ द टायगर” सुरु होते आणि एका बाजूला डी.के अखंडपणे उर्जा लावत व्यायाम करत होते.
तब्बल एक मिनिटांनी ते जोर मारायचे थांबले आणि त्यांनी हाताच्या खुणेनेच त्या तरुणाला त्यांच्याबरोबर जोर मारण्याचे आदेश दिले.नाक मुरडत तो तरुण डी.के साहेबांबरोबर जोर मारू लागला आणि साहेबांना मनातल्या मनात कोल्हापूरी शिव्या देऊ लागला.पण त्याला डी.के साहेबांच्या वेगाने जोर मारणे जमले नाही.काही मिनिटांनी तो सोफ्यावर बसला आणि डी.के साहेब जमिनीवरून उठले.साहेब उठल्यावर जमीन घामाने ओली झाली होती.डी.के म्हणजे इचलकरंजी चे सुप्रसिद्ध उद्योगपती.सहा फुट उंची,ह्रिथिक रोशन ला लाजवेल असा गोरा वर्ण आणि तब्येत,तीक्ष्ण असे करारी आणि बोक्यासारखे डोळे आणि भेदक नजर,उजव्या हातावर मोठा tattoo, पन्नास च्या पुढे वय असूनही पांढरे न झालेले केस,दोन्ही हातात चारही बोटात असलेल्या अंगठ्या,चेहऱ्यावर दिसणारा तणाव आणि पडलेल्या आठ्या आणि सतत गंभीर चेहरा,कमवलेली शरीरयष्टी व प्रयोग आणि काम ह्यांचे उत्तम मिश्रण म्हणजे डी.के.
डी.के,“लवकर आलास महेश.’’
तो,“हो.’’
“बस थोडावेळ.’’
असे म्हणून डी.के आवरायला गेले.१५ मिनिटात आवरून डी.के बाहेर आले.एव्हाना सकाळचे ४.०० वाजले होते.
“चल आपल्याला पुण्याला लवकर पोहोचायचे आहे.’’
दोघेही पहाटे ४.१५ वाजता बंगल्याच्या आवारात आले.
बंगल्यात ३ गाड्या होत्या.एक बी.एम.डब्लू होती आणि एक ऑडी Q-७ होती आणि एक मर्सिडीज होती.महेश त्यांचा ड्राईवर होता.महेशने नेहमीची ऑडी च्या गाडीची किल्ली ची विचारणा साहेबांकडे केली.
“आज मर्सिडीज घेऊन जाऊ.’’
किल्ली घेऊन महेश गाडीच्या जवळ गेला आणि त्याला गाडीची अवस्था पाहून धक्काच बसला.
‘’हे काय केलंय साहेब?.’’
नुकतीच महिन्यापूर्वी घेतलेल्या नव्या कोऱ्या मर्सिडीज मध्ये महेशच्या साहेबांनी प्रचंड प्रयोग केले होते.गाडीचा असणारा पांढर्या रंगावर त्यांनी काळा रंग मारलेला होता आणि गाडी चा मधला काही भाग ओपन टू एअर केला होता.नव्या गाडीची अशी हालत पाहून महेश च्या कपाळावर आठ्या पडल्या.“आणखीन काय काय केले आहे ह्या मर्सिडीज मध्ये  वेड्या माणसाने कोण जाणे”?असे मनातल्या मनात म्हणत तो गाडीमध्ये बसला.डी.के साहेब गाडीच्या मागे बसले आणि ते बंगल्याच्या बाहेर पडले आणि सुसाट वेगाने रस्त्यावरची शांततेची अक्षरशः चिंधड्या उडवत पुण्याच्या दिशेने निघाले.
मध्यरात्री २.४५ ला फोन केला म्हणून महेश डी.के साहेबांना मनातल्या मनात बेधडक शिव्या घालत होता.डी.के हे सध्याच्या कलयुगाचे इचलकरंजी चे एडिसन चे अवतार होते.नवनिर्मिती चा त्यांना प्रचंड ध्यास होता.नवीन गाडी खोलून त्यातून काहीतरी नवनिर्मिती करणे हा त्यांचा आवडता पेशा होता.
१०० च्या वेगाने महेश गाडी चालवत निघाला होता.गाडीमध्ये रेडीओ सुरु होता.त्याच्या मागे साहेब बसले होते.गाडी इचलकरंजी पास करून कोल्हापूर च्या जवळ आली होती.गाडीच्या मध्ये असलेल्या काचेतून तो मागे असलेल्या साहेबांकडे पाहू लागला.गाडीच्या मागे बसून साहेब चालत्या गाडीत घरचा वेळ वाचवून दंत मंजन वापरून दात घासत होते आणि गाडीच्या काचा खाली करून चूळ भरत होते.हे सर्व दृश्य महेश वेड्यासारखा पाहतच राहिला.तरीही तो गाडी चालवत राहिला.काही वेळाने साहेब ओपन एअर च्या भागातून थोडेसे डोके वर कडून बाहेर पाहू लागले.
