गूढ म्हणजे काय? तर विज्ञानाच्या चौकटीत न बसणारी कल्पना.पण आपण ज्याला प्रमाण मानतो ते विज्ञान जर अपुरे पडले तर...
या कथा संग्रहामध्ये चटकन न समजणारी बरीच रहस्य आहेत.''चौथी खिडकी'' ही एक अफलातून विज्ञान कथा ''काळ'' ह्या संकल्पनेभोवती फिरत राहते. ''पोरखेळ'' ह्या कथेमधून मानवाचे नियतीच्या हातातले भावले असणे हे सूत्र मांडले आहे.कलावंत आणि कला ह्याचं संबंध असलेली एक दर्जेदार कथा पुस्तक वाचत असताना वेगळ्याच कल्पनेच्या खूप दूर असलेल्या जगामध्ये घेऊन जाते.बऱ्याच विषयांच्या खोलात जात असताना त्याची उत्सुकता आणि थ्रील अखेरपर्येंत टिकून राहते.एखाद्या राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना अचानक वाट चुकून आपण एका माहिती नसलेल्या धसुर वाटेकडे जातो तसे काही कथा वाचत असताना जाणीव होत राहते.सर्व च्या सर्व कथा ह्या वास्तव आणि कल्पना ह्यांच्या सीमेवर सुरु होतात.वाचकांना एखाद्या विषयात गुंतवून ठेवत असताना लेखकांनी बऱ्याच शैल्या वापरल्या आहेत पण हा प्रवास विलक्षण आकर्षक असा असतो जो पूर्ण खोलात घेऊन जातो.कथा वाचत असताना अंगात एक अनामिक अशी लहर जाणवत असल्याची जाणीव होत राहते.सर्व च्या सर्व कथा ह्या सर्व तरुण लेखकांसाठी कादंबरी समान.
कौशिक
©
Ichalkaranji