गाडी कोल्हापूर पास करून पुढे निघाली.सकाळचे ६.४० वाजले होते.गाडीत बसल्या बसल्या डी.के साहेबांनी ब्रेड बटर त्यांच्या पिशवीतून बाहेर काढले आणि ते खाऊ लागले.महेश ला पण भूक लागली होती पण त्याला डी.के साहेब काहीच बोलले नाहीत.ते पाहून महेश मनातल्या मनात चिडला.साहेबांचा अचानक सुनामी सारखा असलेला चिडका स्वभाव माहिती असल्यामुळे तो काहीच बोलला नाही.गाडी चालवत असताना महेश ला खूप ताकद लाऊन गाडी चालवावी लागत असल्याचे जाणवत होते.लगेचच त्याने ओळखले ह्या ५२ वर्षाच्या माणसाने इंजिन मध्ये खूप काही प्रयोग केले असणार.माणसाने किती सर्किट असावे ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्याचे साहेब डी.के असे त्याला वाटू लागले.मर्सिडीज वर कुणाच्या ####**** ने देखील प्रयोग केले होते का असे महेश मनातल्या मनात म्हणत होता.
गाडी ने आता वेग पकडला होता.गाडी कराड जवळ आली.कराड जवळ आल्यावर साहेबांनी महेश ला गाडीच्या काचा खाली घ्यायला सांगितल्या आणि साताऱ्याजवळ असलेल्या रजतात्रे ह्या हॉटेल जवळ गाडी थांबवण्यास सांगितले.महेश ने काच खाली घेतली.काही वेळाने साहेबांनी गाडीमध्ये असलेला रेडीओ बंद करण्यास सांगितले.काही वेळाने साहेबांनी त्यांच्या जवळ असलेला टेप सुरु केला आणि त्यांचे आवडते गाणे “मे जिंदगी का साथ निभाता चला गया...’’ लावले आणि ते गुणगुणत त्यांच्या जवळ अत्यंत महागडी असलेली चिलीम ओढण्यास सुरु केली  आणि चेहरा निर्विकार करून विचार करत साहेब बसले.गाडी मध्ये ए.सी असतानाही तो बंद करून काचा खाली घेणे,गाडी मध्ये इम्पोर्टेड रेडीओ असतानाही स्वतःचा टेप लावणे ह्याला काय म्हणावे ह्या विचारात महेश पडला.
काही वेळाने पुन्हा पाऊस पडण्यास सुरवात झाली आणि पाण्याचे थेंब आता गाडीत पडू लागले.मग साहेबांनी त्यांनी प्रयोग केलेल्या गाडीच्या वरच्या भागात असलेल्या ओपन एअर चा भाग लहानश्या स्लायडिंग दरवाज्याने बंद केला.
एव्हाना गाडी साताऱ्याजवळ आली होती.अचानक स्वतःजवळ असलेला टेप बंद करून साहेबांनी स्वतःच मायकेल jackson चे इंग्रजी गाणे “Thrillar rise” म्हणायला सुरवात केली.ते गाणी ऐकून महेश मनातल्या मनात म्हणत होता हा माणूस स्वतःला अष्टपैलू समजतो काय...?
गाडी साताऱ्याजवळ रजतात्रे हॉटेल जवळ थांबली.सकाळचे ७.४५ वाजले होते.हॉटेल ला फारशी गर्दी दिसत नव्हती.दोघांना बसण्यास जागा लगेचच मिळाली.वेटर पळतपळत आला.दोघांनी ऑर्डर देण्यास सुरवात केली.
डी.के साहेब,’’एक डोसा,इडली,पोहे,उपीट,ब्रेड बटर आणि एक कप कॉफी.’’
वेटर ऑर्डर लिहून घेत होता.
महेश ने काहीच ऑर्डर दिला नाही.
‘’अरे महेश,तुला काही भूक नाही का?ऑर्डर दे की..’’
“साहेब,आत्ता तुम्ही दिली ना...’’
‘’अरे,ती माझी ऑर्डर होती.’’
साहेब निर्विकारपणे महेश ला सांगत होते आणि महेश ला विचित्रपणाचे धक्केवर धक्के बसू लागले.
तब्बल अर्ध्या तासाने डी.के साहेब आणि महेश पोट भरून बाहेर पडले आणि पुढे निघाले.
सकाळी १०.५५ ला दोघेही पुण्यात पोहोचले.साहेबांची दुपारी १.३० ला मिटिंग असल्याने दोघेही लवकर पोहोचले.मिटिंग ची सर्व कागदपत्रे आणि महत्वाच्या फाईल्स डी.के साहेबांच्या कोथरूड ला असणार्या flat मध्ये होते.दोघेही कोथरूड ला पोहोचले.नळ stop जवळ असलेल्या घराजवळ दोघेही पोहोचले.दोघेही गाडीतून खाली उतरले आणि जिने चढून flat च्या दिशेने जाऊ लागले.पहिल्या मजल्यावर असलेल्या flat च्या जवळ दोघे पोहोचतात तेवढ्यात
‘’ अर्रर्र...मी घराची किल्ली इचलकरंजी ला विसरलो.एक काम करू,मी थांबतो आणि मिटिंग ची वेळ उद्याची घेतो तेवढ्यात तू इचलकरंजी ला जा आणि किल्ली आण.’’
महेश मनातल्या मनात राग ठेवून आणि चेहऱ्यावर हास्य ठेवत बाहेर पडतो आणि गाडी मध्ये बसतो.त्याच्याबरोबर त्याचे साहेब पण गाडीजवळ येतात.महेशच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते.तो लगेचच गाडीला स्टार्टर मारतो आणि इचलकरंजी ला निघतो.
हाथ-पाय आपटत आणि दात-ओठ खात महेश निघाला असतो.त्याच्या आज सहनशक्तीचा अंत झालेला असतो.८० च्या वेगाने तो रागारागाने पाय आपटत निघाला असतो.एव्हाना तो शिरवळ पास करून साताऱ्याच्या दिशेने निघाला असतो.शिरवळ पास करून तो खंबाटकी घाटात पोहोचतो.तेवढ्यात त्याला डी.के साहेबांचा फोन येतो.
“महेश, कुठे आहेस आत्ता?’’
“मी शिरवळ पास केले आहे.”
“अरे...दुसरी किल्ली मिळाली.माझ्या पाकिटात होती.तू परत ये पुण्याला’’.
फोन आल्यावर महेश लगेचच गाडी थांबवतो.गाडीच्या बाहेर उतरतो.दुपारचे १२.१५ वाजले असतात.रागारागाने तो त्याच्या साहेबांच्या गाडीच्या टायरवर दोन-तीन दणके देतो आणि लगेचच गाडी स्टार्ट करून परत पुण्याला निघतो....

©
KAUSHIK

Thursday, 7 June 2018

Book Review:-Sandeha; Writer:-Shri.Ratnakar Matkari

I think that I am Shreenath…. I still think so… From within we are one and the same. Sometimes he uses the mask with my name while at others I do to fool people.’ A jeep passed by speedily and very closely. It would have brushed up. ‘They are out to kill us!’ the terror in Shreenath’s voice was unmistakable. ‘They are out to kill us! Is this some kind of game that destiny is playing with us? What will the destiny do? It wants to kill us together; both the original and the duplicate. What is going to happen now? We three are set upon the journey. Where...? No one knows. How long...? Who knows... We are the puppets of the destiny. Destiny will now watch us mere closely.

Ten breathtaking stories! Each one creating doubt beyond imagination which kicks up the tension. Ten stories that would really create doubt! Shaded with games played by human minds and emotions these stories take us to an immeasurable height. Matkari has once again proved that his stories are not just entertaining or pleasing. They take us beyond that where it is impossible to comprehend. They are terribly frightful and mysterious. These ten stories have proved once again his command over the words,mystery and ideas. Stories are an excellent combination of humour, thrill, mystery which finally turns out biggest twist to the story.

unlimited stars

Kaushik
©

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...